म्हणून कमलनाथ यांना इंदिरा गांधी यांचा तिसरा मुलगा म्हटलं जात होतं

काँग्रेस मध्ये सर्वाधिक शक्तिशाली कोण असतं तर हायकमांड मधील नेते. कुठलाही निर्णय असुद्या हायकमांड मधील नेत्याला टाळून चालत नाही. यातलच एक नाव म्हणजे कमलनाथ. मागच्या ५० वर्षांपासून कमलनाथ हे राजकारणात सक्रिय असल्याचे सांगितलं जात आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांना इंदिरा गांधी यांचे तिसरा मुलगा म्हटले जायचे त्याचे कारण सांगण्यापूर्वी कमलनाथ काँग्रेस आणि गांधी कुटुंबियांच्या जवळ कसे आले ते पाहुयात. 

सुरुवाती पासून सांगायचे म्हणजे कलनाथ हे मध्यप्रदेश मधील कानपुर या गावाचे. त्यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९४६ ला झाला होता. गांधी कुटुंबियांच्या तीन पिढ्यांसोबत कमलनाथ यांनी काम केलं आहे. आजही ते काँग्रेस घराण्याचे जवळचे समजले जातात.

तसा कमलनाथ हे काँग्रेस मध्ये येण्यापूर्वीच गांधी कुटूंबियांच्या परिचयाचे झाले होते. त्याच कारण म्हणजे संजय गांधी आणि कमलनाथ हे डून स्कुल मध्ये सोबत शिकत होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या बद्दल गांधी कुटुंबियांना मागोदर पासून माहिती होती.

१९७० पासून कमलनाथ यांनी युथ काँग्रेस मधून राजकारणाला सुरुवात केली होती.

तेव्हा त्यांची ओळख ही संजय गांधी यांचे जवळचे मित्र म्हणून होती. त्यातच आणीबाणी नंतर झालेल्या १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता. आणि त्यामुळे देशात पहिल्यांदाच गैर काँग्रेस सरकार स्थापन झालं होत. मात्र हे सरकार जास्त दिवस चालले नाही.

पंतप्रधान मोरारजी देसाई आणि समाजवादी नेते राजनारायण यांच्यांत अंतर वाढायला सुरुवात झाली होती. संजय गांधी यांनी या दोन नेत्यात अंतर पडायला हवं यासाठी प्रयत्न केले. आणि याला साथ दिली होती कमलनाथ यांनी.

राजनारायण यांच्यातील असंतोष वाढावा यासाठी संजय गांधी प्रयत्न करत होते.यासाठी संजय गांधी यांना राजनारायण यांना भेटायचे होते. मात्र त्यांना भेटता येत नव्हते. सरकारी संस्था म्हणजेच सीबीआय, गुप्तचर विभाग या सारख्या संस्था काँग्रेसच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असायच्या. यावर उपाय काढला तो कमलनाथ यांनी.

कमलनाथ हे संजय गांधी आणि राजनारायण यांना आपल्या कार मध्ये बसवून दिल्लीपासून दूर जंगलात निघून जातं. यानंतर हे तिघंही राजकीय गोष्टींवर चर्चा करत. संजय गांधी यांनी राजनारायण यांच्यात काय चर्चा झाली हे इतर कोणाला कळू नये म्हणून स्वतः कलनाथ कार चालवत.

तसेच कमलनाथ यांनी या सगळ्या काळात काही महत्वाच्या गोष्टी केल्या. त्यातील एक म्हणजे जे उद्योगपती हे काँग्रेसच्या बाजूने होते त्यांची संजय गांधी यांच्याशी भेट घडवून आणली होती. त्यातील एक होते मिकिन्स कंपनीचे मालक कपिल मोहन यांची भेट घडवून आणली होती. संजय गांधी यांच्या भेटीनंतर हे व्यापारी राजानारायण यांना सुद्धा भेटले.

अशा अनेक गोष्टीमुळे राजनारायण हे मोरारजी देसाई यांच्या पासून लांब जात गेले आणि या दोघांमध्ये अंतर पडले. यामुळे जनता पक्षाचे सरकार पडले. यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चरण सिंह हे पंतप्रधान झाले. मात्र तो प्रयत्न काँग्रेस स्वबळावर काँग्रेस परत आली होती. १९८० मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि काँग्रेस बहुमताने सत्तेत आला.

जनता पक्षाची सत्ता घालवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कमलनाथ यांचे काँग्रेस मधले वजन वाढले. १९८० मध्ये इंदिरा गांधी यांनी कमलनाथ यांना मध्यप्रदेश मधील छिंदवाडा येथून तिकीट देण्यात आले. १९७७ मध्ये अख्ख्या मध्यप्रदेश मधून काँग्रेसचे फक्त २ खासदार निवडून आले होते. गार्गीशंकर यांचे तिकीट कापून कमलनाथ यांना तिकीट दिले होते. जनता पक्षाचे सरकार पडल्याने कमलनाथ यांना गिफ्ट म्हणून इंदिराजींनी तिकीट दिले होते.

संजय गांधीसाठी सर्वकाही

१९७७ मध्ये जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच संजय गांधी यांना अटक करण्यात आली. त्यांना तिहार जेल मध्ये ठेवण्यात आले होते. यामुळे इंदिरा गांधी यांना सुरक्षे संदर्भात चिंता वाटत होती. इंदिरा गांधी यांनी ही गोष्ट कमलनाथ यांना बोलून दाखवली. कमलनाथ यांनी यावर एक उपाय शोधला त्यामुळे इंदिरा गांधी या चिंता मुक्त झाल्या. आणि कमलनाथ हे गांधी कुटुंबियांचे गुडबुक मध्ये गेले.

कमलनाथ यांनी जाणून बुजून न्यायाधीशांनी भांडण केले. न्यायाधीशांचा अपमान केल्या प्रकरणी कमलनाथ यांना ७ दिवसांसाठी जेल मध्ये पाठवण्यात आले. या सगळ्या काळात कलनाथ संजय गांधी यांच्या जवळच होते. त्यामुळे अनेकवेळा असं म्हटलं जात होते की, कमलनाथ हे इंदिरा गांधी यांचा  तिसरा मुलगा आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.