जेफ बेझोसच्या कंपनीत महिला सुरक्षित नसल्याचे आरोप त्यांचेच अधिकारी करतायत…

जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस. त्यांची अॅमेझॉन ही ई- कॉमर्स कंपनी जगातली टॉप लिस्टेड कंपनी आहे. आता जेफ बेझोस आपल्या व्यावसायामुळे, प्रसिद्धीमुळे नेहमीच चर्चेत असतात.

आता काही दिवसापूर्वीचं म्हणजेच २० जुलैला जेफ बेझोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीने अंतराळ सफर केली. कंपनीने न्यू शेपर्ड कॅप्सूलमधून चार खासगी प्रवाशांनी अंतराळात प्रवास केला. पृथ्वीच्या बाहेर अवकाशात सुमारे १० मिनिटे घालवल्यानंतर, त्यांचे कॅप्सूल पृथ्वीवर परतले. या प्रवाशांमध्ये जेफ बेझोस, मार्क बेझोस, वॅली फंक आणि ऑलिव्हर डेमन यांचा समावेश होता.

बेजोसच्या या १० मिनिटांच्या प्रवासात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. फक्त १० मिनिटात ५.५ अब्ज डॉलर म्हणजे किमान ४० हजार कोटी खर्च झाल्याचे म्हंटले गेले. त्यांच्या या अंतराळ प्रवासाची चर्चा जगभरातल्या माध्यमांमध्ये होती.

पण सध्या बेझोस चर्चेत आलेत ते त्यांच्यावर लागलेल्या आरोपामुळे.

जेफ बेझोस यांची ‘ब्लू ओरिजिन’ कंपनी १२ ऑक्टोबर रोजी अंतराळात दुसऱ्यांदा उड्डाण करणार आहे. परंतु यापूर्वी कंपनीच्या २१ वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी जेफ बेझोस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, ब्लू ओरिजिनचे वातावरण अतिशय टॉक्सिस आहे.

बेझोस स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क आणि व्हर्जिन गॅलेक्टिकचे संस्थापक रिचर्ड ब्रेन्सन यांना मागे टाकून जिंकण्यासाठी धडपडतायेत. यामुळं ते कर्मचारी वगळता फक्त कंपनीलाचं प्राधान्य देत आहेत. असं म्हंटल जातंय कि, उच्चस्तरीय बैठकीत सर्वात जास्त हाच प्रश्न विचारला जायचा की, मस्क किंवा रिचर्ड कधी अंतराळात जाणार आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना तणावाखाली काम करावं लागतंय.

कंपनीचे माजी कर्मचारी संपर्क प्रमुख अलेक्झांड्रा यांनीही हा मुद्दा अधोरेखित केला. ते म्हणाले-

‘स्पेस कंपनीमध्ये पुरुषांना प्राधान्य दिल जातंय. तर महिलांना वेगळी वागणूक दिली जातेय. येथे महिला सुरक्षित नाहीत. महिला कर्मचारी दिवसेंदिवस लैंगिक छळाला बळी पडत आहेत.

त्यांनी म्हंटल कि, सुरुवातीला सगळं काही सुरळीत चालू होत, परंतु नंतर मस्क आणि रिचर्ड रेसमध्ये पुढे निघून गेल्याचं पाहून जेफ अस्वस्थ होऊ लागले. आणि नंतर ऑफिसमधलं वातावरणचं बिघडलं.

कंपनीतल्या अनेक महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार आहे की, त्यांना ‘बेबी गर्ल’, ‘बेबी डॉल’ किंवा ‘स्वीटहार्ट’ नावानं हाक मारली जातेय. एवढंच नाही तर कंपनीचे उच्च अधिकारी महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारलं जातंय. 

यासोबतच असाही दावा केला जातो की, कंपनीचे अधिकारी महिलांचे मतही घेत नाहीत. अलेक्झांड्रा म्हणाल्या की, ब्लू ओरिजिनच्या एका अधिकाऱ्याने नासाच्या माजी अंतराळवीरांना सांगितले की, तुम्ही स्त्रियांऐवजी माझा सल्ला घ्या, कारण मी एक पुरुष आहे आणि महिलांपेक्षा चांगले मत देऊ शकतो.

दरम्यान, ब्लू ओरिजिनच्या प्रवक्त्याने हे सगळे आरोप फेटाळून लाफावलेत. त्यांनी म्हंटल कि-

‘अलेक्झांड्राला दोन वर्षांपूर्वी कंपनीतून काढून टाकण्यात आले आहे. ब्लू ओरिजिनच्या कोणत्याही कर्मचाऱ्याविरुद्ध भेदभाव किंवा छळाची अशी कोणतीही घटना नाही. हे सर्व टाळण्यासाठी आणि तक्रार करण्यासाठी कंपनीने कर्मचाऱ्यांना हॉटलाइनची सुविधा दिली आहे. हे २४ तास कार्यरत असते. तक्रार प्राप्त होताच कंपनी तातडीने याविरुद्ध कारवाई करते.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.