पाटलांनी शाहरुखला खडसावलं, माझ्या परवानगीशिवाय अलिबागमध्ये पाय टाकू शकत नाहीस

किंगखान शाहरुख खान आणि त्याचे किस्से मग ते चांगले असो वा वाईट असो..कायमच चर्चेत येत असतात. मग तो बाळासाहेबांनी त्याला पार्टीत झापलेला किस्सा असो वा वानखेडे स्टेडीयम चा किस्सा असो. आणखी एक किस्सा म्हणजे शाहरुख खानला शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी चारचौघात झापल्याचा एक किस्सा…जो कि पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.

जसं काय शाहरुख चा पोराने ड्रग्स कांड केलं तसं शाहरुखचे किस्से प्रचंड व्हायरल होत आहेत. ३० ऑक्टोबरला आर्यनची जेलमधून सुटका झाली आणि शाहरुख खान निर्धास्त झाला. या प्रकरणानंतर किंगखान शाहरुख खानचे कारनामे समोर येत आहेत. 

हि अलीकडची च गोष्ट आहे तरी ५ वर्षांपूर्वीची….३ नोव्हेंबर २०१७ ची गोष्ट. शाहरुखच कोकणातल्या अलिबाग येथे फार्म हाऊस आहे. तिथेच वाढदिवसानिमित्त गेलेला. अलिबागहून जेंव्हा शाहरुख आपल्या बोटीनं गेट वे ऑफ इंडिया इथं आला, हो अलिबाग हून मुंबई ला येतांना बोटीनेच यावं लागतं. असो शाहरुख देखील येत होता. तो गेट वे ऑफ इंडिया इथं पोहोचला. मग काय किंग खान चे चाहते गेटवरच गर्दी करू लागले.

याच गेट वे ऑफ इंडिया या गेटवरून आणखी एक महत्वाचे व्यक्ती बोटीने अलिबाग ला निघाले होते. ते म्हणजेच शेकाप चे आमदार जयंत पाटील.  

शाहरुख तिथे पोहचायला आणि गर्दी व्हायला अन आमदार जयंत पाटील यांची बोट मुंबईहून अलिबागच्या दिशेनं निघायला एकच वेळ झाली. मग झालं काय तर शाहरुख खानची बोट पार्क होईपर्यंत जयंत पाटलांना वाट पाहावी लागली. यामुळे जयंत पाटलांचा पारा चांगलाच चढला, ते भडकले अन  त्यांनी शाहरुखच्या चाहत्यांसमोरच शाहरुखला सुनावलं….

जयंत पाटलांनी शाहरुखला म्हणले….‘असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तुम्ही खरेदी केलं का?, माझ्या परवानगीशिवाय तू येऊ शकत नाही अलिबागला.’ अशा शब्दात त्यांनी शाहरुखला सुनावलं. 

 

पण इतकं ऐकून देखील शाहरुख शांतच होता. 

जयंत पाटलांचा राग काही कमी नाही असं दिसल्यावर शाहरुख ने गप्प राहून बोटीत बसून राहणंच पसंत केलं. पण शाहरुख ने उलटून उत्तर देखील दिलं नाही. जयंत पाटील त्यांच्या बोटीने पुढे गेल्यानंतर शाहरुख शांतपणे बोटीतून बाहेर पडला आणि निघून गेला. 

कसलाही राग, संताप न करता …. पण जातांना पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकून गेला ..तो जसा बोटीतून बाहेर आला तसं त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला. झालं असं कि, घडलेला प्रसंग एका चाहत्याने रेकॉर्ड केला आणि हि गोष्ट बाहेर आली. तो व्हिडीओ देखील सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता आणि अजूनही होतोय. 

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.