कालिचरण महाराजांच्या अटकेमुळे दोन राज्यांमध्ये आता वाद चालू झालेत

महात्मा गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कालिचरण यांना भल्या पहाटे अटक झाली.  छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कालीचरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मध्य प्रदेशमधील खजुराहो येथील बगेश्वरी धाम येथून पहाटे चार वाजण्याच्या सुमारास छत्तीसगड पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. 

आधीच त्यांच्याविरोधात छत्तीसगड, महाराष्ट्रात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मात्र छत्तीसगड ऍक्शन घेतली.  ऍक्शन मुळे दोन राज्यांमध्ये आता वाद चालू झाले आहेत. आता कालिचरण यांच्या अटकेचा आणि या दोन राज्यामध्ये होणाऱ्या वादाचा काय संबंध ? नेमकं काय झालं बघूया …

त्याचं झालं असं कि, 

कालीचरणला मध्य प्रदेशमधून अटक झाली, पण हि अटक छत्तीसगड पोलिसांनी केली. रायपूर जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत अग्रवाल यांनी माध्यमांना सांगितले की, रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराज यांना पहाटे अटक केली. मध्य प्रदेशातील खजुराहो शहरापासून सुमारे २५ किमी अंतरावर असलेल्या बागेश्वर धामजवळ त्यांच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली आहे. पण या अटकेनंतर उत्तर प्रदेश आणि छत्तीसगढ राज्यांमध्ये वाद चालू झाला आहे.

छत्तीसगड पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. असं सांगण्यात येतंय कि, हि कारवाई गुप्तपणे करण्यात आली कारण  कालीचरण महाराजांनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी वास्तव्याची ठिकाणे बदलली होती. अखेर खजुराहोजवळील बगेश्वरी धाम येथील एका घरातून त्यांना अटक करण्यात आली. हे घर त्यांनी भाडे तत्वावर घेतले होते.

 छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराजविरोधात कारवाई करताना मध्य प्रदेश पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती.

त्यामुळे या अटकेच्या पद्धतीवर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी आक्षेप घेतला. नरोत्तम मिश्रा यांनी मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक विवेक जोहरी यांना छत्तीसगडच्या डीजीपीशी बोलून आक्षेप नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत. कालीचरण यांच्या अटकेवर गृहमंत्री डॉ नरोत्तम मिश्रा यांचं म्हणणं आहे की, छत्तीसगड पोलिसांची हि कृती संघीय संरचनेच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन करणारी आहे.

मिश्रा यांनी अटकेबाबत म्हटले आहे की, फेडरल लिमिट्स याला परवानगी देत ​​नाही. कालीचरण यांना  अटक करायची असेल तर तशी नोटीस छत्तीसगढ पोलिसांनी द्यायला हवी होती. पण त्यांनी असे केले नाही.

तर नरोत्तम मिश्रा यांच्या या वक्तव्यावर छत्तीसगडच्या मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पलटवार करत सवाल केला आहे कि, कालीचरणच्या अटकेवर नरोत्तम मिश्रा खुश आहेत की नाही ?

‘छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नरोत्तम मिश्रा यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला असून गांधींचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या अटकेने ते खूश आहेत की नाही, असा सवाल केला आहे?? तर याचबाबत छत्तीसगडचे गृहमंत्री ताम्रध्वज साहू म्हणाले की, छत्तीसगड पोलिसांनी कोणत्याही संघीय रचनेचे उल्लंघन केलेले नाही.

कारवाईची माहिती देताना सीएम बघेल यांनी हे देखील सांगितले आहे कि, छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण महाराज यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या वकिलाला त्यांच्या अटकेची माहिती दिली आहे. त्याला २४ तासांत न्यायालयात हजर केले जाईल.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.