कंगना आणि मुन्नावर फारुखी एकाच शोमध्ये आलेत आणी शो बॉयकॉट करण्यावरून फॅन्स गोंधळलेत

कंगना राणावत सुरवातीला आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या ताई सध्या आपल्या राजकीय विचारांमुळेही सारख्या चर्चेत असतात. त्यामुळं ऍक्टिंगसारखीच आपल्या बेधडक बोलण्यानंही कंगना रानवतनं आपलं कल्ट फॅन फोल्लोविंग जमा केलंय.

कधी कधी कंगना राणावत एवढ्या टोकाचं बोलली आहे की त्यांचं सोशल मीडिया अकाउंट बंद करण्यात आलंय.

आणि आता दुसऱ्या साइडला आहे मुनाव्वर फारुखी आपल्या जोकमुळे जेलमध्ये जाऊन आलेला स्टॅन्ड अप कॉमेडियन. त्याचे सगळे शोज सध्या हिंदुत्ववादी संघटना उधळून लावता आहेत आणि यालाच कंटाळून त्याने स्टॅन्ड-अप सोडण्याची घोषणाही केली होती.

आता ही दोन विरोधी टोकं एकता कपूरनं तिच्या लॉक अप या रिऍलिटी शोमध्ये एकत्र आणली आहेत.

कंगना राणावत हा शोची जज असणार आहे तर मुनाव्वर फारुखी स्पर्धक. ALTBalaji आणि MX Player वर येणाऱ्या  Lock Upp या शोमध्ये मुनाव्वर आणि इतर १५ ‘वादग्रस्त’ सेलिब्रिटींना ७२ दिवसांसाठी तुरुंगात बंद केले जाईल. त्यांना त्यांची बाहेर असणारी लाईफस्टाईल आणि इतर सोयीसुविधा नाकारल्या जातील.

 प्रेक्षकांना त्यांच्या निवडलेल्या स्पर्धकांना शिक्षा किंवा बक्षीस देण्याचा अधिकार असेल.

आज कॉमेडियन मुनावर फारुकीची ओळख रिअॅलिटी शोचा दुसरा कन्फर्मेड स्पर्धक म्हणून झाली. याआधी लॉकअपची पहिली स्पर्धक म्हणून निशा रावलची निवड करण्यआहे.Lock Upp वर स्पर्धक असण्याबद्दल बोलताना, मुनावर म्हणाला, “लॉक अप हा एक वेगळाच शो असणार आहे.

इंडिस्ट्रीतला प्रवास हा माझ्यासाठी हा एक खडतर आणि आव्हानात्मक असला तरी, मला आनंद आहे की या शोने मला स्वतःला खऱ्या अर्थाने सेटअप करण्याची संधी दिली आहे. मला असा अनोखा रिअॅलिटी शो ऑफर केल्याबद्दल अल्ट बालाजी, एमएक्स प्लेयरशी जोडल गेल्याबद्दल मला आनंद होत आहे.”

म्हणजे मुनावर सध्या तरी सेकंड चान्स मिळाला म्हणून खुश आहे. फारुकीने असा दावा केला आहे की गेल्या दोन महिन्यांत त्यांचे १२ शो धमक्यांमुळे बंद करण्यात आले होते.

मात्र कंगना आणि मुनावर दोघे एकत्र आल्यानं त्यांच्या फॅन्सची चांगलीच पंचाईत झाली आहे. या दोघांचेफान्स अगदी विरुद्ध विचारसरणीची आहेत. त्यामुळं कंगना आहे म्हणून बॉयकॉट करायचा का मुनावर आहे म्हणून हे त्यांना कळेनासं झालंय.

सध्या तरी ते आपल्या आपल्या ‘रोल मॉडेल्सलाच’ ट्रोल  करण्यात धन्यता मांडतायेत.

बाकी एकता कपूरनं आपला डाव बरोबर साधला आहे. या विरोधी टोकाच्या वादग्रस्त लोकांना एकत्र आणून तिनं शोबद्दल जेवढी चर्चा घडवून आणायची होती तेवढी घडवून आणली आहे. आता फॅमिली ड्रॅमा सीरिअल्सची जी लाट एकता कपूरनं टेलिव्हिजनवर आणली होती तशीच रिऍलिटी शोची लाट ती OTT  प्लॅटफॉर्मवर लॉक अप हा शो आणणार का हे पाहण्यासारखं असणार आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.