कित्येक वर्ष झाली तरी, कॉमेडीच्याबाबतीत जावेद जाफरीला टक्कर देणारा कुणीच नाहीये…

टकेशीज कॅसल हा एक जपानी, हॉंगकॉंग वैगरे देशाचा खेळ होता आणि त्या खेळाचं निवेदन देणारा भिडू होता जावेद जाफरी. विविध आवाज काढून तो प्रेक्षकांना खिळवून ठेवायचा आणि त्याच्या कॉमेंट्रीमुळे तो खेळ अजूनच भारी व्हायचा आणि लोकं चॅनल बदलायचे नाहीत. आता जावेद जाफरी म्हणल्यावर अजून एक गोष्ट ओघाने येतेच ती म्हणजे धमाल सिनेमातला त्याचा रोल…मानव. आपला भाऊ आदिच्या तो कायम सोबत असतो. सोबतच त्याचा डायलॉग

पता नहीं ऐसी सिच्युएशन में मै ही कैसे आगे आ जाता हुं….

जावेद जाफरी हा लय जणांचा आवडता अभिनेता आहे, पब्लिक स्टार म्हणजे काय असतं किंवा एखाद्या शोला लोकांना खिळवून ठेवणं काय असतं हे जावेद जाफरीला चांगलंच जमतं.

तर आता जावेद जाफरीबद्दल आपण इतकं बोलतोय तर त्याचा जीवनप्रवास पण आपण जाणून घ्यायला पाहिजे. भारतीय चित्रपटसृष्टीत असे लोक कमी आहेत जे अभिनयासोबतच नृत्य कलेतही तितकेच पारंगत आहेत. बॉलीवूडला नेहमीच विनोदी कलाकारांच्या कमतरतेचा सामना करावा लागतो. काही वगळले तर बहुतेक कलाकार कधीच कॉमेडीच्या गाभ्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण जावेद जाफरी हा असाच एक अभिनेता आहे जो उत्तम डान्सर तर आहेच पण एक अतिशय प्रभावी विनोदी अभिनेता देखील आहे. जावेद जाफरी यांनी हिंदी चित्रपटांमध्ये दिसणारी  कॉमेडी उच्च पातळीवर नेली आहे.

आज विनोदाच्या क्षेत्रात जावेद जाफरीला मागे टाकणारा अभिनेता क्वचितच असेल.

जावेद जाफरीचा जन्म ४ डिसेंबर १९६३ रोजी मुंबईत झाला. जगदीप या नावाने चित्रपटांमध्ये लोकप्रियता मिळवणारे त्यांचे वडील सय्यद जवाहर अली जाफरी हे स्वतः एक उत्तम विनोदी कलाकार होते. शोले आणि अंदाज अपना अपना यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी अभिनेता म्हणून उत्तम काम केले. जावेद जाफरीचा भाऊ नावेद जाफरी हा देखील अभिनेता आहे.

चित्रपटाची पार्श्वभूमी असल्याने जावेद जाफरीचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होणे स्वाभाविक होते. जरी त्याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1979 मध्ये झाली होती, पण 1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या मेरी जंग या चित्रपटात त्याने साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना आवडली होती. याशिवाय त्याचं डान्सिंग टॅलेंटही या चित्रपटानंतर सर्वांसमोर आलं. केबलच्या आगमनानंतर जावेद जाफरीला चित्रपटांव्यतिरिक्त छोट्या पडद्यावरही ओळख मिळू लागली.

जावेद जाफरीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली, विशेषत: तरुणांना केंद्रस्थानी ठेवून सर्व कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या आणि विनोदी कार्यक्रमांमध्ये काम करणाऱ्या चॅनल V च्या होस्टिंगमुळे. Timex Timepass सारख्या गाण्यावर आधारित शोमध्ये विविध कॉमिक पात्रे साकारून तो उत्कृष्ट विनोदी कलाकारांच्या श्रेणीत सामील झाला.

जावेद जाफरीने त्याचा भाऊ आणि सहकारी रवी बहल यांच्यासह बूगी-वूगीसारख्या डान्स शोचे जज केले. सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवर हा शो 1996 मध्ये सुरू झाला. आजही या शोची लोकप्रियता कमी झालेली नाही. याशिवाय जावेद जाफरी यांनी पोगो वाहिनीवर येत असलेल्या टकेशी कसाल या जपानी कार्यक्रमाची हिंदी आवृत्ती त्याच्या आवाजात डब केली गेली. अलीकडे, त्याने डिस्ने चॅनलवर प्रसारित होणारा मै का लाल नावाचा गेम शो होस्ट करण्यास सुरुवात केली.

जावेद जाफरी यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेता पंकज कपूरसोबत मॅगी टोमॅटो केचपची जाहिरात केली होती. या जाहिरातीत जावेद जाफरी यांनी केलेल्या कॉमेडीने लोकांचे खूप मनोरंजन केले. मिमिक्री किंवा कॉमेडी यांच्या जोरावर जावेद जाफरी भाव खाऊन गेला. थ्री इडियटस्, धमाल, डबल धमाल, टोटल धमाल, शेरशहा, सुरमा भोपाली, जंग, वॉर छोड ना यार अशा अनेक सिनेमांमध्ये तो झळकला.

आजही जावेद जाफरी म्हणल्यावर त्याचा चेहरा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे धमाल मधल्या मानवचा आणि आवाज म्हणल्यावर टकेशी कॅसलमधल्या कॉमेंट्रीचा….!

हे ही वाच भिडू:

English Summary: Javed jaaferi life story.

Web title: Jaaved Jaaferi life story.

Leave A Reply

Your email address will not be published.