पॉर्नचा पहिला सुपरस्टार, त्याची लाईफ आणि त्याचा शेवट एक दंतकथा बनून राहिलाय..

जेव्हा जेव्हा ब्ल्यू फिल्मचा विषय बोलला जातो तेव्हा तेव्हा जॉनी सीन्स याची चर्चा आघाडीवर असते. पोर्नोग्राफिक सिनेमा यावर सोशल मीडियावर मिम्स बनवले जातात त्यावेळी जॉनी सीन्सचा चेहरा लावलेला दिसतो. पण जॉनी सीन्स पोर्नोग्राफीच्या मार्केटमध्ये आलेला पण नव्हता तेव्हा एकच भिडू होता जो एक्स फिल्मचा किंग म्हणून ओळखला जायचा. पण हा जितका फेमस होता तितकाच मोठा घोळ त्याच्या निधनानंतर झाला होता. मर्डर मिस्ट्री म्हणून जॉन होम्सची केस ओळखली जाते.

तर अगोदर जॉन होम्सबद्दल जाणून घेऊया. १९६० ते १९८० याकाळात हॉलिवूडमध्ये पोर्नोग्राफीने कहर केला होता. हजारो अमेरिकन पॉर्न क्लिपचा नायक हा जॉन होम्स असायचा. पण पॉर्न इंडस्ट्रीमध्ये येण्याअगोदर जॉन होम्स हा मॉडेल म्हणून इंडस्ट्रीत आला होता. त्याही अगोदर जॉन होम्स हा सैन्यात भरती होऊन पश्चिम जर्मनीमध्ये तीन वर्ष कार्यरत होता.

पश्चिम जर्मनीतली सेवा सोडल्यानंतर दक्षिणी कॅलिफोर्नियामध्ये ऍम्ब्युलन्स चालक, घरगडी आणि डोअर टू डोअर सेल्समन अशा नोकऱ्या त्याने केल्या. [ याच नोकऱ्या पुढे पोर्नोग्राफीत रोल म्हणून मिळतील याची कल्पनाही होम्सने केली नसेल ] चांगली सडपातळ बॉडी असलेला होम्स हळूहळू मॉडेलिंगकडे वळला. जेव्हा तो न्यूड पोझ देऊ लागला तेव्हा त्याची छायाचित्रे ब्लु फिल्म बनवणाऱ्या काही निर्मात्यांच्या हाती लागली.

जॉनी वॉड हि त्याची पहिली फिल्म होती. १९७० च्या काळात युरोपमधला सगळ्यात नामांकित पॉर्नस्टार म्हणून जॉन होम्स ओळखला जाऊ लागला. हॉलीवूडमधल्या टॉप पॉर्न मॉडेल्ससोबत त्याने काम केलं होतं. होम्सचे इंडस्ट्रीत बरेच मित्र होते ते सांगतात कि जॉनने ज्या ज्या स्त्रियांबरोबर सेक्स केला त्यांच्याबरोबर त्याने कधी राजकारण केलं नाही कारण पॉर्न इंडस्ट्रीमध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात चालतो.

जॉन होम्सची खासियत म्हणजे त्याचं लिंग हे पॉर्न मॉडेलमध्ये चर्चेत असायचं. सगळ्यात मोठं लिंग असल्याची चर्चा तेव्हा जॉनची व्हायची. पेनीस साईझ हा तेव्हा कळीचा मुद्दा बनला होता. अडल्ट फिल्मचा इतिहासकार बिल मार्गोल्ड सांगतो कि गुढग्यापर्यंत जाईल इतकी मोठी साईझ जॉनच्या लिंगाची होती. तेव्हाच्या जाहिरातदार कंपन्या जॉनच्या लिंगाची जाहिरात हे सेक्स टूल म्हणून वापरत असायचे. 

याच लिंगाच्या साईझमुळे जॉन कॉंट्रोव्हर्सीमध्येसुद्धा अडकला होता ते म्हणजे जॉनच पेनीस इरेक्शन हे इतरांपेक्षा जास्त होतं. डोक्यापासून लिंगापर्यंत रक्त पोहचायला बराच काळ जॉनला लागतो असा जोकसुद्धा तेव्हा पॉप्युलर होता. जेव्हा जेव्हा त्याला त्याच्या लिंगाच्या साईझवरुन ट्रोल केलं जायचं त्यावर जॉनचं एकच उत्तर असायचं ते म्हणजे

‘How big is it?’ My fans would scream. ‘Bigger than a payphone smaller than a cadillac was my reply.”
— Actor John C. Holmes in his posthumously-released autobiography, Porn King.

जॉनबद्दल अनेक अफवा होत्या कि पेनीस इरेक्शनमुळे तो अंडरवेअर घालत नसे, एका गे पोर्नमध्ये दोन सहकलाकारांचा जीव जॉनने घेतला होता. पण याहीपेक्षा सगळ्यात जास्त गाजलं ते म्हणजे जॉन होम्सचं मृत्यू प्रकरण.

वंडरलँड मर्डर मिस्ट्री म्हणून प्रकरण चांगलंच गाजल होतं. लॉस एंजेलिसमध्ये वंडरलँड ड्राइव्हवर १९८१ च्या सुमारास एका व्यक्तीच्या हत्येचा आरोप जॉनवर ठेवण्यात आला होता. १११ दिवस तो तुरुंगात राहून आला होता.

इतका काळ जॉन होम्स पॉर्न इंडस्ट्रीत ऍक्टिव्ह होता पण वयाच्या ४३ व्या वर्षी एड्सने त्याचा मृत्यू झाला. पण त्याहीबाबत बरीच मतं आहेत. कोणी म्हणत ड्रग्ज जास्त घेतल्याने त्याचा मृत्यू झाला तर कोणी म्हणत त्याची हत्या करण्यात आली. १९८६ मध्ये तो कर्करोगाने ग्रस्त होता आणि ट्युमर काढून टाकण्यासाठी जॉनने एक शस्त्रक्रिया केलेली होती. त्याच्या मरण्याचं खरं कारण एड्स होतं.

आजही ब्ल्यू फिल्मचा इतिहास चालवला जातो त्यात जॉन होल्म्सच नाव अगोदर घेतलं जातं. जॉनच्या आयुष्यावर सिनेमेसुध्दा आले, पण त्यातले काही काहीच पार्ट सिनेमात वापरू दिले. डॉक्युमेंट्रीजसुद्धा भरपूर आल्या. आज जॉनी सीन्सचं जे मार्केट ब्लु फिल्ममधे आहे ना त्याहून दुप्पट क्रेझ हि जॉन होम्सची होती. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.