गडचिरोलीच्या हत्ती कॅम्पचे हत्ती अंबानींच्या ‘प्रायव्हेट झू’ साठी गुजरातला पाठवले जातायेत

ट्विटरवर सद्या एक हॅशटॅग मोहीम चालू आहे…..#कमलापूरवाचवा ! हि मोहीम राबवली जातेय ती  म्हणजे गडचिरोलीमधल्या एका हत्ती कॅम्पसाठी. संपूर्ण राज्यभरात असलेल्या एकमेव हत्तीकॅम्पचं अस्तित्वच धोक्यात आलंय….का ? तर याच हत्तीकॅम्पमधील हत्तींना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या प्रायव्हेट प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात येणार आहे….आणि केंद्र सरकारने याची परवानगी देखील अगदी सहज देऊन टाकली आहे, आणि विशेष म्हणजे राज्य सरकार देखील याबाबत काहीच प्रयत्न करत नाही त्यामुळे सगळीकडेच याबद्दल संताप व्यक्त केला जातोय…..त्यामुळे हे संपर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे….

तर विषय आहे, संपूर्ण राज्यभरात हत्तींना पाहण्यासाठी एकमेव आकर्षण असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या कमलापूर येथील हत्ती कॅम्पचा. ज्याचं अस्तित्व संकटात आहे का ते टप्प्याटप्प्याने समजून घेवूया… 

गडचिरोली मधील कमलापूर हे आधी नक्षलवाद्यांचे माहेर घर म्हणून ओळखले जात होते नंतर तिथे हत्तीकॅम्प सुरू झाले आणि हे ठिकाण पर्यटन स्थळं म्हणून प्रसिद्ध झाले, इतकेच नाही तर हा गडचिरोली जिल्हा हत्तीसाठी अनुकुल आहे, म्हणून मागील काही दिवसांपूर्वी २६ हत्ती जिल्ह्यातिल जंगलात आलेत असं सांगण्यात येतंय. कमलापूर आणि अल्लापल्ली येथील नैसर्गिक जंगलांमध्ये ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून वनविभागाकडून हत्तींचा पालनपोषण केलं जात आहे. यहा त्यांची वंशावळ वाढवून कमलापुरा दहापेक्षा जास्त हत्ती झाले आहेत. त्यामुळे नक्षलग्रस्त भाग असूनही राज्यभरातील पर्यटक किती हत्तींना पाहण्यासाठी येतात आणि ते नैसर्गिक वातावरणात राहतात पण आता हत्ती गेल्यानंतर हा कॅम्प ओसाड पडणार आहे. 

कारण याच कमलापूर आणि आलापल्लीतील मिळून ७ हत्ती हत्तींना आता रिलायन्स ग्रुपच्या वतीने गुजरातमध्ये उभारल्या जात असलेल्या प्राणिसंग्रहालयाला पाठवले जाणार आहे. एका खासगी प्राणिसंग्रहालयाची शान वाढवण्यासाठी, सरकारची अनमोल मालमत्ता देण्याचा जो हा  खटाटोप चालतोय त्याबद्दल कोणत्याही वन्यप्रेमींना संताप येणारच ना? कारण नक्षलग्रस्त भागाचा विकास होत असताना तेथिल जनतेला मुख्य प्रवाहात आणण्याचे सोडून हत्ती कॅम्प गुजरातला नेऊन काय साध्य करणार? असा संतप्त सवाल स्थानिक नागरीकांकडून केला जातोय. 

मग आम्ही या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन काही माहिती काढली. तर मिळालेल्या  माहितीनुसार गुजरातच्या जामनगर भागात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कडून देशातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय उभारले जातेय…हा खूप मोठा प्रोजेक्ट असणारे असं सांगितलं जातंय..अंबानींच्या या खाजगी प्राणिसंग्रहालयासाठी देशभरातून विविध वन्यप्राणी मागवले जात आहेत. त्यातच गडचिरोली जिल्ह्यात वन विभागाच्या ताब्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमधून सातपैकी चार हत्ती तर अल्लापल्लि तीन हत्ती गुजरातला पाठवले जाणार आहेत.

कमलापूरच्या या हत्ती कॅम्पमधून कोणते चार हाती घेऊन जायचे हे रिलायन्सने पाठवलेले डॉक्टर ठरवणार आहेत. 

हे डॉक्टर चांगलेच हत्ती निवडणार. त्यांनी निवडून निवडून चांगले हत्ती नेल्यानंतर  कमलापूरच्या हत्ती कॅम्पमध्ये शिल्लक राहणाऱ्या तीन हत्तींची वंशावळ वाढू शकली नाही तर येथील हत्ती कॅम्पचे अस्तित्वच संपुष्टात येणार आहे…आणि हि धोक्याची घंटा आहे कारण, विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या वन्यजीव विभागाकडून अनेक ठिकाणचे दुर्मिळ प्राणी हे प्राणी संग्रहालय साठी देण्याची परवानगी देखील दिली जात आहे.

कमलापूरमधील हत्तींच्या पालनपोषणासाठी राज्य सरकारकडून वेळेवर निधी मिळत नाही. हत्तींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ पशुवैद्यकीय अधिकारी ही नाहीत. गेल्या दोन वर्षात कॅम्पमधील तीन हत्तींचे पिले आजाराने मरण पावली होती. राज्यात एकमेव असलेले हत्ती कॅम्प कडे सरकारने लक्ष दिल्यास गडचिरोलीतील पर्यटन वाढवून रोजगार निर्मिती होऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्रतील एकमेव हत्तीकॅम्पमधून हत्ती गुजरात मध्ये अंबानीच्या प्राणी संग्रहालय स्थलांतर करण्यात येणार आहे आणि याविरुद्ध आवाज उठवून #कमलापूर_वाचवा म्हणून आम्हाला साथ द्या अशी भावनिक विनंती गडचिरोलीकरांकडून जातेय 

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.