अदानींच्या पैसे कमवण्यामागं या गुजराती माणसाचं ब्रेन आहे….

अदानी उदयॊग समूह. आज घडीचा देशातील सर्वात मोठा आणि नफ्यात चालतं असेलला उद्योग समूह. या समूहाची आताची लेटस्ट अपडेट म्हणजे अदानी ट्रान्समिशन लिमिटेड, ऍग्री लॉजिस्टिक, अदानी गॅस लिमिटेड, अदानी एअरपोर्ट अशा विविध ब्रॅण्डच्या माध्यमातून घसघशीत कमाई करत अदानी ग्रुपने यावर्षी जगात सगळ्यांपेक्षा अधिक अब्जावधींची संपत्ती कमावली आहे.

ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्स नुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती २०२१ मध्ये १६.२ बिलियन डॉलर वरून तब्बल ५० बिलियन डॉलर झाली आहे. यामुळे २०२१ मधल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यासाठी भांडणाऱ्या जेफ बेझोस, मुकेश अंबानी आणि एलन मस्क यांनाही अदानी यांनी मागे टाकले आहे.

त्यांच्या एक वगळता इतर सर्व शेअर्सच्या किंमतीत कमीत कमी ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

यात चेअरमन गौतम अदानी यांचं श्रेय तर आहेच, पण भिडूनों त्यांच्या या सगळ्या यशामागं एका गुजराती माणसाचं ब्रेन आहे. जे अदानी यांचे मुख्य सल्लागार असून ते त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी सल्ला देत असतात. ज्यांनी याआधी आयएएस अधिकारी म्हणून देखील काम केलं आहे.

जयंत परिमल असं त्यांचं नाव. 

अदानी समूहाच्या वेबसाईट नुसार परिमल १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी १९८८ साली एमएनआयटी या नामांकित संस्थेतून इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगच शिक्षण पूर्ण केल्यानंतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये उतरण्याचं ठरवलं. मुळातच हुशार स्वभावाचे असलेले परिमल पुढच्या वर्षी लगेचच म्हणजे १९८९ साली उत्तीर्ण देखील झाले.

आता निवड झाली काय करायचं आहे शिकून असा विचार न करता परिमल यांनी गुजरात सरकारमध्ये उच्च पदावर काम करत असताना देखील आपलं शिक्षण सुरु ठेवलं.

पुढे दिल्लीत आल्यावर त्यांनी २००४ मध्ये हैद्रराबादच्या वर्ल्ड ट्रेंड इन्स्टिट्यूट मधून आंतरराष्ट्रीय कायदा आणि अर्थव्यवस्था यामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर २००७ मध्ये गुजरात विद्यापीठामधून एलएलबीच शिक्षण देखील पूर्ण केलं.

जवळपास १७ वर्ष म्हणजे २००६ पर्यंत गुजरात सरकार आणि भारत सरकार जबरदस्त काम केल्यानंतर त्यांनी राजीनामा देत अदानी ग्रुपमध्ये एंट्री घेतली. आणि तिथं मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली. आपल्या हुशार आणि चाणाक्ष पणामुळे परिमल यांनी तिथं पण आपला यशाचा चढता आलेख कायम ठेवला. 

हा आलेख बघूनच गौतम अदानी यांनी परिमल यांना आपला प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त केलं. सोबतच काळाची पावलं ओळखत अदानी रिन्यूएबल एनर्जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त काम पाहण्यास सुरुवात केली.

आता या काळात त्यांनी काय केलं? तर विविध प्रकल्पांमधल्या गुंतवणुकीसाठी गौतम अदानी यांना सल्ले तर दिलेच शिवाय अदानी रिन्यूएबल आणि ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून नव-नवीन प्रकल्प उभारायला सुरुवात केली. त्यामुळे भारताच्या सोलर क्षेत्रात मोठं नाव असलेल्या सन एडिसन सारख्या कंपन्या स्वतः अदानी समूहाकडे जाण्यासाठी प्रस्ताव देऊ लागल्या.

सोबतच जून २०२० मध्ये अदानी ग्रीनचा SECI अर्थात सोलर इंडिया कोर्पोरेशन ऑफ इंडिया सोबत एक करार झाला. इथे SECI मार्फत त्यांना १ गिगावॅटचा प्रोजेक्ट मिळाला. हा प्रोजेक्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सोलर कॉन्ट्रक्ट आहे. या प्रोजक्टची किंमत साधारण ४५ हजार कोटींच्या घरात होती.

परिमल यांचं जास्त लांबच नाही, अगदी अलीकडंच काम सांगायचं म्हणजे, त्यांच्या ग्रीन एनर्जीनं गुजरातच्या कच्छमध्ये नुकताच १०० मेगावॅट पवन ऊर्जेचा एक प्लांट सुरु केला. आता या प्लँटच्या सुरु होण्यामुळे काय झालं? तर, कंपनीची एकूण ऑपरेशनल क्षमता ४९७ मेगावॅट पर्यंत पोहचली. विशेष म्हणजे त्यांनी हा प्रकल्प नियोजनापेक्षा ५ महिने आधीच चालू केला होता.

मागच्या एका वर्षात कंपनीनं असा हा पाचवा प्रकल्प सुरु केला आहे. त्यामुळे अदानी ग्रीन एनर्जीची अक्षय ऊर्जेची क्षमता १४ हजार ८१५ मेगावॅट झाली आहे, यांच्यातील ११ हजार ४७० मेगावॅट क्षमतेसाठी कॉन्ट्रॅक्ट दिली गेली.

यामुळे कंपनीने कोरोना काळात सगळ्यांचा बाजार उठत असताना एका वर्षाच्या काळात एकूण ८०० मेगावॅट अक्षय ऊर्जाची क्षमता वाढवली आहे. जानेवारी ते मार्च २०१९ च्या दरम्यान कंपनीने ६८१ कोटींचा रेव्हेन्यू बूक केला होता. 

परिमल यांनी २०२० या मागच्या एका वर्षात कंपनीमध्ये जवळपास ५०० टक्क्यांनी वाढ केली होती. याला काहींनी अदानी ग्रीनचे शेअर्स वाढल्याचं कारण सांगितलं मात्र वाढ झाली हे नक्की. 

आता या वर्षाच्या पहिल्या २ महिन्यांमध्येच ग्रीन एनर्जीमध्ये जवळपास १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या वर्षी अदानी टोटल गॅस लिमिटेडमध्ये ९६ टक्क्यांची तर अदानी एंटरप्रायजेसमध्ये ९० टक्क्यांची वाढ झाली आहे. अदानी ट्रान्समिशन लिमिटेड ७९ टक्के वाढली आहे. अदानी पॉवर लि. आणि अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. यामध्ये यावर्षी ५२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

परिमल यांचं रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत देखील खास कनेक्शन होतं, त्यांनी अंबानींसाठी देखील काम केलं आहे. एका रिपोर्ट नुसार सुरुवातीला ५० लाखांचं असलेलं वार्षिक पॅकेज आता ३ कोटी रुपयांच्या आसपास पोहचलं आहे.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. Uday Raut says

    Adani is not no 1 befor give news ,make a study . don’t misguide to Reader

Leave A Reply

Your email address will not be published.