इज्जत वाचवण्यासाठी जितेंद्रला तब्बल पाच हजारांची तिकीट तिकिटं विकत घ्यावी लागली होती

बॉलिवूडचा जम्पिंग जॅक म्हणून ओळखला जाणारा एकमेव माणूस म्हणजे जितेंद्र. बॉलिवूडमध्ये एक ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून जितेंद्र आला होता पण नंतर आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने इतकी मोठी मजप मारली की त्याच्यासारखा फिमेल फॅनबेस कुणाचा झाला नाही. बॉलिवूडचा लिजेंड हँडसम हंक म्हणून जितेंद्रला ओळखलं जातं. आपल्या अभिनयाने आणि डान्सच्या एका वेगळ्या शैलीने लोकांच्या मनावर राज्य केलं. जेव्हा जेव्हा बॉलिवूडच्या टॉप सेलिब्रिटी लोकांचा उल्लेख येतो तेव्हा एपिक डायलॉग बोलणारा आणि डान्सर जितेंद्रचा चेहरा समोर येतो. पण याच सुपरस्टार जितेंद्रला एकदा स्वतःचाच पिच्चर पाहण्यासाठी पाच हजारांचं तिकीट काढावं लागलं होतं त्याबद्दलचा हा किस्सा.

बॉलिवूडमध्ये काम मिळेल या आशेने जितेंद्र काम शोधत भटकत होता. दिग्दर्शन लोकांचे उंबरे झिजवत होता. एखादं काम गाजेल आणि आपल्याला अजून कामं मिळतील याची जितेंद्रला आशा होती. याच काळात त्याला एक माणूस भेटला तो होता रविकांत नागाईच. हा रविकांत नागाईच त्याकळातला सगळ्यात जबऱ्या कॅमेरामन होता. जेव्हा जितेंद्र स्ट्रगल करत होता तेव्हा त्याला रविकांत नागाईचच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली. रविकांत दिग्दर्शक आणि जितेंद्र हिरो. रविकांत नागाईचने एक स्क्रिप्ट लिहिली होती आणि तो सिनेमा बनवू इच्छित होता, सिनेमाचं नाव होतं फर्ज.

या सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन रविकांत नागाईच नामवंत अभिनेते लोकांचे उंबरे झिजवत होता. कारण दिग्दर्शक म्हणून नागाईचची पहिलीच फिल्म होती आणि तो कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ इच्छित नव्हता. ज्या ज्या हिरोच्या घरी तो जायचा तिथून त्याला नकार मिळायचा. शेवटी कुठूनतरी जुळून आलं आणि रविकांतला जितेंद्रचं नाव समजलं.जीतेंद्र तेव्हा बेक्कार स्ट्रगल करत होता जेव्हा नागाईचने त्याला स्क्रीप ऐकवली लागलीच त्याने होकार कळवला.

जितेंद्रने होकार दिल्यावर फिल्मचं काम सुरू झालं आणि फिल्म जेव्हा शेवटच्या टप्प्यात आली तेव्हा जितेंद्र आणि नागाईच या दोघांना वाटत होतं की ही फिल्म सुपरहिट होणार. पण जेव्हा थेटरात हा सिनेमा लागला तेव्हा तो दणकून आपटला. सिनेमाचा गल्ला रिकामाच राहिला. काही आठवड्यानंतर सिनेमा थेटरात ठेवणं मुश्किल झालं होतं. जितेंद्र आणि रविकांत दोघेही निराश झाले पण यावर जितेंद्रने एक आयडिया लावली.

जितेंद्र तेव्हा स्ट्रगल करत होता जर पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला तर आपल्याला इंडस्ट्रीत कोणी काम देणार नाही म्हणून सिनेमा हिट करायच्या उद्देशाने जितेंद्रने थेट पाच हजारांची तिकिटं विकत घेतली. ही पाच हजारांची तिकिटं त्यानं लोकांमध्ये फ्रिमध्ये वाटून टाकली आणि लोकांची माऊथ पब्लिसिटी सिनेमा हिट करून गेली आणि गर्दी खेचू लागली. नव्याने लोकं थेटरात जाऊन फर्ज सिनेमा बघू लागले. समीक्षक लोकांनी आधीच या सिनेमाला फ्लॉप सिनेमा म्हणून घोषित करून टाकलं होतं पण जितेंद्रच्या आयडियाने कमाल केली आणि सिनेमा सुपरहिट झाला.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.