ज्या माणसामुळे दारासिंगची लंगोट VIP झाली ! 

मजबुत ऐंसा दारासिंग जैंसा ! 

आठवते का ती जाहिरात जेव्हा दारासिंग लंगोटसाठी जाहिरात करायचां. तुमच्या आमच्यांसारख्याची लंगोट असती तर चाललं देखील असतं पण ती दारासिंगची लंगोट होती. कुस्तीचे डावं मारणारा दारासिंग तेव्हा भारतभर ओळखला जायचा.

त्याच्या मजबुतीला तोड नव्हती म्हणून तो रामायणात हनुमान देखील झाला. तर अशा VIP माणसाने जाहिरात केलेली लंगोट होती ती “VIP अंडरगारमेंट्स” 

या व्हीआयपी अंडरगारमेंट्सचे संस्थापक होते एल.जयपाल रेड्डी आणि जयकुमार पाठारे

हे दोघे ही एकेकाळी MSEB मध्ये इलेक्ट्रिक इंजिनियर होते. 

या दोघांना बिझिनेस सुरु करायची खुमखुमी होती पण कसा, कधी आणि कोणता ते समजत नव्हतं. दुर्दैवाने जयकुमार पाठारे यांचा अपघात झाला. अपघातानंतर औषधोपचाराचा प्रश्न उभा राहिला. MSEB मार्फत काहीतरी मदत होईल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र MSEB मधल्या लालफितीच्या कारभाराचा फटका त्यांना बसला. औषधोपचाराची मदत राहिली बाजूला पण त्यांचा या काळातला पगार सुद्धा दिला गेला नाही. 

रागाच्या भरात पाठारे यांनी नोकरी सोडली. दुसऱ्या एका खाजगी कंपनीत काही काळ जॉब केला पण स्वतःच्या उद्योगाचं स्वप्न काही शांत झोपू देत नव्हतं. त्यांच्या जोडीला जयपाल रेड्डी आले. दोन्ही मित्रांनी मिळून मॅक्स्वेल नावाची इलेक्ट्रिकल कंपनी सुरु केली. ती कंपनी मात्र काही विशेष चालली नाही. 

अशा वेळी त्यांच्या डोक्यात दूसरी आयडिया आली पुरुषांच्या अंडरगारमेंटची फॅक्टरी सुरु करायची. 

पण त्यांच्याकडे ना भांडवल होते ना शैक्षणिक पार्श्वभूमी. एकच जवळची गोष्ट होती ती म्हणजे पाठरेंची आई शिवणकला शिक्षिका होती. त्यामुळे पाठारेंना थोडेफार गारमेंट्सचे नॉलेज होते.

त्या जोरावर त्यांनी काहि शिलाईमशीन खरेदी केले व छोट्याशा गाळ्यात आपल्या कंपनीची स्थापना केली. त्या काळातल्या पद्धती प्रमाणे कापड, इलॅस्टिक ते बाहेरून विकत आणायचे आणि ते शिवणमशीनवर जोडून “अंडरपँट” बनवायचे.

लोकल मार्केट मध्ये त्याची “VIP” ब्रॅण्डच्या नावाने विक्री केली जावू लागले. मध्यमवर्गाला VIP असल्याचा सुखद आनंद मिळू लागला. 

रेड्डी आणि पाठारे हे दोघे पण इंजिनियर असल्याने त्यांना “आउट ऑफ बॉक्स” जाऊन विचार करायची सवय होती. ग्राहकांना आपण वेगळं काय देऊ शकतो हा विचार सतत त्यांच्या डोक्यात चालू असायचा. त्यातून त्यांनी स्वतःच्या फॅक्ट्री मध्ये कापड , इलेस्टिक बनवायचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी डॉबीलूम सारख्या मशिनरी बाहेरच्या देशातून मागवल्या. 

यामुळे VIP च्या अंडरगारमेंटसची क्वालिटी स्पर्धेतल्या इतर भारतीय कंपन्या पेक्षा खूप दर्जेदार ठरली. त्यांचा टिकाऊपणा वादातीत होता. त्यांनी त्याचं जोरदार मार्केटिंग केलं. 

पहिलवान आणि बलदंड अभिनेता दारासिंग ला घेऊन त्यांनी एक जाहिरात केली ज्याची टॅग लाईन होती “मजबूत ऐसा दारासिंग जैसा”. ही जाहिरात खूप हिट झाली.

भारतात फ्रेंन्ची आणणारा माणूस म्हणजे VIP वालेच ! 

नाविन्याचा ध्यास असलेले या तरुणांनी ऐंशीच्या दशकात एक नवा प्रयोग केला. त्यांनी ब्रीफ (मिनी अंडरपँट ) भारतात आणली आणि तीला नांव दिल फ्रेंची. आज भारतात ब्रीफला फ्रेंची म्हणूनच ओळखतात इतके त्यांचे समीकरण जुळले आहे. 

पुढे जागतिकीकरणानंतर अनेक विदेशी ब्रॅण्ड भारतात आले पण तरी स्वतःमध्ये इमप्रूव्हमेंट करत करत VIP आजही आपले पाय इंडस्ट्रीमध्ये पाय रोवून उभी आहे.

पुढे २००८ साली पाठारे आणि रेड्डी हे दोन्ही पार्टनर वेगळे झाले. 

VIP ब्रंड मधून स्त्रियांच्या लॉन्जरी सेक्शन वेगळा झाला आणि तो रेड्डींकडे आला. आज लव्हेबल  लॉन्जरे तरुणींमध्ये खूप फेमस आहे. भारताच्या अंडरगारमेंट क्षेत्रात एकप्रकारची क्रांती करणारी VIP चे दोन्ही संस्थापक आज ह्यात नाहीत.

२०१६ साली पाठारे आणि त्या पाठोपाठ दोन वर्षांनी जयपाल रेड्डी यांचे निधन झाले. त्याच्या जाण्याची बातमी देखील वर्तमानपत्रात आली नाही. होजिअरी गारमेंट उद्योगात जायंट समजल्या जाणाऱ्या या कंपनीचे संस्थापक नेहमी पडद्याआडच राहिले.

VIP ची ओळख त्यांनी कधी स्वतःची ओळख बनवलीच नाही. आजही VIP ची ओळख ‘खुद्द दारासिंगची न घसरणारी मजबूत चड्डी VIP’ अशीच आहे. 

हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.