दुकानांच्या माहितीसाठी चालू केलेलं just dial आता वेश्याव्यवसायासाठी वापरलं जातंय.

टेक्नोलॉजीमुळे आपले आयुष्य जेवढ सोपे आणि सहज झालेय तसेच हीच टेक्नोलॉजी येतांना सोबत काही तोटे देखील घेऊन आली आहे. 

म्हणजेच माणूस स्वतःच्या सोई-सुविधेसाठी जसं तंत्रज्ञान वापरायला सुरुवात केली तसंच वाईट गोष्टींसाठीही वापरायला सुरुवात केली. त्यातलच एक उदाहरण म्हणजे, जस्ट डायल ! होय, तोच जस्ट डायल ज्यावरून आपण कोणताही पत्ता, किंव्हा कोणत्याही दुकानाची वा दवाखान्याची माहिती काढतो. पण याच जस्ट डायलचा वापर काही विकृत लोकांनी वेश्या व्यवसाय चालवण्यासाठी केला जातोय. 

हि धक्कादायक बाब अलीकडेच उघडकीस आली. याची गंभीर दखल दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतल्यामुळे हि बाब उघडकीस आली. त्यांच्याकडे जस्ट डायलवरुन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. 

अवैध धंदे करण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा वापर केला जातो. असाच एक प्रकार जस्ट डायल या साईटवर उघडकीस आला आहे. दिल्ली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनीच हा प्रकार उघडकीस आणला आहे. जस्ट डायलवरुन वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

स्पामध्ये चालवल्या जात असलेल्या वेश्याव्यवसाय रॅकेटच्या विरोधात अनेक आणि तपासात पुरावे सापडलेत, मग दिल्ली महिला आयोगाने या प्रकरणी कठोर भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. 

Justdial.com चे युजर्स देखील Justdial.com ला संशयाच्या नजरेने बघत आहेत.  

याबाबत आयोगाला Justdial.com च्या भूमिकेवरच थेट संशय येत असल्याचं म्हणलं जातंय. तसंच  आयोगाने दिल्ली पोलिसांना एफआयआर नोंदवण्याची नोटीसही बजावली आहे.  युजर्सच्या तक्रारींची दखल घेत, चौकशीसाठी Justdial.com कडे दिल्लीत कार्यरत असलेल्या स्पाच्या संपर्क क्रमांकांची यादी मागवली. ज्याद्वारे १५० हून अधिक तरुण मुलींचे फोटोज आणि त्यांच्या सर्व्हिस चे दर असलेले १५ पेक्षा जास्त कॉल आणि ३२ व्हॉट्सअॅप मेसज आले होते.  

जस्टडाईलवर रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व स्पाची यादी आणि त्यांच्या नोंदणीमध्ये लागू असलेल्या रेटिंग्ज तपशील देखील मागवला. जस्टडायलला विशेषत: लैंगिक सेवा पुरवणाऱ्या आयोगाच्या टीमला संदेश पाठवणाऱ्या स्पाचा तपशील देण्यास सांगण्यात आले. 

आयोगाच्या वतीने स्पा सर्व्हिससाठी तपशील मागवताना अशा प्रकारे खंडणीचा धंदा उघडकीस आला. किंबहुना, स्पानेच त्याच्या सर्व बेकायदेशीर कृत्यांचा आणि सेक्स रॅकेटचा तपशील लगेच दिला.

आज संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या जस्ट डायल ची सुरुवात मात्र मोठी प्रेरणादायी आहे. 

कंपनीचे प्रमुख व्हीएसएस मणी यांची कहाणी खूप रंजक आणि प्रेरणादायी आहे. दिल्ली विद्यापीठातून बी.कॉम केलेले मणि वेंकटचलम स्थानू सुब्रमणि मणी या व्यक्तीने खूप संघर्षानंतर त्या कंपनीला वाढवले.

कंपनीची सुरुवात  १९९६ मध्ये मुंबईतील एका गॅरेजमधून झाली होती. पण त्यासाठी त्यांनी आपल्या बायकोचे दागिने विकले होते. आणि कंपनी केवळ ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीने सुरू करण्यात आली होती. एका गॅरेजचे कार्यालयात रूपांतर करण्यात आले आणि ५-६ कर्मचाऱ्यांसह काही फर्निचर व संगणक भाड्याने घेऊन कंपनी सुरू करण्यात आली. काही काळातच जस्ट डायल ही देशातील लोकप्रिय सर्चिंग वेबसाइट बनली.

सुरुवातीला जस्ट डायलने डेटाबेस तयार करण्यासाठी विविध व्यवसायांची सर्व माहिती असलेला डेटाबेस तयार केला. यासाठी जस्ट डायलच्या टीमने घरोघरी जाऊन दुकाने, कार्यालयात जाऊन माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. कालांतराने त्यांच्या टीमने खूप चांगला डेटाबेस तयार केला होता. कंपनीला दररोज १.९  दशलक्षाहून अधिक कॉल येतात. दररोज ही कंपनी प्रगतीच्या दिशेने जात आहे. 

जस्ट डायलने इतर देशांमध्येही एंट्री मारली. आज कंपनी UAE, कॅनडा, UK आणि USA सारख्या देशांमध्ये देखील आहे. सध्या त्याची भारतात १५ ऑफिस आहेत.

पण नुकतंच झालेले प्रकरण हे कंपनीला बट्टा लागणारं ठरू नये म्हणजे झालं…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.