केसचा निकाल लागणार असायचा आणि ऐन मोक्याच्या वेळी त्यांची बदली करण्यात यायची

सीबीआय हि यंत्रणा जितकी जलद आणि पावरफुल आहे त्याच प्रमाणे काही सीबीआयचे ऑफिसर सुद्धा तडफदार आणी जिद्दी होते. अनेक गुणवान आणि कामाप्रती निष्ठा असणारे अधिकारी सीबीआयला लाभले. त्यापैकीच एका अधिकाऱ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ज्यांच्या धाकाने आरोपीच्या काळजात त्यांचं नाव ऐकताच धडकी भरायची. पण ज्यावेळी केसचा अंतिम टप्पा यायचा त्यावेळी मात्र त्यांना बदली केलं जायचं. नक्की काय आहे या अधिकाऱ्याबद्दल विशेष जाणून घेऊया.

मुळचे केरळ मधील त्रिसुराचे असणारे सीबीआय अधिकारी के माधवन.

कारकिर्दीतील अनेक मोठमोठ्या केसचा त्यांनी शोध घेतला ,त्यातील आरोपी जगासमोर आणले. अत्यंत हाय होल्टेज असणाऱ्या केसेस सुद्धा त्यांनी योग्य प्रकारे हाताळल्या. त्यांच्या कामाचा धाक अगदी राजकारणी लोकांनासुद्धा घेतलेला होता. त्यांची कामाप्रती असणारी निष्ठा आणि अगदी शेवटच्या टोकापर्यंत जाऊन केस सोडवण्याचा त्यांचा हातखंडा याबद्दल लोकांमध्ये त्यांचा नावलौकिक होता.

त्यांच्या कारकिर्दीतील त्यांनी सोडवलेल्या काही मोठ्या केसेस बघूया. अशा केसेस ज्यांनी राजकीय लोकांवर पदांवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

१९८४ सालची भोपाळ गॅस दुर्घटना. युनियन कार्बाइड फॅक्टरी मधून लीक झालेल्या गॅसने सुमारे २५००० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या केस मध्ये त्यांनी इन्वेस्टीगेशन ऑफिसर म्हणून काम केलं. २०१० साली या केसचा ज्यावेळी निकाल आला तेव्हा त्यात युनियन कार्बाइड फॅक्टरीच्या आठ अधिकाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि त्यांना दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा मिळाली. या केसमधील के. माधवन यांची भूमिका मोलाची होती.

यानंतर त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यात महत्वाची केस म्हणजे बोफोर्स घोटाळा. १९९० च्या दशकातील या घोटाळ्याची जबाबदारी माधवन यांना देण्यात आली होती. हि केस एक हाय प्रोफाइल केस होती आणि अनेक मोठमोठे राजकारणी लोक यात सहभागी होते.

या घोटाळ्यात तेव्हाचे भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांचंही नाव समोर आलं होत. याही केसाला इन्वेस्टीगेट के माधवन यांनी केलं होत. या केस मध्ये त्यांनी विशेष लक्ष दिलं होत. या केसमधील स्विस बँक अकाउंटचे बँक डिटेल त्यांनी क्रॅक केले होते. परंतु जसा जसा या केसचा निकाल जवळ येत गेला तेव्हा के माधवन यांची बदली करण्यात आली.

त्यावेळी के माधवन हे सुब्रमण्यम स्वामी यांच्या विरुद्ध गेले होते कारण ते या घोटाळ्यातून राजीव गांधी याना वाचवत होते.

न्यायालयात मात्र के. माधव यांनी सगळ्यांनाच झाडून सांगितलं कि , आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असं करणं चुकीचं आहे…. त्यांच्या या विधानाने सीबीआयचे लोकांनी पार वाभाडे काढले, बरीच टीका सीबीआयला सहन करावी लागली. केमध्ये विशेष लक्ष दिले नाही, वेळेवर पुरावे सादर केले नाही असे बरेच आरोप तेव्हा सीबीआयला झेलावे लागले.

त्यानंतर १९९२ साली अशी केस आली ज्याने भारताच्या अर्थकारणात आणि राजकारणात हाहाकार घडवून आणला आणि ती केस म्हणजे हर्षद मेहता स्कॅम. या केसमध्ये त्यांनी जवळपास हर्षद मेहताला चांगलचं धारेवर धरलं. अक्षरशः त्यांनी या प्रकरणाची पाळंमुळं खणून काढली आणि हर्षद मेहताला जेरीस आणलं. पण याही केसमध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला.

नंतर त्यांनी सांगितलं कि माझ्यावर पॉलिटिकल प्रेशर होत, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दबाव होता,  हि केस मला माझ्या पद्धतीने करू दिली नाही, म्हणून मी राजीनामा देत आहे.

राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस सुरु केली. पुढे त्यांच्यावरच आरोप करण्यात आले कि प्रमोशन न मिळाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले कि,

माझ्या बऱ्याच केस मी आधीच सॉल्व केल्या होत्या, माझ्या राजीनाम्याचा आणि प्रमोशनचा काहीच संबंध नाही. सीबीआयला त्यांच्या पद्धतीने काम करू दिले जात नव्हते म्हणून मी राजीनामा दिलाय.

त्यानंतर बीसीसीआय मॅच फ़िक्सिन्ग स्कँडल समोर आलं आणि मोहम्मद अजरुद्दीन, अजय जडेजा,मनोज प्रभाकर आणि नयन मोंगिया अशा बड्या खेळाडूंची यात नावे आली. या प्रकरणाची सीबीआय चौकशी चालूच होती पण

बीसीसीआयने के. माधवन यांची नेमणूक इंडिपेन्डन्ट इन्वेस्टीगेशन करा म्हणून मागणी केली. बीसीसीआयचा के माधवन यांच्यावर जास्त विश्वास होता. माधवन यांनी जेव्हा त्यांचा अंतिम रिपोर्ट सादर केला तेव्हा त्यात अजरुद्दीन ,जडेजा आणि बऱ्याच खेळाडूंना त्यांनी दोषी ठरवलं होत, आणि पुढे ते खरं ठरलं . पण हि केस पुढे चालू राहिली.

वय ८३ असताना जानेवारी २०२०ला त्यांचं निधन झालं.

ज्यावेळी SCAM १९९२ हि वेबसिरीज लोकांनी पाहिली आणि त्यातील त्यांची भूमिका बघितली त्यावेळी के. माधवन यांच्या जीवनावर एक वेबसिरीज आली पाहिजे अशी मागणी लोकांनी केली.

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.