मुस्लिम देशांशी संबंध सुधारावेत म्हणून अमेरिकेनं बिहारी वंशाच्या माणसाला नेमलं आहे..

आज जगभरात भारतीय नागरिक देशाचं नेतृत्व करतायेत. असा क्वचितच एखादा देश  किंवा मोठी आंतराष्ट्रीय संस्था असेल, जिथं भारतीय जाऊन पोहोचला नाहीये.  मग ते नासारख्या अंतराळ संस्थेसोबत काम करणं असो किंवा अमेरिकेसारख्या देशाच्या उपराष्ट्रपती पदावर बसून देश चालवणं असो. या यादीतच आता आणखी एक नाव जोडलं गेलंय. ते म्हणजे राशद हुसैन यांचं.

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडनने भारतीय -अमेरिकन राशद हुसैन यांना आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी अमेरिकन राजदूत (Ambassador-at-Large) म्हणून नियुक्त केलंय. जे धार्मिक स्वातंत्रता पुढे नेण्यासाठी अमेरिकन मुत्सद्देगिरीचं नेतृत्व करतील.  

महत्वाचं म्हणजे या पदावर नेमणूक होणारे ते पहिले मुस्लिम व्यक्ती बनले आहेत.

राशद हुसेन नेमके आहेत तरी कोण ?

४१ वर्षीय हुसैन मूळचे भारतीय वंशाचे आहेत. त्यांची नाळ भारतातल्या बिहारशी जोडलेली आहे. त्यांचे वडील १९६० च्या दशकात व्योमिंगला गेले होते. काही वर्षानंतर त्यांनी भारताचा प्रवास केला, या दरम्यान त्यांनी हुसैनच्या आईशी लग्न  केले. 

हुसेन यांनी  येल लॉ स्कूलमधून कायद्याची डिग्री तर हार्वर्ड विद्यापीठातून अरबी आणि इस्लामिक अभ्यासात मास्टर डिग्री  घेतलीये.

राशद हुसेन सध्या अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलमध्ये पार्टनरशिप अँड ग्लोबल एंगेजमेंटचे डायरेक्टर आहेत. त्यांनी यापूर्वी न्याय विभागाच्या राष्ट्रीय सुरक्षा विभागात वरिष्ठ सल्लागार म्हणूनही काम केल्याच व्हाईट हाऊसनं एका निवेदनात म्हंटलंय.

राशद हे पहिले भारतीय-अमेरिकन होते, ज्यांना तत्कालीन राष्ट्राध्यक्ष ओबामा यांचा डिप्टी असोसिएट काउन्सिल नियुक्त केले होतं. ज्यामुळे २००९ ला त्यांचा जगातील ५०० प्रभावशाली मुस्लिमांच्या यादीत समावेश होता.

राशद हुसैन यांना खासकरून धार्मिक कट्टरतेविरोधात लढण्यासाठी ओळखल जातं. ते धार्मिक स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात. हेच कारण आहे की, त्यांना ओबामा प्रशासनात मोठी जबाबदारीही देण्यात आली होती आणि आता जो बायडननेने देखील त्यांना आपल्या टीममध्ये घेतलंय. 

ओबामा प्रशासनाच्या दरम्यान, राशद यांनी इस्लामिक सहकार्य संघटनेत (OIC) सामरिक दहशतवादविरोधी संवादासाठी अमेरिकेचे विशेष राजदूत आणि व्हाईट हाऊसचे सहाय्यक म्हणून काम केलेय.

एक दूत म्हणून काम करताना हुसेनने शिक्षण, उद्योजकता, आरोग्य, आंतरराष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रात भागीदारी वाढवण्यासाठी ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (OIC) आणि संयुक्त राष्ट्र, परदेशी सरकारं आणि नागरी समाज संघटना यांसारख्या बहुपक्षीय संस्थांसोबत काम केलेय.

एवढंच नाही तर राशद यांनी मुस्लिम बहुल देशांतील ज्यूविरोधी लढण्यासाठी आणि धार्मिक अल्पसंख्यांकांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांचे देखील नेतृत्व केलेय. 

निवेदनात पुढे म्हटले  की, ओबामा प्रशासनात काम करण्यापूर्वी त्यांनी सहाव्या सर्किटसाठी यूएस कोर्ट ऑफ अपीलमध्ये डेमन कीथचे न्यायिक कायदेशीर लिपिक म्हणून काम केले होते आणि ओबामा-बायडन ट्रांजिशन प्रोजेक्टचे सहयोगी वकीलही होते.

दरम्यान, अमेरिकन ज्यू कमिटीने (AJC) आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यासाठी अमेरिकेचे राजदूत म्हणून हुसेन यांची नियुक्ती केल्याबद्दल बायडन प्रशासनाचं कौतुक केलंय. AJC चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड हॅरिस म्हणाले की, राशद हुसैन आव्हानात्मक राजनैतिक संदर्भात धर्माची स्वातंत्रता किंवा विश्वासाचे एक प्रभावशाली अधिवक्ता आहेत.  ‘ 

राशद हुसैन यांनी वेगवेगळ्या देशांच्या सरकारांसोबत काम केलंय. यासोबतच त्या देशातल्या सिव्हिल सोसायटी सोबतही त्यांनी  फार जवळून काम केलय. याच कारणामुळे बायडन सरकारनं त्यांना आपल्या टीममध्ये  महत्वाचं काम दिलंय.

दरम्यान, राशद हुसैन यांच्या नियुक्तीवरून अनेक युक्तिवाद पाहायला मिळतायेत. काही निवडक मुस्लिम देश सोडले तर इतरांशी अमेरिकेचे संबंध जरा खटके उडवणारे आहेत. आणि हेच संबंध सुधारावेत म्ह्णूनचं जो बायडन सरकारनं हुसैन यांची नेमणूक केल्याचं समजतंय. 

सध्याही जेव्हा अफगाणिस्थानात संघर्ष सुरु आहे आणि तालिबानचा उदय होतोय. अश्या परिस्थितीत राशद हुसैन यांना आपली जबाबदारी पार पाडणं जरा कठीण जाणार असल्याचं बोललं जातंय.

हे ही वाचं भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.