एक मुस्लीम पुरातत्व शास्त्रज्ञ ज्यांनी ठामपणे सांगितल,” बाबरीच्या जागी राम मंदिर होत.”

१९९० च्या काळात उत्तर भारतात राम मंदिर आंदोलनानं जोर पकडला होता, भाजपने बाबरी मस्जिदीच्या जागी राम मंदिर बांधण्यासाठी ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणत रथयात्रा देखील सुरु केली. अखेरीस काही आक्रमक कारसेवकांनी मिळून ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली. देशात काही ठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगली सुरू झाल्या. एकूणच काय तर दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल असं वातावरण तयार झालं होतं.  

हिंदूंचा दावा म्हणजे राम मंदिर. तर मुस्लिम समाजाचा दावा म्हणजे बाबरी मस्जिद.

मात्र अशा या विरोधी वातावरणात देखील एका मुस्लिम पुरातत्व शास्त्रज्ञाने अगदी ठामपणे सांगितलं कि, बाबरी मस्जिदीच्या जागी राम मंदिरच होतं. 

अगदी पुरातत्व खात्यांतर्गत कारवाई झाली तरी तो अधिकारी आपल्या संशोधनावर ठाम राहिला. त्याने आपली भूमिका बदलली नाही. त्याच्याच योगदानामुळे अयोध्येत शास्त्रीय पद्धतीने राम शोधण्यास मदत झाली. इतकचं नाही तर त्यांनी पुरातत्व विभागाच काम करत असताना बरीच मंदिरं वाचवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या याच कामगिरीसाठी भारत सरकारनं त्यांना पद्मश्री देवून सन्मान केला आहे. त्यांचं नाव म्हणजे,

पद्मश्री के.के.मोहोम्मद

१९७६ साली पुरातत्व विभागाचे अधिकारी बी. बी. लाल यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने पाडलेल्या बाबरी मशीदीच्या परिसरात उत्खनन केलं होतं.  त्या पथकात के. के. मोहम्मद देखील होते. त्यावेळी मोहम्मद  दिल्ली स्कूल ऑफ आर्किओलॉजी मध्ये शिक्षण घेत होते. त्याचकाळी त्यांनी पहिल्यांदा राम मंदिराचं अस्तित्व असल्याचं ठामपणे सांगितलं होतं.

पुढे के.के.मोहोम्मद अयोध्येतील राम मंदिराचे पुरातत्त्वीय शोध घेणाऱ्या चमूचे सदस्य होते. 

राम जन्मभूमी आणि के.के.मोहोम्मद

मोहोम्मद यांनी पाडलेल्या मशिदीच्या उत्खनन केले तेंव्हा मशिदीच्या खांबांखालचा भाग विटांनी तयार केला गेल्याच त्यांना आढळून आल होत. मशिदीच्या भितींत मंदिराचे स्तंभ आढळून आले होते. ते खांब काळ्या बेसॉल्ट दगडापासून बनवले होते. स्तंभाच्या खालील भागात अकराव्या आणि बाराव्या शतकातील मंदिरांची चिन्हं स्पष्ट होती, अस मोहोम्मद यांनी सांगितलं होत.

त्यामुळे त्यांच्यावर पुरातत्व खात्यांतर्गत कारवाई झाली होती. पण मोहोम्मद आपल्या संशोधनावर ठाम राहिले होते. मी खोटे बोलण्यापेक्षा कर्तव्य बजावताना मरणे पसंद करेन, अस म्हणत त्यांनी आपले कार्य अखंडपणे चालू ठेवले. त्यामुळेच डाव्या आणि दक्षिणेतील इतिहासकारांना मोहोम्मद याचं संशोधन पटत  नसायच.

राम मंदिराबाबत परखड मते

१. अयोध्येत १९७८ च्या  काळात पाडलेल्या मशिदीचे उत्खनन करताना मंदिराचे अवशेष मिळाले होते. पण ते समोर आणले गेले नाहीत. १९९० च्या काळात तत्कालीन डाव्या इतिहासकारांनी जाणूनबुजून मंदिराच्या अवशेशाचे पुरावे पुरातत्व विभागाला दिले नाहीत, असा गंभीर आरोप मोहोम्मद यांनी २०१९ मध्ये केला होता.

२. अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायाल्याने निकाल दिल्यानंतर मोहम्मद यांनी परखड मत मांडल होत. मोहोम्मद म्हणाले होते की, बाबर इस्लामच्या कोणी मोठ्या संस्थापकांपैंकी नव्हता. त्यामुळं बाबर मुस्लिमांसाठी महत्त्वाचा नव्हता. हिंदूंसाठी अयोध्येतली जागा महत्त्वाची आहे. पुरातत्व विभागानं दिलेले पुरावे कोर्टानं ग्राह्य धरले आहेत. आता अयोध्येत ठिकाणी भव्य राम मंदिर व्हायला पाहिजे.

३. अयोध्या प्रकरणी काही लोकं पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना याचिका दाखल करुन काहीच मिळणार नाही. अशा नेत्यांना मुस्लिम समाजचं नाकारेल. सामान्य मुस्लिम अशा मुस्लिम नेत्यांमुळे त्रस्त झाला आहे.

४.  मान्य करा किंवा नाही मात्र, काही चुका प्राचीन काळी झाल्या आहेत. अफगाणिस्तानसारख्या देशातून आलेल्या मोहम्मद गजनी, मोहम्मद गोरीसारख्या हल्लेखोरांनी अनेक मंदिर तोडली होती. या ऐतिहासिक चुका मान्य केल्या पाहिजेत. त्या चुकांसाठी आताचे मुस्लीम जबाबदार नाहीत. मात्र, आताच्या मुस्लिमांनी इतिहासात मंदिरे तोडणाऱ्यांची बाजू घेऊ नये.

५. उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा पुरातत्व विभागाने दिलेल्या पुराव्यांवर आधारीत आहे. जो योग्य असून या निर्णयाचे मी स्वागत करतो. ज्याप्रमाणे मुस्लिमांना मक्का आणि मदिना पवित्र आहे, त्याचप्रमाणे हिंदूंना रामजन्मभूमी पवित्र आहे. यापूर्वी, मुस्लिमांना देखील माहिती आहे, की वादग्रस्त ठिकाणी मंदिर होते. मात्र, काही कट्टरपंथीय लोकांना हा वाद मिटवायचा नाही म्हणून ते विरोध करत आहेत.

बटेश्वर मंदिर जीर्णोद्धार मोहीम

२००५ साली मोहोम्मद यांनी मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर परिसरातील २०० मंदिरांचा समूह असलेल्या बटेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार केला. ९ व्या ते ११ व्या शतकात उभारलेल्या या मंदिरांची १३ व्या शतकात पडझड झाली होती. विशेष बाब म्हणजे हा ग्वाल्हेर पासून ४० किलोमीटर दूर असणारा परिसरात खान माफियांनी आणि डाकूंनी दहशत होती. इथली चंबळ घाटी दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध होती. कधीकधी तिथ डाकू आणि पोलिसांच्या गोळीबाराचा आवाज यायचा. पण मोहोम्मद यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याच पक्क केल होत.

मोहोम्म्मद यांना ग्वाल्हेर मधल्या लोकांनी बटेश्वर मंदिराबाबत माहिती दिली. डाकूंची दहशत असल्याने तिथ काम करण अवघड आहे. डाकुंच्या परवानगी शिवाय तिथ काहीही करता येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

मग मोहोम्मद यांनी निर्भय गुर्जर आणि पप्पू गुर्जर डाकूंशी मदत मागितली. आणि डाकूंनीही सशर्त मदत करण्याच ठरवल होतं. पण मोहोम्मद यांच्या अडचणी थांबत नव्हत्या.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी मदतीची मागणी

चंबळ घाटी परिसरात डाकूंची दहशत कमी झाल्यानंतर मंदिर परिसरात खान माफियांनी खोदकाम सुरु केल होत. स्थानिक प्रशासनाकडे मदत मागूनही मदत न मिळाल्याने मोहोम्मद यांनी संघाला मदत मागितली.

माजी संघ प्रमुख सुदर्शन यांना पत्र लिहित मोहोम्मद यांनी आपली अडचण सांगितली. त्याच्यानंतर राज्य सरकार जागे झाले आणि मंदिर जीर्णोद्धाराची मोहीम पुन्हा सुरु झाली. अशाप्रकारे अथक परीश्रामानंतर आणि असंख्य संकटांना तोंड देत मोहोम्मद मंदिरे वाचवण्यात यशस्वी झाले होते.

अनेक पुरातन वास्तूंच्या जिर्णोद्धारासाठी मेहनत….

मोहोम्मद यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अडगळीत पडलेल्या पुरातन वास्तूंचा शोध घेवून त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी मेहनत घेतली.

त्यातील काही प्रमुख म्हणजे सम्राट अशोक निर्मित बौद्ध स्तूपच उत्खनन, कोलहु आणि वैशाली मध्ये पुरातन बौद्धस्थळाचं उत्खनन, राजगिर मध्ये बौद्ध स्तूपचा शोध व उत्खनन, केरळच्या मलापुरम जिल्ह्यात रॉक कट गुहा, सिस्ट्स आणि डोलमेंसचा शोध, छत्तीसगढमधील जगदलपुर जवळच्या बारसुअर आणि समलुरच्या मंदिरांच जतन. यासाठी त्यांना नक्षलवाद्यांची मदत घ्यावी लागली होती.

हे हि वाच भिडू.

1 Comment
  1. omkar says

    बरोबर ! मजीदखाली राम मंदिर होते, याचे पुरावे मिळाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.