चंद्राबाबूंच्या पक्षाचं चिन्ह काढून घेण्यासाठी जयाप्रदा समाजवादी पक्षात गेल्या…

साऊथच्या पिक्चर पासून सुरु झालेल्या प्रवास त्यानंतर बॉलिवूड आणि राजकारणात या तीनही ठिकाणी त्यांची आपले नाव कमावले. जेव्हा कधी बॉलिवूड मधील जुना अभिनेत्रीचे नाव घेण्यात येत त्यात जयाप्रदा यांचा उल्लेख नक्कीच करण्यात येतो.

कधी काळी चंद्रबाबू नायडूंना साथ देणाऱ्या जया प्रदा मात्र त्यांच्या विरोधात पेटून उठल्या होत्या. तेलगू देशम पार्टीचे चिन्ह काढून घेण्याच्या हट्टाला पेटल्या होता.

त्याचा हा किस्सा…

देशात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस उभा राहिला होता. आता प्रमाणेच तेव्हा सुद्धा काँग्रेस शिवाय दुसरा पर्याय नसल्याचे बोलले जात होते. तो काळ होता ८० च्या दशकातील. तर दुसरीकडे दक्षिणेतील लोकांना उत्तरेतल्या राजकारण्यांकडून होणारा त्रास तेलगु अस्मिता या मुद्यावर NTR यांनी तेलगु देसम पक्षाची स्थापना केली. आपल्या पहिल्याच प्रयत्नात NTR आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

चंद्रबाबू नायडू यांनी आपली राजकीय कार्यकिर्द काँग्रेस पक्षाकडून सुरु केली होती. १९७८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. पहिल्यांदाच आमदार होणाऱ्या चंद्राबाबू नायडूंना मंत्री पद देण्यात आले होते.

मात्र दुसरीकडे १९८२ मध्ये तेलगू देशम पक्षाची (टिडीपी) स्थापना झाली. अस्मितेच्या राजकारणावर स्थापन झालेल्या पक्षाला मोठा प्रतिसाद मिळत होता. १९८३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत टिडीपीला सत्ता  मिळाली आणि NTR मुख्यमंत्री झाले. 

याच वर्षी चंद्रबाबू नायडू हे काँग्रेस सोडून टिडीपी मध्ये प्रवेश केला.

टिडीपी मध्ये प्रवेश केल्या ते NTR च्या जवळचे बनले होते. त्यांनी NTR ची मुलगी भुवनेश्वरी हिच्याशी लग्न केले. १० वर्ष काम केल्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी पक्ष आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. २१६ आमदारांपैकी १९८ आमदार NTR यांच्या कडून तोडले आणि टिडीपी पक्षावर हक्क प्रस्तापित केला. NTR यांना मुख्यमंत्री पदावरून हटविले. आणि स्वतः चंद्रबाबू मुख्यमंत्री झाले. 

१९९४ मध्ये NTR च्या आग्रहाखातर जयाप्रदा यांनी तेलगू देशम पक्षात प्रवेश केला होता. 

मात्र, १९९५ पक्षातील उलथापाथीत जयाप्रदा यांनी NTR ऐवजी चंद्राबाबू यांच्या सोबत गेल्या होत्या. त्याच रिटर्न गिफ्ट म्हणून राज्यसभा खासदार करण्यात आले.

तसेच जयाप्रदा यांना तेलगू देशम पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा करण्यात आलं. मात्र काही वर्षानंतर जयाप्रदा आणि चंद्रबाबू नायडू यांच्यात वाद विवाद सुरु झाले. पक्षात आपले म्हणणे ऐकून घेतले जात नाही असे कारण घेऊन त्यांनी पक्षाला राम राम ठोकला.

चंद्र बाबू नायडू यांना शांत बसू देणार नाही अशी शपथ जयाप्रदा यांनी घेतली होती. 

पक्ष सोडतांना त्यांना अपमान सहन करावा लागला होता. जया प्रदा हार मानणाऱ्या पैकी नव्हत्या. त्या चंद्रबाबू नायडू यांना कशा प्रकारे त्रास देता येईल या याची चाचपणीच करत होत्या. त्यावेळी तेलगू देशम पक्षाचे निवडणूक चिन्ह हे सायकल होते. तर उत्तरप्रदेश मधील समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह सुद्धा सायकल होते. 

या काळात शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय या सगळ्यांमध्ये सायकल खूप फेमस होती. स्वतः मुलायम सिंग सायकल चालवत होते. समाजवादी पक्षाने सायकल चिन्हावर आपला दावा ठोकला होता. जर तेलगू देशम पक्षाने सायकल हे निवडणूक चिन्ह गमावले असते तर त्याचा मोठा फटका पक्षाला बसला असता. 

तर दुसरीकडे समाजवादी पक्ष उत्तरप्रदेश नंतर दक्षिण भारतात हातपाय मारायला सुरुवात करत होती. कर्नाटकातील एका पोट निवडणुकी समाजवादी पक्षाने जिंकली होती.   

यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांना पत्र लिहून सायकल चिन्ह हे तेलगू देशम पक्षाकडे राहू देण्याची विनंती केली होती. निवडणूक आयोगाने उत्तरप्रदेश मध्ये सायकल हे चिन्ह समाजवादी पक्षाला दिले होते.

या सगळ्यात ट्विस्ट आणला जया प्रदा यांनी.

निवडणूक चिन्हाचा वाद सुरु असतांना जयाप्रदा यांनी २००४ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश केला. आणि आपण समाजवादी पक्षा तर्फे आंध्रप्रदेश मधील लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली होती. 

यामुळे समाजवादी पक्ष आणि तेलगू देशम आणि समाजवादी पक्षाचे निवडणूक चिन्ह सायकल असल्याने पेच प्रसंग उभा राहिला होता.

त्यावेळी निवडणूक आयोगाने एक निर्णय दिला होता. ज्या पक्षाचे तीन राज्यांमध्ये पुरेसे अस्तित्व आहे. त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात येईल. यामुळे सायकल चिन्ह हे समाजवादी पक्षाकडे गेले असते. 

चंद्राबाबू नायडू यांनी पाठवल्या पत्राला मुलायम सिंग यांनी उत्तर दिलेच नाही. 

२००४ मध्ये समाजवादी पक्षाने जयाप्रदा यांनी आंध्रप्रदेश ऐवजी उत्तरप्रदेश मधून लोकसभा निवडणूकीचे तिकीट दिले होते. सलग तीन वेळा उत्तरप्रदेश मधून जयाप्रद निवडून आल्या आहेत.  

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.