जितेश अंतापूरकरांचा विजय म्हणजे अशोक चव्हाणांचा विजय.

राज्यात झालेल्या आणि आगामी काळात होणाऱ्या सर्व पोटनिवडणुकिंमध्ये सर्वात गाजलेली निवडणूक म्हणजे नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा पोटनिवडणुक होय. ज्यामध्ये काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांनी बाजी मारली आहे. जितेश अंतापूरकर यांनी भाजपच्या सुभाष साबणेंचा पराभव करत त्यांनी ४१ हजार ९३३ मतांनी विजय मिळवला आहे. 

याच मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे रावसाहेब अंतापूरकर यांनी शिवसेनेचे उमेदवार सुभाष साबणे यांचा २२ हजार मतांनी पराभव केला होता. रावसाहेब अंतापूरकर यांचेच पुत्र म्हणजे जितेश अंतापूरकर होय. काही महिन्यांपूर्वी रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाले त्यामुळे पोटनिवडणुकीत काँग्रेसने रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे. 

 हि निवडणूक चांगलीच चर्चेत होती कारण, महाविकास आघाडी आल्यामुळे लोकांचा कल महाविकास आघाडीकडे आहे की भाजपकडे आहे हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार होतं त्यामुळे हि निवडणूक महत्त्वाची होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या सर्वात  या मतदारसंघात पूर्वीपासूनच अंतापूरकर आणि साबणे हे दोनच नेते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत होते. या दोन घराण्यांनी हि कायमच निवडणूक गाजवली होती. 

आत्ताच्या निवडणुकीत देखील या दोन्ही घराण्यांचे दोन तुल्यबळ प्रतिस्पर्धी असतानाच वंचित बहुजन आघाडीने उच्चशिक्षित उमेदवार या रिंगणात उतरवून या निवडणुकीला रंजक वळण दिले होते.

या देगलूरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात भाजप असेच चित्र निर्माण झाले आहे. एकूण १२ उमेदवार या निवडणुकीत उभे होते.

देगलूर बिलोली विधानसभा मधील हि पोटनिवडणुकीमध्ये  महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण नांदेड जिल्ह्यातील हे दोन्ही तालुके तेलंगणा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर  शेवटचे तालुके आहेत.  देगलूर विधानसभा क्षेत्रात देगलूर आणि बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे. तर यावेल्स झालेले असं कि, महाविकास आघाडी झाल्याने निवडणूक लढवता येणार नाही म्हणून शिवसेनेचे साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपचे उमेदवार होऊन हे निवडणूक लढवली होती.

जेंव्हा महाविकास आघाडी स्थापन झालेली तेंव्हा देगलूरच्या मतदारसंघाचं तसेच एकूणच राज्यात असं ठरलं होतं कि, ज्या सदस्यांच्या घरी, कुटुंबात दुर्दैवी घटना घडली, तर सबंधित सदस्य सत्तेत असेल आणि काही दुर्दैव घडलं तेंव्हा तो व्यक्ती ज्या कोणत्या पक्षाचा असेल त्याच पक्षाला जागा दिली जाईल असे ठरले होते. 

अशोक चव्हाण आणि जितेश अंतापूरकर

जेंव्हा काँग्रेसचे उमेदवार जितेश रावसाहेब अंतापूरकर यांच्या उमेदवारीचा अर्ज भरण्यात आला होता. त्यानंतर प्रचारसभा घेण्यात आल्या. तेंव्हाच अशोक चव्हाण यांनी जाहीररीत्या सांगितले होते कि, “जितेशला निवडून द्या, अंतापूरकरांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करतो !”.  

ते असंही म्हणाले कि, अंतापूरकर कुटुंबाचे अश्रू अजून सुकले नाहीत, आम्ही ठरवले आहे कि, अंतापूरकर परिवाराला काँग्रेस पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. त्याचबरोबर, भविष्यात अंतापूरकरानी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचं मी ठरवलं आहे”

अशी ग्वाहीच अशोक चव्हाण यांनी दिलीये. अशोक चव्हाण नेहेमीच जितेश अंतापूरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.  त्यांनी मतदारसंघातल्या जनतेला हे हि स्पष्ट केले कि, सर्वांच्या सहमतीने ही जागा काँग्रेसला देण्यात आली. सर्वांच्या सहमतीने आम्ही उमेदवार दिला. यामध्ये मी कुठे एकाधिकारशाही केली नाही आणि करणार नाही.

दिवंगत रावसाहेब अंतापूरकर हे सर्वसामान्य कुटुंबातले होते. त्यामुळे त्यांच्या पश्च्यात जितेश यांना  मतदारांची सहानुभूती मिळेल असा विश्वास काँग्रेसला होता. आणि असंच झालं.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.