शहांचा काश्मीर दौरा, पोलिसाची हत्या अन् नोकराचे डिप्रेशन ; लोहिया हत्या प्रकरण नेमकं काय ?

आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ३ दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर असणार आहेत. कलम ३७० रद्द केल्यानंतर शाह दुसऱ्यांदा जम्मू-काश्मीरला गेले आहेत, मात्र त्याआधी इथे एक घटना घडली. जम्मू-काश्मीर कारागृहाचे महासंचालक हेमंत लोहिया यांची काल रात्री उशिरा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या अंगावर भाजलेल्या खुणा देखील आढळून आल्यात. मारेकऱ्याने केचपच्या बाटलीने त्यांचा गळा चिरून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.

ही हत्या का करण्यात आली ? यामागे कोणाचा हात आहे याचा तपास सुरु असतानाच सद्या तरी दोन प्राथमिक निष्कर्ष काढले जातायेत एक म्हणजे हा दहशतवादी हल्ला असेल दुसरा म्हणजे हेमंत लोहिया यांचा नोकर यासिरने ही हत्या केली असणार. कारण तपासात यासिर CCTVमध्ये धावताना दिसून आला. रात्रभर शोध घेऊन शेवटी यासीरला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे.

पहिला निष्कर्ष पाहायचा तर हा दहशतवादी हल्ला आणि अमित शहांचा काश्मीर दौरा अशी लिंक लागते.

कारण रात्री हत्या घडल्यानंतर त्याच्या १० तासानंतर पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट PAFF या दहशतवादी संघटनेने डीजी लोहिया यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलीय. सोबतच या संघटनेने,असं सांगितलं आहे कि, “आम्ही कधीही आणि कुठेही अशा हायप्रोफाईल टार्गेट्सवर मारा करू शकतो. जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्र्यांना ही आमची छोटीशी भेट आहे.” थोडक्यात अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्शवभूमीवर ही हत्या जम्मू-काश्मीर पोलिसांना आव्हान देण्यासाठी असणार.

पण लोहिया यांच्या हत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जरी J&K पोलीस सुरुवातीच्या तपासात या घटनेला दहशतवादी घटनेचा भाग मानत नसले तरी, जर आपण हत्येचा घटनाक्रम बघितला तर ही काय साधारण दशतवादी घटना नाहीय.

कारण डीजीपी पोस्ट असणाऱ्या अधिकाऱ्याला Z+ सुरक्षा मिळते, पण लोहिया यांच्याकडे गार्डही नव्हता ही गोष्ट खटकते.

जेलचे डीजी हेमंत लोहिया हे जम्मूच्या बाहेरील उदयवाडा येथे राहत होते. ते १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांची डीजी जेल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

असं सांगितलं जातं कि, यामध्ये पाकिस्तानी आयएसआय सारख्या दहशतवादी संघटना असतील याची शक्यता नाकारता येत नाही.. कारण काश्मीर खोऱ्यात स्थानिक आणि पाकिस्तानी दहशतवाद्यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्याचा प्रतिकार म्हणून थेट हल्ला न करता या दहशतवादी संघटना ओव्हर ग्राउंड वर्कर्स (OGW) च्या मदतीने टार्गेट किलिंगसारख्या नवीन पद्धती वापरत आहेत. कदाचित याच पद्धतीचा वापर करून लोहिया यांची हत्या केली असावी अशी शक्यता जम्मू-काश्मीर पोलिसांचे माजी डीजीपी एसपी वैद यांनी व्यक्त केली. थोडक्यात डीजी लोहिया यांची हत्या हा दहशतवादी हल्ल्याचा नवा प्रकार असू शकतो. 

याचाच भाग म्हणजे लोहिया यांचा नोकर यासिर आणि त्याचं डिप्रेशन.

लोहिया यांच्या हत्येननंतर त्यांचा नोकर फरार आहे. पोलिसांनी यासिरचा शोध सुरू केला आहे. 

पोलिसांना घटनास्थळावरून यासिरची डायरी हाती लागली आहे. त्यात हिंदी गाणे, शायरी लिहिली आहे.  काही शेर-शायरी, कवितांमध्ये यासीरने जीवन संपवण्याचे संकेत दिलेत. 

हम डूबते हैं, डूबने दो। हम मरते हैं, तो मरने दो। पर अब कोई झूठापन मत दिखाओ।  “मैं अपने जीवन से नफरत करता हूं, जीवन सिर्फ दुःख है”, “लाइफ 1% लव 0%, टेंशन 90%, दुःख  99%, फेक स्माइल 100%, “मैं जैसी लाइफ जी रहा हूं, मुझे हमें कोई समस्या नहीं है… समस्याइस बात की है कि भविष्य में क्या होगा” “जिंदगी तो बस तकलीफ देती है, सुकुन तो अब मौत ही देगी, डियर डेथ, प्लीज कम इन टू माई लाइफ…आई एम अल्वेज वेटिंग फार यू…।

hemant lohia murder case

डायरीच्या पाच पानांत काहीतरी असंच नैराश्यजनक लिहिले आहे, यासिर डिप्रेशनमध्ये असल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात म्हंटलं आहे.

पोलिसांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, हत्येची घटना घडवून संशयित आरोपी यासिर पळून गेल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. यासीर हा नोकर म्हणून लोहिया यांच्याकडे सहा महिन्यांपासून काम करत होता. तो डिप्रेशनचा बळी होता. घटनास्थळावरून हत्या केलेली हत्यारं, डायरीही जप्त केली आहे. 

आता यासीरच्या चौकशीनंतरच कळेल कि हि आरोपीच्या मानसिक स्थितीमुळे घडलेली हत्या आहे कि दहशतवादी संघटनांचं टार्गेट किलिंग आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.