दिग्विजय सिंहांच्या वक्तव्यावर सिंधिया म्हणतात, ‘आमच्या घराण्याचा स्टेटसचं वेगळा आहे’

गेल्या वर्षी २०२० च्या मार्च महिन्यात केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनतर आपण नेहमीच जोतिरादित्य वर्सेस काँग्रेस नेत्यांची शाब्दिक लढाई पहिली आहे.

आतासुद्धा अश्याच एका वादाने वातावरण पेटले आहे.  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी  कॉंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना गद्दार म्हंटल आहे. ज्यांनंतर नवीन वादाला तोंड फुटलंय.

झालं असं कि, दिग्विजय यांनी शनिवारी गुना जिल्ह्यातील मधुसूदनगढ भागातील रघुनाथ गावात आणि विदिशा जिल्ह्यातील मुंडेला गावात सभांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सिंधिया यांच्यावर चांगलाचं निशाणा साधला. दिग्विजय सिंह म्हणाले कि,

“२०१८ च्या निवडणुकीत  मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. सिंधिया निघून गेले आणि प्रत्येक आमदारासाठी २५-२५  कोटी रुपये घेतले. त्यांनी काँग्रेसशी गद्दारी केली आहे. मी याबद्दल काय करू? जनतेने तर काँग्रेसचे सरकार स्थापन केले होते. इतिहास याचा साक्षीदार आहे. एखादा माणूस गद्दारी करतो, मग त्याच्या पिढ्यानपिढ्या गद्दारी वर गद्दारी करतात.”

दरम्यान, आता दिग्विजय सिंहांच्या या वक्तव्यावर जोतिरादित्य सिंह यांचे समर्थक चांगलेच भडकले होते. आपल्या या वाक्यावर दिग्विजय सिंग चांगलेच ट्रोल होत आहेत. ज्यानंतर जोतिरादित्य सिंधिया यांनी यावर दिग्विजय सिंहांना चांगलंच उत्तर द्यावं अशी मागणी सुरु होती.

ज्यावर नुकताच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपलं मौन सोडलं. सिंधिया यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटल कि,

 “मला या पातळीवर जायचे नाही. जे लोक ओसामाला ओसामा जी म्हणतात… ज्यांना जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करायचे आहे, त्यांच्याबद्दल काय बोलायचं ? आणि राहिला प्रश्न गद्दारीचा तर कोण देशद्रोही आहे आणि कोण नाही हे जनता ठरवेल.”

एवढचं नाही तर सिंधिया असंही म्हणाले कि, त्यांच्यावर आता मी काय करू. त्यांची सवयच ती आहे. ते (दिग्विजय सिंह) आता म्हातारे झाले आहेत, त्यांची पोळ खोलायची नाहीये.

आपला मुद्दा पुढे करत सिंधिया म्हणाले की,

त्यांना कुठेतरी काटा टोचतोय, त्यामुळे आतली भडास बाहेर येत आहे. मला त्यांच्या पातळीवर जायच सवय नाही. सिंधिया कुटुंबाचा एक स्टेटस आहे, जी मी राखेन. तो किती चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो यावरून त्याची स्थिती दिसून येते.’

आता विषय निघालाच तर सिंधिया याच्या घराण्यावर  जरा नजर टाकूया. सगळ्यांनाच माहितेय जोतिरादित्य एका राज घराण्यातील आहे. ग्वाल्हेरचं शिंदे घरं म्हणजेच सिंधिया घराणं. ज्योतिरादित्य सिंधिया यांचं मुळचं घराणं हे महाराष्ट्रातीलच आहे. मध्य प्रदेशात जाऊन स्थायिक झालेल्या या शिंदे आडनावाचा उल्लेख पुढे जाऊन सिंधिया असा केला जाऊ लागला.

२००१ मध्ये वडील माधवराव यांच्या मुलानंतर ज्योतिरादित्य हे ग्वालियरचे नवे महाराज बनले. त्यांचे वडील माधवराव सिंधिया हे काँग्रेसचे कट्टर सदस्य होते. ते ९ वेळा खासदार राहिले होते. दिग्गज नेता असलेल्या माधवराव सिंधिया यांच्या बहिणीही राजकारणात सक्रिय होत्या. हाच वारसा ज्योतिरादित्य सिंधिया यांनाही मिळाला.

मध्य प्रदेशात त्यांच्या सिंधिया घराण्याला मोठा मान आहे, हेच कारण आहे कि, तरुण चेहरा असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांचा चाहता वर्ग मोठा आहे, ते जेव्हा काँग्रेस मध्ये होते, तेव्हा देखील आणि आता भाजप मध्ये आहेत तेव्हा सुद्धा. दोन्ही पक्षात त्यांचं पारडं नेहेमीच भारी आहे. कारण जेव्हा सिंधिया काँग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा अनेक आमदारांना आपल्या सोबत घेऊन गेले. आणि मध्य प्रदेश काँग्रेसला मोठा धक्का दिला होता.

त्यानंतर आता भाजप मध्ये गेल्यावर सुद्धा त्यांचं पारडं जडचं आहे. त्यामुळे मध्यप्रदेश भाजपने त्यांना थेट केंद्रित मंत्री बनवत मोठी जबाबदारी दिलीये. इथेही त्यांच्या चाहत्यांमध्ये कुठलीच कमतरता पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे दिग्विजय सिहांनी त्यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या भाजप समर्थकांनी आणि  उडी घेतलीये.

मध्य प्रदेश भाजपचे प्रवक्ते आणि सिंधियाचे कट्टर समर्थक पंकज चतुर्वेदी म्हणाले,

“आज दिग्विजय सिंधियांमधले सर्व प्रकारचे दोष पाहत आहेत. सिंधिया जेव्हा काँग्रेस पक्षात होते तेव्हा दिग्विजय त्यांची स्तुती करत फिरत असल्याचे. दिग्विजय यांच्या विचाराचे मला वाईट वाटते. दिग्विजय जी,  गद्दारी तर तुम्ही आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ  यांनी केली, ज्याचा परिणाम गेल्‍या वर्षा झालेल्या राज्‍यातील २८ विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्‍याला पहायला मिळाला. “

आता सिंधिया यांनी दिग्विजय यांच्या वक्तव्यावर चोख उत्तर तर दिलं, पण आता दिग्विजय त्यावर काय बोलणार आणि यात आणखी कोण-कोण उडी घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारच आहे. सोबतच हा वाद किती चिघळणार हे सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग ठरणार आहे.

हे ही  वाच भिडू :

 

 

1 Comment
  1. Patil Swapnil says

    Mst story cover krta.good

Leave A Reply

Your email address will not be published.