कोणासाठीही न थांबणारे भाजप बाबुल सुप्रियो यांची समजूत काढायचा प्रयत्न करत आहे..

मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणाला मोठं वळण लागलेलं आहे.  त्याला कारणीभुत ठरलेत भाजपा खासदार आणि माजी केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो ! त्यांनी काल-परवा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून ‘आपण राजकारणातून संन्यास घेतला आहे” असं जाहीर केलं आणि एवढेच नाही तर त्यांनी  खासदारकीचा देखील राजीनामा देणार आहेत अशी घोषणा देखील केली आहे.

विशेष म्हणजे त्यांनी हे देखील स्पष्ट केले आहे कि, मी राजीनामा दिला तरी मी अन्य कुठल्याही  राजकीय पक्षात जात नाहीये, टीएमसी, काँग्रेस, सीपीआय(एम) कोणीही मला बोलावलेलं नाही, इथून पुढे मी समजाकार्य करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पश्चिमबंगाल भाजप चे नेते म्हणून त्यांची कामगिरी चांगलीच वजनदार मानली जायची त्यामुळे त्यांचा हा निर्णय भाजपासाठी मोठा धक्कादायक मानला जात आहे. आसनसोल मतदारसंघातून ते लोकसभेत निवडून गेले होते.

त्यांनी याअगोदर देखील उघड-उघड म्हणलं होतं कि, अगोदर पासूनच माझं पक्ष सोडण्याचं मत पक्कं झालं होतं.

त्यांचे २०१९ च्या निवडणुकी अगोदर पासूनच भाजप पक्षाबरोबरच स्थानिक नेत्यांसोबत अनेकदा मतभेद झाले होते आणि ते सर्वासमोर देखील आले होते. त्यांनी यासाठी वेळोवेळी स्वतःबरोबरच पक्षातील इतर नेत्यांनाही जबाबदार धरलं आहे.

त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीमधील आणखी एक घटना म्हणजे अलीकडेच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान बाबुल यांनादेखील केंद्रीय मंत्रिपदावरून हटवण्यात आले होते, पण तेंव्हा त्यांनी गप्प राहणे पसंद केले. मात्र त्यांनी त्यांच्या सोशल मिडियावरून एक पोस्ट टाकली, ” जब धुआं होता है तो कहीं आग जरूर लगती है” असं म्हणत आपल्या भावना मात्र जरूर व्यक्त केल्या होत्या.  

तेंव्हापासून त्यांनी राजकीय वर्तुळात वावर देखील कमी केला होता. आणि तेंव्हापासूनच पक्षात ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात किंव्हा राजकीय संन्यास घेऊ शकतात असे तर्क-वितर्क लावले जात होते, अखेर त्यांनी राजकीय संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं आणि आता या तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

सुप्रियो बाबुल यांच्या संन्यासामुळे भाजपचे मोठे नुकसान ?

पश्चिम बंगालच्या भाजपच्या राजकारणात येऊन त्यांना अवघे ७च वर्षे झाली होती. त्यात ते २ वेळा खासदार राहिलेत आणि ३ वेळा वेगवेगळ्या विभागाचे राज्य मंत्री राहिले आहेत. इतक्या कमी वेळात त्यांनी इतकी मोठी मजल मारली होती तरीदेखील त्यांनी राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला हि मोठी बाब ठरते आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपची प्रतिमा डागाळू शकते कारण त्यांचा हा निर्णय स्पष्ट करतो कि, भाजपमध्ये अंतर्गत एखाद्या राजकीय नेत्याला संन्यास घ्यायला भाग पडतोय असाच मेसेज यातून जात आहे.

टीएमसीच्या डोला सेन यांचा पराभव करून आसनसोलमधून खासदार झाले. शहरी विकास मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य उच्चाटन मंत्रालयात राज्यमंत्री झाले. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांना  अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्रालय देण्यात आलं होतं. २०१९ मध्ये पुन्हा निवडणूक झाली आणि दुसऱ्यांदा निवडून संसदेत पोहोचले. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळवला.

पक्षाला देखील त्यांचा मोठा फायदा झाला होता, कारण त्यांनी त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीत संपूर्ण ताकदीनिशी विधानसभा निवडणूक लढवून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला पराभव स्विकारायला लावला होता. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल चे भक्कम स्थान असलेल्या राज्यात भाजपसाठी मोठी प्रतिष्ठेची लढाई होती त्यात सुप्रियो बाबुल यांच्याच मुळे भाजपचे वजन आणखी वाढले होते.

पश्चिम बंगालमधील इतर  भाजप नेत्यांपैकी बाबुल सुप्रियो यांनी दोनदा केंद्रीय मंत्री बनले आहेत. शिवाय, भाजपने स्वतःला राज्यात तिसरी राजकीय शक्ती म्हणवून घेण्याचा गौरवही मिळवला तो सुप्रियो यांच्यामुळेच.

त्यांच्या या ऐतिहासिक विजयामुळे त्यांना पंतप्रधान मोदींसकट भाजपाच्या विरोधकांनी देखील त्यांना सुभेच्छा दिल्या होत्या.

मात्र सुप्रियो राजकारणातून संन्यास हा वेगवेगळा संदेश देत आहे.

हेच कि, राजकारणातील स्टारडममुळे मिळणारे महत्व आणि यश आता संपले आहे काय ?

 २०१४ नंतर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बॉलीवूड चे कलाकारांचे पक्षप्रवेश आपण पहिलेच आहेत. त्याचप्रमाणे  सुप्रियो देखील याच ट्रेंडचे एक भाग होते का? कारण त्यांनीदेखील २०१४ मध्ये मोदी लाटेत आपले हि नशीब अजमावले आणि भाजपकडून ते राजकारणात उतरले

राजकारणात येण्यापूर्वी बाबुल सुप्रियो हे एक प्रसिध्द पार्श्वगायक, कलाकार, दूरदर्शन होस्ट आणि अभिनेते देखील होते. त्यांनी नव्वदच्या दशकात हिंदी चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली होती. त्यांनी हिंदी, बंगाली आणि उडिया भाषेत तसेच इतर ११ भाषेत त्यांनी इतर ११ भाषांमध्येही गाणी गायली आहेत.

पक्षाने सुप्रियो यांना पक्षात परत आणण्याचं पक्षाने मनावर घेतलं आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने केंद्रीय मंत्री मंडळाच्या फेरबदलात बाबुल सुप्रियो यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळले असले तरी, बाबुल हे पश्चिम बंगाल राज्यातल्या भाजपच्या विस्तारासाठी तितकेच महत्वाचे आहेत. पक्षाने सुप्रियो यांना पक्षात परत आणण्यासाठीची जबाबदारी राज्यातील भाजप नेते  जे. पी नड्डा आणि दिलीप घोष यांच्यावर सोपवली असल्याची माहिती मिळते आहे.

कारण सुप्रियो यांच्या त्या पोस्ट नंतर त्यांच्यात आणि जे. पी नड्डा यांच्यात शनिवारी संभाषण झाल्याची माहिती मिळाली होती तसेच आज सोमवारी देखील बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. नड्डा यांनी सुप्रियो यांना या निर्णयावर एका दिवसाचा वेळ घेऊन यावर फेरविचार करावा असा सल्ला दिला आहे आणि आपला निर्णय मंगळवार पर्यंत पार्टी हाय कमांड ला कळवावा असंही नड्डा यांनी म्हणलं आहे. 

असंही सांगितले जात आहे की, बंगाल निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी पक्षाचा एक गट बाबुल सुप्रियो यांना जबाबदार ठरवत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजीनाम्यानंतर सुप्रियो केंद्रीय नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चाही झाली होती. कदाचित हीच परिस्थिती त्यांच्या राजकीय संन्यासामागे असू शकेल का ?

त्यांनी पक्ष आणि राजकारण दोन्ही सोडलं आहे, मात्र पक्ष कितपत त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करतंय हे पाहणे आता म्हत्वाचे ठरेल

 

Leave A Reply

Your email address will not be published.