रिअल लाइफ ‘शेरनी’ म्हणतेय.. खरी वास्तविकता ही सिनेमापेक्षा काही वेगळीच आहे.

जंगल कितना भी घना क्यों न हो, शेरनी अपना रास्ता ढूंढ ही लेती है.

तुम्हाला आठवतं का ,अवनी नावाच्या वाघिणीने यवतमाळ जिल्ल्यात २०१७-१८ मध्ये धुमाकूळ घातला होता. जवळपास १४ लोकांचा जीवही घेतला होता. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती, कुणीही रात्री बाहेर पडू नये, अशा सूचना वन विभागाने जारी केल्या होत्या. 

प्रशानाने तिला पकडण्याचे अनेक प्रयत्न केले आणि शेवटी दोन महिन्यांच्या शोधमोहिमेनंतर वनविभागाकडे तिला मारण्यावाचून पर्याय राहिला नाही.

अवनीचा मृत्यू तेंव्हा बराच मोठा मुद्दा बनला होता.

असो हे सांगण्याचे निमित्त म्हणजे अलीकडेच आलेला ‘शेरनी’ हा चित्रपट जो बराच गाजतोय. त्यात दमदार अभिनय करणारी विद्या बालनही तितकीच चर्चेत आली आहे.

या चित्रपटात तिला एका फ़ॉरेस्ट ऑफिसरच्या रोल मध्ये पाहून असं वाटतं कि, तिच्या शिवाय हा रोल कुणीच करू शकत नाही. वन अधिकाऱ्यची भूमिका साकारत आहे जी मध्य प्रदेशातील जंगलांवर आधारित असलेल्या या चित्रपटात एका  वाघिणीला मिळविण्यासाठी धडपडत आहे. मात्र, गावकरी, प्रशासन आणि स्थानिक राजकारणी तिच्या मार्गात कसे अडथळे आणत आहेत हेही दाखविले आहे. असो आपण इथे या चित्रपटाबद्दल बोलणार नाही तर विद्याने साकारलेल्या या भूमिकेतील खरी शेरनी म्हणजेच ती महिला अधिकारी कोण आहे याबद्दल बोलणार आहोत.

डेप्युटी कंजर्वेटर ऑफ फॉरेस्ट के. एम. अभर्णा

अभर्णा ह्या मुळच्या सत्यमंगलमजवळील कासीबाली गावच्या आहेत.

तेच गाव जे कुख्यात विरप्पन यांचे गाव म्हणून ओळखले जाते.

त्यामुळे तिथे नेहेमीच केंद्रीय सुरक्षा बल आणि सैन्य तैनात असायचे, अशा वातावरणात त्या वाढल्या. जंगलाविषयी तेव्हापासूनच ओढ असल्याकारणाने त्यांनी फ़ॉरेस्ट ऑफिसरच व्हायचे ठरवले होते. तेव्हा त्यांना कुणीतरी सांगितले होते की, शेतीची शिक्षण घेतले की वनाधिकारी होता येते. अभर्णा यांनी ‘बिएसस्सी एग्री’ हा विषय घेऊन पदवी पूर्ण केली आणि पुढे घरीच तयारी करून आयएफएसची परीक्षा दिली. अभर्णा यांनी २०१३ मध्ये आयएफएस परीक्षा उत्तीर्ण केली.  पुढे आसाम-नागालँड बॉण्ड्रीवर त्यांचे ट्रेनिंग पूर्ण झाले. त्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग ही महाराष्ट्रात पांढरकवडा येथे मिळाली.

‘अवनी’ला पकडण्याच्या मोहिमेत अभर्णा यांची मुख्य भूमिका होती.

त्याच मोहिमेवर आधारित असलेला हा चित्रपट मात्र वास्तविकतेपासून खूप लांब असल्याचे अभर्णा यांनी मत व्यक्त केले आहे. अवनी प्रकरणाच्या वेळी अभर्णा पंढरकवडा येथे तैनात होत्या.

अवनीच्या हत्येबाबत घडलेला घटनाक्रम आणि या चित्रपटातील घडामोडीं पाहता यावरून हा चित्रपट अवनीच्या हत्येवर आधारित आहे हे सांगणे चुकीचे ठरेल. याला आणखी एक आधार म्हणजे अमित मसूरकर यांनी मध्य प्रदेशात या चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे मात्र अवनीचे वास्तव्य तर  महाराष्ट्रातील यवतमाळच्या जंगलात होते. तसेच चित्रपटाआधी निर्माते किंवा विद्या बालन यांनी अभर्णा यांच्याशी कसल्याही प्रकारचा संपर्क साधला नव्हता.

त्यांनी असेही सांगितले कि, जरी हा चित्रपट अवनीच्या घटनाक्रमाच्या वास्तवापासून दूर असला तरी अशा विषयावरील हा पहिलाच चित्रपट आहे हि चांगली गोष्ट आहे.

उदाहरणार्थ, विद्या विंसेट (विद्या बालन) त्या भागात जॉईन झाल्यानंतर वाघिणीने गावकऱ्यांची शिकार करायला सुरुवात केली असल्याचे चित्रपटामध्ये दाखविण्यात आले आहे. परंतु वास्तविकता वेगळीच आहे, अभर्णा तिथे जॉईन होण्यापूर्वीच अवनीने पाच लोकांना बळी होता. तेंव्हापासूनच वन विभागाच्या पथकाने तिच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली होती.

अजून एक फॅक्ट म्हणजे, अवनीच्या प्रकरणात जनहित याचिका दाखल करणारे डॉ. जेरिल बनाइट याचं म्हणनं आहे कि, चित्रपटात सरकारी अधिकारी आणि प्रायव्हेट शुटर यांच्यावर जो राजकरण्यांचा दबाव होता तो यात मांडला नाही. शुटर असगर अली खानने स्वसंरक्षणासाठी वाघिणीवर गोळी घातली हि स्टोरी कशी सांगितली गेली, त्याच्या चौकशी अहवालाच्या खोलात हा चित्रपट गेला नाही.

तसंच या प्रकरणाच्या दरम्यान ऑफिसर अभर्णा यांना राजकीय नेत्यांच्या ज्या वाईट प्रकारच्या वागणुकीला सामोरे जावे लागले तेही यात मांडले नाही.

असो हि अवनीची केस घेण्यापूर्वी अभर्णा यांची पोस्टिंग काझीरंगा नॅशनल पार्क मध्ये होती. या पार्कमध्ये  जगभरातील एक शिंगे गेंड्यांची संख्या सर्वात जास्त आहे. अभर्णा यांचे तिथेही काम हे कौतुकास्पदच होते. त्यांनी त्या प्रांतातील गेंड्यांची शिकार कमी करण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी या भागात  प्लास्टिकवर बंदी आणली होती आणि मासेमारीचे अवैध नेटवर्कही बंद केले होते.

त्यानंतर त्यांनी सहाय्यक संरक्षक वन अधिकारी म्हणून २०१५ मध्ये आसामच्या गोलघाट वनविभाग, देरगाव रेंजमधील सुमारे ४० खेड्यांमधील जंगली वानरांचा बंदोबस्त केला होता.

त्या सध्या महाराष्ट्रातील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. वनसेवेच्या स्थापनेनंतर जवळजवळ १४ वर्षे पुरुष अधिकाऱ्यांचेच वर्चस्व होते परंतु हळूहळू या क्षेत्रात अभर्णा यांच्यासारख्या महिला अधिकारी कार्यरत आहेत हे पाहून हे खूप सकारात्मक वाटते.

१९८० मध्ये या क्षेत्रात केवळ ३ महिला रुजू झाल्या होत्या. त्यानंतर आज वनसेवेत २८४ महिला अधिकारी आहेत तर सुमारे ५००० महिला कर्मचारी कार्यरत आहेत.

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.