पंतप्रधान नेहरूंनासुद्धा कॉमेडियन जगदीपला भेटण्याचा मोह आवरला नव्हता…
भारतीय सिनेमाला वेगळं वळण देणारा सिनेमा म्हणजे शोले. शोलेमुळे सिनेसृष्टीत दोन विभाग पडले एक बिफोर शोले आणि एक आफ्टर शोले. या सिनेमातलं प्रत्येक पात्र हिट आलं.
यापैकीच एक होते सय्यद इश्तियाक अहमद जाफरी उर्फ सुरमा भोपाली.
सिनेमासाठी जगदीप हे नाव जरी त्यांनी ठेवलं तरीही सुरमा भोपाली या पात्राने त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. सुरमा भोपाली या पात्राच्या ते स्वतः इतके प्रेमात होते कि त्यांनी पुढे सुरमा भोपाली नावाने सिनेमासुद्धा काढला होता. हा सिनेमा त्याकाळात चांगला चालला नाही, मात्र सुरमा भोपाली या नावाचं समीकरण जगदीप यांच्या नावाशी जोडलं गेलं ते कायमचंच.
अभिनेते जगदीप हे बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत आले होते. दिग्दर्शक बिमल रॉय हे जगदीप यांच्या धोबी डॉक्टर या सिनेमातल्या अभिनयाने इतके प्रेरित झाले होते कि त्यांनी त्यांच्या पुढच्या सिनेमात जगदीपला संधी दिली. हा तो काळ होता जेव्हा सिनेमा भावनिकतेवर चालायचा. बिमल रॉय यांच्या दो बिघा जमीन सिनेमात जगदीपला काम मिळालं त्यात ३ रुपयांचं मानधन देण्यात आलं होतं.
येऊया मेन किस्स्यावर ज्यात भारताचे पंतप्रधान अभिनेते जगदीप यांना भेटायला आले होते.
१९५७ मध्ये आलेला सिनेमा हम पंछी एक डाल के चांगलाच गाजला होता. या सिनेमात जगदीप यांनी मेहमूद हे पात्र रंगवलं होतं. हे पात्र लोकांना चांगलंच भावलं होतं.
जगदीप यांचा मेहमूद या पात्राचा अभिनय बघून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे स्वतः जगदीप यांना भेटायला आले होते. जगदीप यांच्या अभिनयाने नेहरू हे अतिशय भावनिक झाले होते. जगदीप यांना भेटायला येऊन नेहरूंनी भेटवस्तू म्हणून चालण्याची काठी दिली होती.
या सिनेमात मास्टर रुमी नावाचं एक पात्र घर सोडण्याच्या विचारातून मित्रांसोबत भटकत असतं तेव्हा जगदीप यांनी साकारलेलं मेहमुदचं पात्र त्याला विशेष पद्धतीने समजावून त्याला घरी जाण्यास परावृत्त करते. हा सिन वेगळ्या ढंगात सादर करून सिनेमात वेगळा प्रयोग करण्यात आला होता.
खुद्द पंतप्रधान नेहरूंना सुद्धा या सीनची भुरळ पडली आणि ते जगदीप यांना भेटायला आले. नेहरूंनी स्वतः जगदीप यांच्या घरी जाऊन त्यांना पुरस्कार दिला आणि त्यांचं कौतुक केलं होतं.
१९८० मध्ये फिरोज खान यांचा कुर्बानी नावाचा सिनेमा आला होता. या सिनेमात जगदीप यांनी मोहम्मद अली या बार मालकाची भूमिका केली होती. हे पात्र बॉक्सर मोहम्मद अली याच्यावरून प्रेरित होतं. आणि जगदीप हे बॉक्सर मोहमद अलीचे चाहते होते. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जगदीप यांचं हे पात्र प्रचंड लोकप्रिय झालं.
अमेरिकेतील काही रसिकांनी तर थेट मोहम्मद अलीसोबत फाईट करण्यासाठी जगदीप यांना बोलावलं होतं. या पात्राची जादू चांगलीच चालली होती. शिकागोमधल्या मशिदीच्या बांधकामासाठी फंड गोळा करण्यात यावा म्हणून मोहमद अलीविरुद्ध जयदीप यांची मॅचसुद्धा आयोजित करण्यात आली होती. पण जगदीप यांनी धन्यवाद ती एक उपहासात्मक लढाई होती असं सांगितलं होतं. पण हि मॅच झाली कि नाही याबद्दल गुपित ठेवण्यात आलं होतं.
सुरमा भोपाली या पात्रामुळे जगदीप यांना कॉमेडी ऍक्टरचा शिक्का बसला. इतर जास्त फॉर्म मध्ये जगदीप यांना दिग्दर्शकांनी वापरलं नाही. कॉमेडियन हा तेव्हा हिरोच्या बरोबरीने समजला जायचा. जेव्हा सिनेमा बोरिंग चालत असेल तेव्हा जगदीप यांचे कॉमेडी रोल सिनेमा हिट करायचे. सुरमा भोपाली हे पात्र जगदीप यांना अमाप प्रसिद्धी मिळवून गेलं.
तेव्हा इतर कुठल्याही अभिनेत्यांना पंतप्रधान भेटत नव्हते मात्र जगदीप यांना थेट घरी येऊन भेटले हे प्रकरण त्याकाळी चांगलंच गाजलं होतं.
हे हि वाच भिडू :
- सुरमा भोपाली ही भूमिका करायची नाही म्हणून ते ठाम होते पण तीच आयुष्याची ओळख ठरली
- शोलेच्या सेटवर भडकलेल्या धरमपाजीच्या हातून बच्चनचा जीव गेला असता.
- त्याकाळचे लोक म्हणायचे, “हो, आम्ही नारदमुनींना प्रत्यक्षात पाहिलंय !”
- निवडणूक आयुक्त असताना थेट उपमुख्यमंत्र्यांना आचारसंहिताभंग केल्याची नोटीस पाठवली होती.