जगातल्या सर्वात लोकप्रिय रॉकस्टारला त्याच्याच फॅनने भर रस्त्यात गोळ्या घातल्या होत्या..

इंग्रजी गाण्यांचं वाढतं पेव भारताला काही नवीन नाही. गाणं भलेही नाही कळलं तरी चालेल पण लोकं आवडीने इंग्रजी गाणी ऐकतात. पूर्वीच्या काळी असलेलं बँडचं फॅड अमेरिकेत विलक्षण होतं. ६०-७०च्या दशकात मात्र अमेरिकेत बरेच बँड गाजले. जगभरात अभिनेत्यांपेक्षाही या बँड मधल्या कलाकारांची लोकांमध्ये जास्त क्रेझ होती.

द बीटल्स नावाचा हा बँड केवळ अमेरिकेतच नाही तर जगभर चर्चिला जाणारा विषय होता. त्यांच्या गाण्यांच्या इव्हेंटला लोकं अक्षरशः वेडे होऊन नाचायचे. तरुण मुली बेशुद्ध व्हायच्या इतकी लोकप्रियता या बीटल्स बँडला मिळालेली होती.

या बँडचा निर्माता जॉन लेनन. जॉन लेनन इतका लोकप्रिय गायक अजूनही कोणी झालेलं नाही. जॉन स्वतः गाणी लिहायचा , गिटार वाजवून आपल्या सहकाऱ्यांसोबत सादर करायचा. आपली पॅशन त्याने केवळ गाणी गाण्यापुरती आणि पैसे कमावण्यापुरती मर्यादित न ठेवता वैश्विक शांतीसाठी सुद्धा त्याने गाण्यांचा यशस्वीरीत्या वापर केला.

दोन देशांमधील सीमावाद, प्रांतवाद अशा सगळ्या गोष्टींना तो बाजूला सारून जागतिक शांततेसाठी तो काम करत होता. त्याचं स्वप्न होत कि असं जग हवं जिथं माणूस हा माणसासारखा वागेल, जिथं फक्त प्रेम असेल, कुठल्याही वादाचा तिथे संबंध नसेल.

इतकी लोकप्रियता मिळवूनही त्याच्याच एका चाहत्याने भर रस्त्यावर त्याला गोळ्या घालून त्याचा जीव घेतला नक्की काय घटना घडली होती त्याबद्दलचा आजचा किस्सा.

जॉन लेननला पुढे पॉल मकार्टनी, जॉर्ज हॅरीन्सन आणि रिंगो स्टार हि जिवाभावाची लोकं भेटली आणि त्यांनी बीटल्स नावाचा बँड सुरु केला.

थोड्याच काळात त्यांनी त्यांच्या संगीताने सगळं जग दणाणून सोडलं. टाइम्स ऑफ मॅगझिनच्या दरवर्षी निवडल्या जाणाऱ्या टॉप १०० लोकांमध्ये बीटल्स प्रत्येक वेळी होत. अपवादानेच एखाद्या बँडला इतकी लोकप्रियता मिळते आणि बिटल्सने  लोकप्रियतेचा कळस गाठला होता.

ज्यावेळी बीटल्स त्यांच्या ऐन जोमात होतं तेव्हा एका मुलाखतीत जॉन लेनन बोलून गेला कि ,

आमचं बीटल्स हे जिझसपेक्षाही जास्त प्रसिद्ध आहे….

जॉनच्या या विधानावर प्रचंड वादळ उठलं. त्याचं हे विधान चुकीच्या अर्थाने घेतलं गेलं.अनेक स्तरांतून बिटल्सवर टीका करण्यात आली. रस्त्यांवर बीटल्स बद्दल अपशब्द असणारे पोस्टर्स लावण्यात आले. जितकी लोकप्रियता बिटल्सला मिळाली त्याहीपेक्षा जास्त शिव्या बिटल्सला पडल्या.

त्यांचे कॉन्सर्ट रद्द केले जाऊ लागले, विविध ठिकाणांहून त्यांना  लागल्या. जेव्हा हे प्रकरण तापलं त्यावेळी जॉन लेननने आपली बाजू मांडून लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याने वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही. बिटल्सवर लोकांचा रोष होता पण तितक्याच आवडीने लोकं त्यांची गाणीही ऐकत होते.

पुढे जसजसा काळ बदलत गेला बीटल्समध्ये मतभेद होऊ लागल्या. परिणामी सगळ्यात आधी जॉन लेननने बँड सोडला आणि तो एकटाच गाणी बनवून आपल्या पत्नीसोबत गाऊ लागला. त्याचे अल्बमही मोठ्या प्रमाणावर विकले जाऊ लागले. व्हिएतनाम युद्धाच्या वेळी जागतिक शांतीसाठी त्याने पुढाकार घेतला आणि imagine , give peace a chance सारखी उत्तम गाणी त्याने त्यावेळी दिली.

जागतिक शांततेसाठी काम करत असताना एका भाषणात जॉन म्हणाला होता,

 जगात सगळ्यात जास्त शांततेसाठी कुणी काम केलंय ते म्हणजे महात्मा गांधी आणि मार्टिन ल्युथर किंग यांनी पण या दोघांनाही बंदुकीने मारण्यात आलं आणि माझ्या बाबतीतही तेच झालं तर आश्चर्य वाटायला नको.

७०च्या दशकात त्याने घोषणा केली कि मी पुन्हा live शो करण्यास उत्सुक आहे. लोकांचा याची उत्सुकता होती कि बीटल्स सोडल्यानंतर जॉन लेनन नवीन काय सादर करणार आहे. मात्र तसं घडायचं नव्हतं बहुदा.

८ डिसेंबर १९८०. जॉन लेनन एका अल्बमच्या रेकॉर्डिंगसाठी घराबाहेर पडला. त्याला बघताच लोकांनी गर्दी केली, जॉन सोबत लोकांनी चर्चा केली , त्याचा ऑटोग्राफ घेतला , नंतर सगळी ज्याच्यात्याच्या कामाला निघून गेली. रात्री रेकॉर्डिंग संपलं त्यावेळी रात्रीचे साडेदहा वाजले होते. बाहेर रस्त्यावर वर्दळ अगदीच विरळ होती मात्र एकजण तिथेच थांबलेला होता तो होता मार्क चॅपमन.

मार्क हा जॉनचा मोठा चाहता होता. त्याने जॉनला ऑटोग्राफ मागितला, जॉनने मोठ्या प्रेमाने त्याच्या हातातल्या फोटोवर एक ऑटोग्राफ दिला आणि मार्क त्याला थँक्यू म्हणाला. जॉन घराकडे जाण्यास वळला आणि त्याच्यावर पाठीमागून गोळ्या झाडण्यात आल्या. शरीरात गोळ्या रुतून बसल्यामुळे जॉनचा जागीच मृत्यू झाला. गोळ्या झाडणारा त्याचा कट्टर चाहता मार्क चॅपमन होता.

मार्क चॅपमनने अतिशय थंड डोक्याने जॉनवर गोळ्या झाडल्या आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लेननजवळ बसून तो द कॅचर इन द राय नावाची कादंबरी वाचत बसला. हि कादंबरी वादग्रस्त आणि हिंसक होती.

मार्क आधी जॉनचा चाहता होता मात्र जेव्हा त्याला कळलं कि जॉन लेनन म्हणाला होता कि बीटल्स हे जिझसपेक्षाही मोठं आहे तेव्हापासून त्याने जॉन लेननला संपवण्याची योजना आखली होती. जॉन लेननला मारूनच तो शांत बसला.

मार्क चॅपमन ह्याने प्रसिद्धी साठी जॉन लेननला मारलं असं वक्तव्य मार्क ने कारागृहात असताना दिलं. जॉन हा सर्वात प्रसिद्ध पण तितकाच साधं राहणारा माणूस होता तो चाहत्यांना भेटायला मागे पुढे पहायचा नाही म्हणून त्याला मारणं सोपं गेलं असही तो म्हणाला.

ज्या जॉन Lennon ने आयुष्यभर शांततेसाठी काम केलं त्याचाच बळी हिंसाचाराने घेण्यात आला ही खरी शोकांतिका आहे.

जॉन म्हणायचा, मृत्यू म्हणजे जीवनाचा अंत असू शकत नाही माझ्या साठी मृत्यू म्हणजे एका गाडीतून दुसऱ्या गाडीत जाणं मृत्यू हा आयुष्याचा एक टप्पा आहे अंत नाही…. म्हणून सगळ्यांनी प्रेम आणि शांती जगभर पसरवायला हवी..

एका विधानाने कट्टर फॅन जॉनच्या जीवावर उठला यावरून बराच गदारोळ अमेरिकेतच नव्हे तर जगभरात झाला.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.