बलात्कार झाल्यानंतर स्त्रियांची नाही तर त्या बलात्काऱ्याची अब्रू जाते….

पुरुषांना हे कळले पाहिजे कि, हा पितृसत्ताक समाज स्त्रियांचंच नाही तर त्यांचं देखील नुकसान करत आहे, पुरुषांना राक्षशी वृत्ती चा बनवत आहे. 

“माझ्यासाठी स्त्रीवाद कधीच पुरुषविरोधी नव्हता. स्त्रीवाद हा पितृसत्ता विरोधी आहे. स्त्रीवाद म्हणजे केवळ पितृसत्ता मोडून काढणे नव्हे. एक नवीन समाज तयार करणे हा उद्देश या चळवळीमागे आहे. आणि हे देखील खरंय कि, स्त्रिया देखील पुरुषप्रधान विचाराच्या असू शकतात आणि आहेत.हि आपल्या समाजाची विचारसरणीच आहे, जी आपल्याला पुरुषप्रधान किंवा स्त्रीवादी बनवते” असा विचार मांडणाऱ्या स्त्रीवादी कार्यकर्त्या, लेखिका आणि भारतातील महिला हक्कांच्या चळवळीतील दिग्गज नेत्या कमला भसीन यांचे शनिवारी सकाळी निधन झाले….

कमला भसीन या मुळच्या राजस्थानच्या ग्रामीण भागात लहानाच्या मोठ्या झाल्या. भसीनचा जन्म २४ एप्रिल १९४६ रोजी सध्याच्या पाकिस्तानच्या मंडी बहाउद्दीन जिल्ह्यात झाला. त्यांचे शिक्षण सरकारी शाळेत झाले, शिक्षण भारतात पूर्ण करून त्या जर्मनीमध्ये दोन वर्षे घालवली, त्यानंतर त्या पुन्हा ग्रामीण भागात काम करण्याचा निर्णय घेतला आणि भारतात परतल्या.

१९७० मध्ये त्यांचा फॅन्सी जर्मन सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्या ग्रामीण भारतासाठी काम करण्यासाठी परतल्या.

सुरुवातीला त्यांनी उदयपूरमधील सेवा मंदिरात काम करण्याचा निर्णय घेतला आणि तेथे चार वर्षे काम पाहिले. त्यांची पहिली चिंता, गरिबी आणि निरक्षरता होती. नंतर त्यांनी जल विकासावर अनेक वर्षे काम केले.

पण याच दरम्यान त्यांना त्या उदयपूरच्या सेवा मंदिरात एक अमेरिकन महिला  भेटली जिने कमला यांना एका प्रसिद्ध अमेरिकन स्त्रीवादी मासिकाचे एक वर्षाचे वर्गणी गिफ्ट केली होती. तोपर्यंत त्यांनी  “स्त्रीवाद” हा शब्द ऐकला नव्हता. ना वाचला नव्हता. त्यानंतर त्यांनी ८० च्या दशकात सिमोन दि बोव्हा चे लेखन बाचले. समजून घेतले आणि त्या स्वतः देखील लिहियाला लागल्या.

आणि १९७५ पासून त्या कार्यरत झाल्या. दरम्यान यूएनने कमला यांना त्यांच्यासोबत काम करण्यास सांगितले. तिथे त्यांनी पुरुष आणि महिलांसोबत तीन -चार कार्यशाळा केल्या. त्यानंतर त्या महिलांसोबत कार्यशाळा करण्यावर भर द्यायला सुरुवात केली. १९७० ते २००२ पर्यंत त्या विकास आणि गरिबीच्या समस्यांवर काम करणाऱ्या संस्थांसोबत काम करायच्या आणि शेवटी त्यांनी त्यांचा स्त्रीवाद आणला.

२००२ मध्ये त्यांनी स्त्रीवादी नेटवर्क ‘संगत’ ची स्थापना केली,

दिल्लीला राहायला आल्यानंतर त्यांना स्त्री चळवळीत काम करणाऱ्या इतर स्त्रीवादी भेटल्या. मथुरा बलात्कार प्रकरण त्याच सुमारास घडले आणि मी त्यावर काम केले. हुंडाबळी जात होते.  त्यानंतर जण-जागृती साठी त्यांनी महिलांवर गाणे लिहियाला सुरुवात केली. ज्यातली अनेक गाणी खूप गाजली. तसेच नाटकं देखील करणे सुरु केले होते. यातलेच ओम स्वाहा नावाचे नाटक जे नंतर खूप लोकप्रिय झाले होते. हिंदी पुस्तके, संगीत, गाणी आणि पोस्टर्सची मालिका प्रकाशित होऊ लागली.

May be an image of text that says "" बड़े साहब की चार गालियाँ खाकर ऑफिस से घर लौटा वह आदमी और बीवी को सुना दी आठ गालियाँ बीवी ने बच्चे को जड़ दिए दो तमाचे बच्चे ने बेजान खिलौना तोड़ दिया उत्पीड़न कभी नष्ट नहीं होता केवल स्थानांतरित होता है ताक़तवर से कमज़ोर की तरफ़"

१९८४ च्या सुमारास, त्यांनी जागोरीला सुरुवात केली. त्यांनी कधी जागोरीसाठी पूर्णवेळ काम केले नाही तसेच एक नेता म्हणून देखील त्यांनी कधीच स्वतःचा उल्लेख केला नाही. त्या संयुक्त राष्ट्र संघाबरोबर काम करत होत्या, त्यांचे लिखाण देखील चालू होते. मात्र त्यांना हळूहळू समजले कि, जर आपल्याला वर्ग, लिंग आणि जातीच्या समस्यांवर काम करायचे असेल तर लिखित शब्द पुरेसे नाहीत. तर त्यासाठी सक्रियपणे काम केले पाहिजे असं ठरवून त्या स्त्री चळवळीत उतरल्या.

May be an image of flower and text that says "माहवारी मेरी कमज़ोरी नहीं मेरी सृजन शक्ति है #DignifiedMenstruation Lines: Kamla Bhasin Design: Sajana) Sangat Frenitint Netesrk"

३५ वर्षाहून अधिक काळ त्या विकास, शिक्षण, लिंग, मीडिया आणि इतर अनेक विषयांशी सक्रियपणे काम करत होत्या.  १९७० च्या दशकापासून, भसीन भारतातील तसेच इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये महिलांच्या चळवळीचा एक प्रमुख आवाज बनल्या होत्या.

 महिला हक्क चळवळीच्या लढ्यात कमला भसीन यांचं योगदान महत्त्वपूर्ण होतं.

राजस्थानमध्ये स्वयंसेवी संस्थेसह १९७२ मध्ये ग्रामीण आणि शहरी गरीबांच्या सक्षमीकरणासाठी आपले काम सुरू केले. १९७६ ते २००१ पर्यंत भसीन ने संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (FAO) मध्ये काम केले. त्यांनी २००२ मध्ये संयुक्‍त राष्‍ट्रातील नोकरीचा राजीनामा दिला, संगातासोबत काम करण्‍यासाठी, ज्‍यामध्‍ये त्या एक संस्थापक सदस्‍य आणि सल्लागार होत्या.

काम सक्रीय ठेवतच त्यांनी लिंग सिद्धांत, स्त्रीवाद आणि पितृसत्ता समजून घेण्यावर अनेक पुस्तके लिहिली आहेत, त्यापैकी अनेक ३० पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवादित केली गेली आहेत.

काही महिन्यांपूर्वीच त्यांना कॅन्सरचं निदान झालं होतं आणि त्यातच आज त्यांचे पहाटे ३ च्या सुमारास निधन झाले. भसीन याचं सोडून जाणं हे स्त्री चळवळीसाठी हा एक मोठा धक्का आहे.

 हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.