नटीचा फोटो शोधायला होणारी तडफड बघितली आणि गुगलनं इमेज सर्च चालू केलं

शाळेतल्या कंप्युटर लॅबची एक वेगळीच गोष्ट होती. आठवाड्यातनं फक्त एकदाच दोन तास कॉप्युटरचं लेक्चर व्हायचं. मग त्यासाठी वेगळी कंप्युटरची लॅब असायची. आयुष्यातली पहिली एसीची हवा  कंप्युटर लॅबमध्येच खाल्लेली.  तिथल्या मॅडम पण वेगळ्या. पेंट आणि एम एस वर्डच्या पुढे मॅडमनी काय शिकवली नाही पण मॅडमच अशा असायचा की एकटक लक्ष त्यांच्याकडेच राहायचं. आणि मग सतराशेसाठ इंस्ट्रक्शन दिल्यानंतर शेवटी दोघांत मिळून एक कंप्युटर वापरायला मिळायचा.

 त्यात तो काळ होता ऐन वयात येण्याचा…

मॅडमनी जरी पेंटची प्रॅक्टिस करायला सांगितली असली तरी आम्हाला वेगळीच चित्र बघायची असायची. त्यात इंटरनेटवर  ‘तसलं’  लै फोटो असतेत एवढंच कळालेलं. मग गुगल वर जायचं आणि हेरॉईनच्या नावापुढं हॉट टाकायचं असले आमचे धंदे चालायचे.

पण आता जेव्हा याच कारणामुळं गुगल इमेजचा शोध लागला असं कळलं तेव्हा मात्र सगळं पाप धुवून निघाल्याचं समाधान मिळालं. 

तर हेरोइनचं नाव होतं जेनिफर लोफेझ. आज वयाच्या ५२व्या वर्षी पण आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी जे लो तेव्हा ३० वर्षांची होती. २०००सालच्या ग्रॅमी अवॉर्ड्सचं तिला खास निमंत्रण होतं. सिंगर, डान्सर आणि एक्ट्रेस असा ऑलराऊंडर प्रोफाइल असलेली जेलो  ग्रॅमी अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटचं मेन आकर्षण असणार हे तर फिक्स होतं.

मात्र त्यादिवशी जेनिफर लोफेझने हिरवा ड्रेस घालून वातवरण एवढं तापवलं की या ललनेच्या हॉटनेसचा जलवा पार जगभर पसरला. 

कार्डिशियन बहिणी आता न्यूड फोटो टाकून इंटरनेटवर ब्रेक करण्याची भाषा करत असल्यातरी ओरिजनल गँगस्टर तर जेलोच होती. 

 108894136 gettyimages 2279427

जेनिफर लोपेझच्या या ग्रीन ड्रेसमध्ये रेड कॉर्पेटवर आग लागली होती. तिचा हा जलवा जेव्हा जगभरातल्या रसिकांच्या कानावर पडल्या तेव्हा त्यांनी इंटरनेटवर उड्या मारत तो फोटो सर्च करायला सुरवात केली. सगळं गुगलवर भेटतंय हे २०००पर्यंत सिद्ध झालं होतं. त्यामुळं गुगलवर लागलीच जेलोच्या त्या अवतारातील एक झलक बघण्यासाठी सर्चिंग चालू झालं.

मात्र त्यावेळी एक इशू होता…

गुगलवर फक्त टेक्स्ट सर्चिंगच व्हायचं. गुगलची स्थापना १९९८ मध्ये झाली होती, परंतु गुगल इमेजेसचा ऑप्शन जुलै २००१ पर्यंत साइटवर नव्हता.  त्यामुळं लोकांना jenifar lopez hot in green dress असं काहीतरी टाइप करून सर्च रिझल्टमधली प्रत्येक साईट उघडून बघायला लागायची.

गुगलचे माजी सीईओ आणि कार्यकारी अध्यक्ष एरिक श्मिट यांनी २०१५ मध्ये प्रोजेक्ट सिंडिकेटवर याबाबत लिहिले होते

“लोकांना केवळ टेक्स्टपेक्षा अधिक काहीतरी हवं होतं. २००० च्या ग्रॅमी अवॉर्ड्सनंतर हे पहिल्यांदा स्पष्ट झालं, जिथे जेनिफर लोपेझने हिरवा ड्रेस परिधान केला होता, त्याने जगाचे लक्ष वेधून घेतले होते. त्या वेळी, आम्ही पाहिलेली ती सर्वात लोकप्रिय सर्च क्वेरी होती. परंतु आमच्याकडे वापरकर्त्यांना जे हवे आहे ते त्यांना देण्याचा कोणताही निश्चित मार्ग नव्हता. आणि यातूनच गुगल इमेज सर्चचा जन्म झाला.”

पण हे एवढं सोपं होतं का?

एका रात्रीत गुगल इमेज आला का?

तर नाही.

गुगल इमेजेसचे इंजिनेरींग आणि प्रोडक्शन संचालक कॅथी एडवर्ड्स यांच्या मते, हे एका रात्रीत झालं नव्हतं, परंतु लोपेझ निश्चितपणे प्रेरणा होती. तेव्हा  कंपनी फक्त दोन वर्षांची होती त्यामुळे कर्मचारी खूपच कमी होते.

मग त्यानंतर, गुगलने नुकतीच कॉलेज ग्रॅज्युएट झालेल्या हुइकन झू याला इंजिनिअर म्ह्णून घेतले. त्याने  YouTube च्या सध्याच्या CEO  सुसान वोजिकी ज्या त्यावेळी उत्पादन व्यवस्थापक होत्या, यांच्यासोबत भागीदारी केली आणि या दोघांनी मिळून जुलै २००१ मध्ये गुगल ईमेजेस लाँच केले. 

बाकी आपल्या जेलोची हवा झाली ती कायमचीच. २०२० मध्ये पण तिनं ही मुव्हमेंट ऱिक्रेयेट केली होती. 

4518

आणि तेव्हापण ५० वर्षाच्या जेनिफर लोपेझ तेव्हढाच राडा घातला होता.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.