पिक्चरमध्ये एकही डायलॉग नव्हता तरी देखील कमल हसनने सिनेमा हिट केला….

साऊथच्या हिरोंचा वाढता दबदबा हा विषय काय आपल्याला नवीन नाही. रजनीअण्णा, नाझर, कमल हसन, धनुष, अल्लू अर्जुन अशी अनेक जब्राट मंडळी आपल्या अभिनयाने देशभर फेमस झालीत. यातीलच एक नाव म्हणजे कमल हसन. कुठलंही कॅरेक्टर काय ताकदीनं उभं करायचं याच कमालीचं नॉलेज असलेला माणूस म्हणजे कमल हसन. फक्त भारतातच नाही तर जगभरात आपल्या अभिनयाचा डंका कम हसन यांनी वाजवला आहे. पण एक सिनेमा असा होता ज्यात कम हसन यांचा एकही डायलॉग नसताना सिनेमा हिट झाला होता.

१९८७ साली कमल हसन यांचा एक सिनेमा आला होता नाव होतं, पुष्पक विमान. या सिनेमाला सेन्सर बोर्डाने कन्नड भाषिक सिनेमा म्हणून पास केलं होतं. हिंदीमध्ये पुष्पक, तमिळमध्ये पेसुम पदम, तेलगूमध्ये पुष्पका विमानमु, आणि मल्याळमध्ये पुष्पकविमानम नावाने हा सिनेमा बहुभाषेत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा इतक्या भाषेत रिलीज होण्याचं कारण होतं कि या फाईलमध्ये एकही डायलॉग नव्हता.

या सिनेमात मेन स्टारकास्ट होती कमल हसन, अमाला आणि टिनू आनंद. हा एक सायलेंट सिनेमा होता. या सिनेमाचं वैशिष्ट्य होतं कि या सिनेमासारखा इतर कुठलाही दुसरा सिनेमा झाला नाही. डार्क कॉमेडी असलेल्या या सिनेमात एकही संवाद नव्हता पण कमल हसन यांनी डायलॉग नसतानाही आपल्या एक्सप्रेशनने हा सिनेमा भारताच्या फिल्म जगतातला कल्ट सिनेमा म्हणून फेमस केला.

हा सिनेमा ज्यावेळी बनवण्याचा विचार चालू होता तेव्हा या सिनेमावर कुणीच पैसे लावायला तयार नव्हत. या सिनेमाची स्टोरी लिहिलेली होती सिंगीतम श्रीनिवास यांनी. कमल हसन ज्यावेळी सिनेमा करायला तयार झाले तेव्हा दिग्दर्शक श्रीनिवास राव यांच्यासमोर प्रश्न पडला कि या सिनेमावर पैसे लावणार कोण ? त्यावेळी ३५ लाखात बनलेल्या या सिनेमाला सुरवातीला निर्माता मिळत नव्हता. यानंतर श्रीनिवास राव यांनीच सिनेमा प्रोड्युस करायचं ठरवलं. ज्यावेळी अभिनेता शृंगार नागराज यांना हि बातमी कळली त्यांनी राव यांचं कौतुक केलं आणि स्वतःही निर्माते झाले. 

पुष्पक या सिनेमाला कथेमुळे नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. या सिनेमाची स्क्रिप्ट इतकी जबरदस्त होती कि सिनेमातून प्रेक्षकाला हटू देत नव्हती. विना डायलॉग फक्त एक्स्प्रेशनच्या जोरावर कमल हसन यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. १९८७ सालचा बेस्ट पॉप्युलर फिल्म आणि नॅशनल अवॉर्ड पुष्पक सिनेमाला मिळाला होता.

पुष्पक सिनेमात काय होतं तर एक बेरोजगार युवक असतो त्याची इच्छा असते कि काम न शोधता मजा करता आली पाहिजे. तो ओव्हरस्मार्ट असतो. एका दिवशी चुकीने त्याला हॉटेलच्या एका खोलीची चावी मिळते आणि तो बरेच दिवस तिथे मौजमजा करतो. काही दिवसांनी त्याला कळत कि आपण तर दुसऱ्याच्या पैशावर अय्याशी करतोय आपलं स्वतःच असं काहीच नाहीए. 

लव्ह स्टोरी सुद्धा यात आहे पण ती पूर्ण होत नाही. शेवटी यात जोवर तो स्वतःला गंभीरतेने घेत नाही तोवर काहीच शक्य नाही. या सिनेमातला प्रत्येक सिन काहींना काही मेसेज देतो. बेरोजगारीवर योग्य पद्धतीने भाष्य सिनेमाने केलेलं आहे. या सिनेमातून सांगण्यात आलं कि पैसे कितीही येओ पण खरी मनशांती हि मेहनतीच्या पैशातूनच मिळते.

या सिनेमाचं कौतूक खुद्द भारतीय फिल्म जगतातले दिग्गज सत्यजित रे यांनी केलं होतं. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.