४५ वर्षात पुण्याच्या J.M. रोडवर एकही खड्डा पडला नाही. हा चमत्कार कसा घडला ?

भिडू मग बीडचा असुद्या अथवा कोल्हापूरचा पुण्यात आल्यावर फर्ग्युसन कॉलेज रस्ता आणि जंगली महाराज रस्त्यावर फेर फटका मारणार नाही हे शक्य नाही.

शहरातील सर्वात वर्दळीचे रस्त्यांपैकी एक असणाऱ्या जे. एम. रत्यावर एकही खड्डा कसा नाही असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्यामागे फार मोठा इतिहास आहे. 

१९७२ मध्ये राज्यात दुष्काळ पडला होता हे आपण ऐकून आहोत. मात्र पुढच्या वर्षी म्हणजे १९७३ पुण्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे पुण्यातील शहरातील मुख्य रस्त्यांची चाळण झाली होती. याबाबत नागरिकांबरोबर नगरसेवकांनी सुद्धा महापालिकेच्या सिटी इंजिनियरकडे तक्रार केली होती.

मात्र प्रशासनाने नेहमी प्रमाणे रस्त्यावरील पडलेल्या खड्यांचे खापर पावसावर फोडले. त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा घडून आली होती. याभागातून निवडून येणारे नगरसेवक श्रीकांत शिरोळे यांनी मात्र रस्त्यावरील खड्डे हे पावसामुळे पडत नसल्याने ठणकावून सांगितले होते. त्यासाठी त्यांनी मुंबईतील रस्त्यांचा दाखला दिला होता.

श्रीकांत शिरोळे हे स्थायी समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांना वारंवार मुंबईला जावे लागत होते. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, पुणे शहरापेक्षा मुंबईत जास्त पाऊस पडत होता. तरीही तेथील रस्ते खड्डेमुक्त कसे आहेत काय?

महत्वाचे म्हणजे ७० च्या दशकात मुंबईतील रस्त्यावर आता प्रमाणे खड्डे नव्हते. त्यामुळे श्रीकांत शिरोळे यांनी पुणे महापालिकेतील सिटी इंजिनियरला मुंबईच्या रस्त्याचे उदाहरण दिले होते. त्यावेळी त्यांनी मुंबईतील रस्ते कुठला ठेकेदार करतो याची माहिती घेतली. त्या ठेकेदारांच्या कंपनीचे नाव होते रेकॉन्डो (Recondo).

रेकॉन्डो ही कंपनी दोन पारशी बंधू चालवत होते. श्रीकांत शिरोळे यांनी पनवेल येथे जाऊन या ठेकेदार बंधूची भेट घेऊन जंगली महाराज रस्त्याची माहिती दिली. तसेच या रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्याबद्दल सांगितले.

यावेळी अडीच किलोमीटरच्या रस्ता तयार करण्यासाठी १० लाख रुपये खर्च येईल असे ठेकेदारांच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र पुढे जाऊन हे बजेट वाढेल अशी कल्पना श्रीकांत शिरोळे यांना होती. त्यामुळे त्यांनी ठेकेदाराला सांगितले की, १० लाखांऐवजी १५ लाख घ्यावे आणि चांगला रस्ता तयार करावा अशा सूचना दिल्या होत्या.

यावेळी रेकॉन्डोने पुणे महापालिकेला लिहून दिले होते की, रस्ता बांधून पूर्ण झाल्यानंतर १० वर्षांपर्यंत एक जरी खड्डा पडला तरीही तयार करून देण्याची दावा केला होता. १ जानेवारी १९७६ ला जंगली महाराज रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. ३१ डिसेंबर १९८५ पर्यंत हा रस्ता खड्डेमुक्त राहणार असे रेकॉन्डो कंपनीने लिहून दिले होते.

दरम्यान १० वर्षाच्या काळात या रस्त्यावर एकही खड्डा पडला नाही.  तसेच २०२१ पर्यंत म्हणजे मागील ४५ वर्ष या रस्त्यावर एकाही खड्डा पडला नाही. अपवाद केवळ २०१३ मध्ये रस्त्या लगतची डागडुजी करण्यात आली होती.

WhatsApp Image 2021 10 05 at 12.45.54 PM

जंगली महाराज रस्ता १९७६ मध्ये तयार करण्यात आला असून अजूनही हा रस्ता चांगला आहे.

आता बोल भिडूच्या वाचकांना प्रश्न पडला असेल की, खड्डा पडला तर पुन्हा रस्ता बांधून देईन असे लिहून देणाऱ्या ठेकेदाराने पुणे शहरातील सगळे रस्ते करायला का दिला नाही नाहीत. त्याच असं झालं की, हॉट मिक्स हे टेक्नोलॉजी वापरून रेकॉन्डो कंपनी रस्ते तयार करत होती. पुणे शहरातील ठेकेदारांनी हॉट मिक्स टेक्नोलॉजी वापरून रस्ते बांधायला सुरुवात केली होती.

महत्वाचे म्हणजे जंगली महाराज रस्ता बांधणाऱ्या रेकॉन्डो कंपनी चालविणाऱ्या दोघा पारशी भावांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांनी रस्त्याची नवीन काम घेणे बंद केले होते. त्यामुळे  रेकॉन्डो कंपनीला दुसरे काम देण्यात आले नाही.

विशेष म्हणजे १९७४ मध्ये श्रीकांत शिरोळे हे अवघ्या २१ व्या वर्षी शिवाजीनगर भागातून निवडून आले होते. तसेच २४ व्या वर्षी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले होते. कमी वयात सुद्धा आपल्या कामाची छाप श्रीकांत शिरोळे यांनी पाडली होती.

याबाबत श्रीकांत शिरोळे यांच्याशी बोल भिडूला बोलतांना सांगितले की, अशा प्रकारे पुण्यात रस्ता तयार करण्यात आल्याची बातमी छापून आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शंकरावर चव्हाण यांनी मुंबईला भेटायला बोलाविले होते असे सांगितले.

  • भिडू गजानन शुक्ला

हे हि वाच भिडू 

 

2 Comments
  1. Conscience says

    Please provide English translation also.

  2. Shrikant Mahajan says

    याच प्रमाणे मुंबईतील मरीन ड्राइव्ह सन 1935 च्या सुमारास बांधला होता व तो सुध्दा शाबूत आहे. Vergeese या नावाचा बिल्डर सुध्दा चांगली प्रतिमा बाळगून आहे. खरे तर मुंबईत पाऊस खूप पडतो त्यामुळे डांबरी पेक्षा सिमेंटचे रस्ते असायला हवेत हे ज्यांना पटलं त्या सदाशिव तिनईकर या महापालिका आयुक्तांनी भविष्यात सर्व मुख्य रस्ते केवळ सिमेंटचे होतील जेणे करून वरचेवर खराब होऊन कंत्राटदारांना पैसे कमावता येतील असे डांबरी रस्ते न होण्याची काळजी या धोरणात्मक निर्णयातून घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.