दिल्लीच्या दिशेने पहिलं पाऊल. मोदी शहांच्या दादरा नगर हवेलीमध्ये शिवसेनेचे सीमोल्लंघन…

दादरा नगर हवेली म्हणजेच गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणारा एक महत्वाचा केंद्रशासित प्रदेश आहे. अलीकडेच बातमी आलेली कि, माजी दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर आणि त्यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

जसं कि तुम्हाला आठवत असेल दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह इथल्या एका हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारीला आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. 

खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत मरीन ड्राईव्ह इथल्या एका हॉटेलमध्ये २२ फेब्रुवारीला आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. सुसाईड नोट सापडल्याने ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले होते. सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीचे प्रशासक यांचे नाव असल्याने या घटनेला वेगळेच वळण लागले होते. राज्यातील सत्ताधारी पक्षांनी खास करून शिवसेनेने या प्रकरणी भाजपवर सडकून टीका केली होती.

त्यामुळे लोकसभेची जागा रिक्त झाली होती आणि या जागेवर पोटनिवडणूक पार पडलीये. याच निवडणुकीमध्ये शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना संधी देत महाराष्ट्राबाहेरील पोटनिवडणूक लढवलीये आणि  कलाबेन डेलकर या मतमोजणीच्या संदर्भानुसार त्या आघाडीवर होत्या.

शिवसेनेच्या कलाबेन डेलकर, भाजपचे महेश गावित आणि काँग्रेसचे महेश धोदी यांच्यात तिरंगी लढत झाली होती. या पोटनिवडणुकीत एकूण ७५.९१ टक्के मतदान पार पडलंय. ३३३ मतदान केंद्रांवर ही मतदान झालं होतं. 

भाजपसाठी देखील हि निवडणूक महतवाची झाली होती. आणि म्हणूनच त्यांनी या निवडणुकीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भारती पवार, पुरुषोत्तम रुपाला आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशा मोठ्या नेत्यांना उतरवलं होतं. तर सेनेकडून आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. 

शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांची आघाडी कायम होती तेंव्हाच संजय यांनी देखील, विश्वासाने जाहिरीत्या सांगितलं होतं कि ‘आमचा विजय निश्चित’

कलाबेन डेलकर यांच्यारूपाने शिवसेना दादरा नगर हवेलीत खातं उघडणार आहे. 

३ लोकसभा तर २९ विधानसभा मतदारसंघांचा निकाल जाहीर होणार आहे. अलीकडेच ३० ऑक्टोबरला ३ लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं होतं. दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेशमधील मंडी आणि मध्य प्रदेशातील खंडवा या जागांवर मतदान झालं. तर, देशभरातील विधानसभेच्या २९ जागांवर पोटनिवडणूक पार पडली होती. 

याच लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.त्याला कारणही तसच आहे, दादरा नगर हवेलीच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने लोकसभेच्या जागेसाठी पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना झालाय. दिवंगत अपक्ष खासदार मोहन डेलकर हे या जागेवरून तब्बल सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. आता त्यांच्याच पत्नीला उमेदवारी देत शिवसेनेने या निवडणुक मोठी रंजक बनवली आहे.

कोण होते हे मोहन डेलकर,  

मोहन डेलकर यांचा जन्म १९ डिसेंबर १९६२ रोजी संजीभाई डेलकर यांच्या पोटी झाला. संजीभाई १९६७ मध्ये दादरा आणि नगर हवेली येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आले होते. आणि त्यानंतर  आणि १९६९ मध्ये पक्ष फुटल्यावर मोरारजी देसाई यांच्या एनसीओ गटात सामील झाले होते. मात्र एनसीओ उमेदवार म्हणून १९७१ ची त्यांनी लोकसभा निवडणुक लढवली आणि त्यात  त्यांचा पराभव झाला होता.

मोहन डेलकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात सिल्वासा येथील कामगार संघटनेचे नेते म्हणून केली होती. स्थानिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी आणि आदिवासींच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला. १९८५ मध्ये त्यांनी आदिवासी लोकांसाठीची आदिवासी विकास संघटना सुरू केली.

१९८९ मधल्या नवव्या लोकसभेवर ते दादरा आणि नगर हवेली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले होते. पुन्हा १९९१, १९९६ मध्ये ते याच मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुन्हा निवडून आले.  मात्र १९९८ मध्ये त्यांनी याच मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून गेले होते. 

१९९९ आणि २००४ मध्ये, ते अनुक्रमे अपक्ष आणि भारतीय नवशक्ती पक्ष (BNP) उमेदवार म्हणून लोकसभेवर पुन्हा निवडून आले. त्यांनी स्थापन केलेला पक्ष. ४  फेब्रुवारी २००९ रोजी ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले..अन पुन्हा २०१९ मध्ये त्यांनी कॉंग्रेस पक्ष सोडला. आणि स्वतंत्र आणि अपक्ष राजकारणी म्हणून सक्रीय झाले आणि निवडूनही आले होते. पण त्याच्याच नंतर २०२० मध्ये त्यांनी जनता दल पक्षात प्रवेश केला होता, ते आता आपल्यात नाहीत. या पाश्च्यात त्यांच्या पत्नी कलाबेन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आज ५० हजार मतांच्या मताधिक्याने निवडून देखील आल्या. 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.