फक्त भारतातच नाही तर जगाच्या राजकारणात देखील शापाचं राजकारण चालतं !

आता राजकारणात सगळं चालतं असं आपल्यात म्हणतात. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी फिरून येऊन तिथंच जुळतात. त्यातल्या त्यात “राजकारण करत असताना अध्यात्माची बैठक पक्की असायला पाहिजे” असं नाना पाटेकरांनी ‘देऊळ’मध्ये सांगून ठेवलं आहे. त्यामुळं अध्यात्म हा राजकारणाचा महत्त्वाचा भाग झालाय हे कोण नाकारणार! त्यामुळं ओढुनताढुन आता अध्यात्मातल्या सगळ्या घटकांना बळजबरीने का होईना, राजकारणात पडणे भाग आहे. यातलाच एक मुद्दाय तो म्हणजे शाप!

राजकारणाला शाप काही नवीन नाहीत. लोकांच्या मनावर अशाच गोष्टींचा अफाट पगडा असतो. राजकारण गाजवणाऱ्या अशाच काही कुप्रसिद्ध शापांची मोठी जंत्रीच इतिहासात सापडते. तुम्हाला वाटेल हा फक्त पुराणं-कथानकं यांचा भाग आहे! ना! शहाण्या म्हणवल्या जाणाऱ्या देशांतल्या लोकांनीही यावर उड्या मारत हे विषय चवीने चघळत नेले आहेत.

त्यातला सगळ्यात फेमस शाप आहे तो केनेडी परिवारावरचा!

१९४४ सालापासून ते आजतागायत अमेरिकेच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या केनेडी घराण्याच्या इतिहासाला हा शाप असल्याचं जगभर बोललं जातं.

पी. जे. केनेडी नावाचा माणूस आयर्लंडमधून आपलं नशीब अजमावायला अमेरिकेत आला होता. तिकडं तो फक्त न्हावीकाम करायचा. पडलेल्या दुष्काळात आणि इंग्लंडच्या जुलुमात अनेक लोकं मेली होती. आयर्लंडची स्मशानभूमी झाली होती. एकतर भारतात जाऊन इंग्रजांच्या फौजेत सहभागी होणे किंवा अमेरिकेत जाणे असे दोनच मार्ग लोकांसमोर होते. पण काही क्रांतिकारक आयर्लंडला स्वतंत्र करण्यासाठी लढा उभारत होते.

कॅथलिक चर्चचा लोकांवर वाढता प्रभाव होता. त्यात असंख्य लहानसहान मुलं-स्त्रिया मारल्या गेल्या. या सगळ्यांच्या मृत्यूमुळे आयर्लंडला स्वातंत्र्य देण्यासाठी लोक लढत होते. जो लढणार नाही आणि पळून जाईल त्यांच्यावर शाप लागेल असा फतवा काही चर्चेसने काढला होता.

पण पी. जे. केनेडी याला ना जुमानता अमेरिकेत गेला. त्यानं आपलं बस्तान बसवलं.

त्याचे दोन्ही भाऊ कॉलऱ्याच्या रोगात मरण पावले. पण तो डगमगला नाही. १९०० सालच्या आसपास त्याने बोस्टनमध्ये सुरु केलेलं सलून अफाट चाललं. बक्कळ पैसे आले. डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये त्याने रस घेतला, तेव्हा पूर्व बोस्टनमधून तो सांगेल तो उमेदवार निवडून यायचा एवढी प्रसिद्धी आणि पैसा त्याने जमवला. पोरंबाळं राजकारणात जाऊन मोठी झाली. आणि अचानक घराण्यावरचा शाप सुरु झाला.

हा शाप अमेरिकेच्या इतिहासात “केनेडी शाप” म्हणून कुप्रसिद्ध आहे!

त्यांचा पोऱ्या जोसेफ पी. केनेडी याचा पहिला बळी ठरला. १२ ऑगस्ट १९४४ रोजी त्याचा अपघाती मृत्यू झाला. विमान अपघातात हा मृत्यू झाल्याचं वर्तवलं गेलं. पण नंतरच्या काळात याची सरबत्तीच सुरु झाली. एव्हाना परिवारातले सगळे मोठे मुलंबाळं मोठमोठ्या सरकारी हुद्द्यावर होते. पण सगळ्यांना अकाली मृत्यू येत गेले. यात खून आणि विमान दुर्घटनांचा प्रामुख्यानं समावेश होता.

कॅथलिन केनेडी या माणसाचा १३ मे १९४८ ला पुन्हा विमान अपघातात मृत्यू झाला. ९ ऑगस्ट १९६३ ला पॅट्रिक केनेडी एका श्वसनाच्या आजाराने मृत्युमुखी पडला. त्याचा जन्म विमानतळावर झाला होता.

सगळ्यात गाजलेला प्रसंग म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन फ. केनेडी यांचा. टेक्ससमध्ये ली ऑस्वाल्ड नावाच्या माणसानं एकट्याच्या जीवावर गोळीबार करून गाडीतून जात असलेल्या जॉन फ. केनेडीचा वेध घेतला. त्यानंतर लोकांनी या शापाकडे सिरियसली बघायला सुरुवात केली.

यांचेच बंधू रॉबर्ट केनेडी हे त्याहून जास्त प्रसिद्ध होते. ५ जून १९६८ साली राष्ट्राध्यक्षपदाच्या प्राथमिक फेरीत ते जिंकून आले. बॉबी केनेडी आता राष्ट्राध्यक्षपद मिळवतंय असं सगळ्यांना वाटलं. पण त्याच रात्री अँबेसिडर हॉटेलमध्ये त्यांचा खून करण्यात आला. २५ एप्रिल १९८४ ला डेव्हिड केनेडी यांचा मृतदेह पाल्म बीचवर आढळून आला होता. 

१९९७ साली मायकल केनेडी, ९९ साली जॉन फ. केनेडी धाकले हे विमान अपघातात वारले. हि सगळी ऐन तारुण्यात असलेली, जनतेची आवडती मंडळी होती. यात जॉन फ. केनेडी धाकले यांची बायकू आणि मेव्हणीसुद्धा वारली होती. 

हा शाप आजतागायत सुरु आहे असं म्हटलं जातं.

टेड केनेडींची तरणीबांड पोरगी कारा केनेडी २०११ साली मरण पावली. १६मे  २०१२ ला धाकल्या बॉबी केनेडींची पत्नी मेरीबाई यांनी आत्महत्या केली तेव्हा प्रचंड कल्लोळ झाला होता. 

नुकताच १ ऑगस्ट २०१९ ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन फ. केनेडीयांचे बंधू रॉबर्ट केनेडी यांची नात रोईंजिन केनेडी-हिल हिमॅच्याच्युसेटयेथील केनेडी कंपाउंड बंगल्यात मृत्युमुखी पडलेली आढळली होती. इंस्टाग्रामवर फेमस असणारी हि पोरगी गेल्यानंतर या शापाची जोरदार चर्चा सुरु झाली. केनेडी परिवारांच्या अनेक चाहत्यांनी तर पूजाअर्चा करायला सुरुवात केली होती. 

पण त्याचा काही उपयोग झाला नाही. या वर्षीच एप्रिल महिन्यात मिव केनेडी मॅकिन आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा गिडन मॅकिन शेजपिकी बे वरून गायब झाले होते. ४ दिवसांनी मिव केनेडी मॅकिनहिचा मृतदेह सापडला. गिडन मॅकिन याचा मृतदेह सापडायला ८ दिवस लागले होते.

फक्त पोराबाळांवरच हा शाप होता अशी समजूत होती. पण नंतरच्या काळात त्यांचा मित्रपरिवार, सहकारी, नातेवाईक या सर्वावर याची धाड पडली असं ABC न्यूजसारख्या मोठ्या माध्यमांनीही मांडलं. अजूनही याची धास्ती अमेरिकन जनतेत लोकांना वाटत राहते.

असाच अमेरिकेच्या इतिहासात अजून एक कुप्रसिद्ध असणारा शाप म्हणजे टिपिकानु शाप! १८४० ते १८६० या वर्षांमध्ये या शापाने तब्बल ८ अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना यमसदनी पाठवले होते.

 

या शापाचा पहिला शोध रिप्लेज बिलिव्ह इट ऑर नॉट या मासिकाने लावला होता. १९४० मध्ये निवडून आलेलं विलयम हेन्री यांच्यापासून व्हाईट हाऊसला हा शाप लागला असं म्हणतात.त्या वेळी मासिकाने आढावा घेत स्थानिक रेड इंडियन लोकांसोबत टिपिकानु येथे झालेल्या लढाईचा संदर्भ देत हा शाप असल्याचं छापलं होतं.

१९४० मध्ये निवडून आलेलं विलयम हेन्री यांच्यापासून व्हाईट हाऊसला हा शाप लागला असं म्हणतात. त्यानंतर पुढची वीस वर्षे व्हाईट हाऊसमध्ये राहणाऱ्या बहुतेक राष्ट्राध्यक्षांना हा शाप भोगावा लागला. १८६० साली अब्राहाम लिंकन, १८८० साली जेम्स गारफिल्ड, १९०० साली विल्यम मॅकिन्ली, १९४० साली फ्रँकलिन रुझवेल्ट या सगळ्या राष्ट्राध्यक्षांचा गेम याच शापामुळे झाला होता.

असाच शाप सगळ्यांचे लाडके जोसेफशेठ स्टालिन यानाही लागला होता असं म्हणतात. उझबेकिस्तान सोव्हियेत रशियात आल्यावर प्राचीन इतिहासाचं प्रचंड मोठं संशोधन आणि संवर्धन या काळात झालं होतं. स्टालिन यात जातीने लक्ष देत असे. त्यातच मंगोलच्या सुप्रसिद्ध राजा तैमूरची कबर तिथे सापडल्याची चर्चा सुरु झाली. शास्त्रज्ञांनी त्यातून मृतदेह तपासून पाहण्यासाठी ती उकरण्याचे ठरवले.स्थानिक जनतेने या प्रकाराला विरोध केला.

जो कोणी तैमूरच्या कबरीला त्रास देतो त्याचे शासन तैमुरी शापामुळे बुडते असा लोकांचा दावा होता. 

याला न जुमानता त्याचे उत्खनन करण्यात आले.  पुढल्या आठवड्यातच हिटलरच्या जर्मनीने आपल्या प्रचंड सैन्यानिशी सोव्हिएत रशियावर चढाई केली. जगाच्या इतिहासातील ती सगळ्यात मोठी लढाई होती. जर्मनीच्या केवळ २० तुकड्यांशी अमेरिका, इंग्लंड, युरोप एकत्र येऊन लढत होते. तरी त्यांच्या नाकी नऊ आले आणि जर्मनी पुढेच सरकत होती.

आणि इकडे हिटलरच्या तब्बल ३०० हुन जास्त डिव्हिजन रशियात शिरल्या होत्या. काही आठवडयातच ३०० मैलांचा प्रदेश त्यांनी पादाक्रांत केला. अर्थात नंतर रेड आर्मीने हिटलरला कायमचा गाडून टाकला पण यामागे तैमुरी शाप असल्याचं उझबेक लोकांचं मत होतं.

पण आमचा सगळ्यात फेव्हरेट शाप आहे तो मॅकबेथचा! शेक्सपियरने त्याला अजरामर केला खरा, पण हा मॅकबेथ १०४० ते १०५७ या काळात स्कॉटलँडचा राजा होता. त्याने ज्या राजाचे राज्य हिसकावून घेतले होते त्याने आपल्या मृत्यूवेळी “ह्या घराण्यातील लोक मृत्यू पावतील” असा शाप दिला होता. मॅकबेथला जेव्हा हि गोष्ट समजली तेव्हा

 “मी कोणापुढे झुकून हार मानणार नाही. कुण्या ओरडणाऱ्या चेटकिणींच्या शापावरती माझा विश्वास नाही “ अशी गर्जना त्याने केली.

त्याने मॅकडफशी लढा दिला. यात त्याला त्याच्या परिवारासोबत जीव गमवावा लागला होता.

नंतर हे नाटक करणाऱ्या नाटक कंपन्यांना आणि नटांना ग्रहण लागते असाही शाप इतिहासात पसरला. ४०० वर्षांत अनेक नाटक कंपन्यांवर ती वेळ आली आहे. अर्थात याच्यावर विश्वास ठेवायचा का नाही हे ज्यानंत्यानं विवेक वापरून ठरवायचं!

 

हे हि वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.