कंगना स्वतः सांगते, “वयाच्या १५ व्या वर्षी ती ड्रग ॲडीक्ट बनली होती…”

नुकतीच घडलेली घटना म्हणजे बॉलीवूडचा किंग खान असलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्स प्रकरणात सापडला. यावर बरीच चौकशी सुरू आहे. बॉलिवूडमधून शाहरुखला सपोर्ट करणारे हिरोसुद्धा दिसत आहेत. पण ही काही पहिलीच केस नाही की स्टारकीड लोकांनी हा ड्रग्जचा राडा केला. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणारे सगळ्यांनाच लटकवलं होतं. पण या ड्रग्ज प्रकरणाबद्दल कंगना राणावतने एक तिच्याबद्दल घडलेला किस्सा सांगितला होता.

बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवण्यासाठी आणि हिरोईन बनण्यासाठी कंगना राणावत आली खरी पण अभिनेत्री बनण्याआधी ती ड्रग्जच्या आहारी गेली होती तेही वयाच्या 15 व्या वर्षी. 

बॉलिवूडमध्ये करिअर करायचं, अभिनेत्री बनायचं ,नावारूपास यायचं असं सगळं ध्येय डोक्यात ठेवून कंगना राणावत वाटचाल करत होती. पण घरातून तितका सपोर्ट मिळत नव्हता आणि ती शेवटी घरातून पळून गेली ते फक्त आणि फक्त हिरोईन बनण्यासाठी. अभिनयाच्या वेडाने तिला पछाडलेलं होतं. मुंबईत येऊन आपल्याला काही काम मिळेल यावर तिचा दृढ विश्वास होता. बराच संघर्ष कंगणाला करावा लागला. हिरोईन व्हायचं राहिलं बाजूला आणि कंगणाला वाईट लोकांची संगत लाभली आणि इथून ती मागे पडत गेली.

घरून वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी पळून आलेली कंगना मादक पदार्थांच्या आहारी गेली. ही खरंतर तिच्यासाठी मोठा धक्का देणारी गोष्ट होती. मुंबईत आल्याच्या दीड वर्षात ती नशेच्या आहारी गेली होती. काम सुद्धा तिला मिळू लागलं होतं पण ती नशेच्या आहारी इतकी गेली होती की तिला वाटायचं की ती हाताने चंद्र तारे पकडू शकते.

तिचा पूर्वीचा बॉयफ्रेंड अभिनेता अध्ययन सुमन सांगतो,

२००८ साली मार्च महिन्यात कंगनाच्या वाढदिवसा दिवशी तिने लिला हॉटेल येथे एक मोठी पार्टी दिली होती. तिचे सर्व मित्र आणि सहकलाकार या पार्टीसाठी उपस्थित होते. पार्टी वेळी तिने आज रात्री कोकेन घेऊ असं सांगितलं. मी तिच्या सोबत एकदोनदा हॅश च सेवन केलं होतं पण मला ते आवडलं नव्हतं. म्हणून मी कोकेनला नकार दिला. मला आठवतंय आमची त्या रात्री आजवरची सर्वात मोठी भांडणे झाली होती.

वाईट संगत आणि नशा यामुळे कंगना खचत चालली होती, व लवकरच तिला यातला फोलपणा जाणवला. कंगणाला तिच्या एका मैत्रिणीने स्वामी विवेकानंद यांचं एक पुस्तक भेट म्हणून दिलं आणि त्या पुस्तकातून जीवन कसं जगावं याची ऊर्जा तिला मिळाली आणि ती तिथून पुढे स्वामी विवेकानंदांची शिष्य बनली. कंगना म्हणते की

त्या वाईट काळामुळेच मला समजलं की आयुष्यात आपल्याला काय करायचंय, कुठं जायचंय. त्यामुळं त्या वाईट काळाला धन्यवाद देणसुद्धा गरजेचं आहे.

जर माझ्या आयुष्यात आव्हानात्मक काळ आला नसता तर मी गर्दीत हरवले असते. आध्यात्मिक मार्गदर्शनाशिवाय, मी माझी इच्छाशक्ती विकसित करू शकलो नसतो, मी माझी बुद्धी वाढवू शकलो नसतो किंवा माझी प्रतिभा वाढवू शकलो नसतो किंवा माझे भावनिक आरोग्य विकसित करू शकलो नसतो.

आज घडीला कंगना राणावत आघाडीची अभिनेत्री आहे. देशभरातल्या महत्वाच्या मुद्द्यांवर ती भाष्य करते, बेधडकपणे आपलं मत मांडते. सुशांतसिंग राजपुतच्या प्रकरणावेळी कंगणाने बॉलिवूडमधल्या नेपोटीझम, ड्रग्ज प्रकरण यावर कडाडून हल्ला चढवला होता.

करोनाच्या काळात तिने एका सोशल मीडिया साईटवर व्हिडिओ टाकला होता आणि त्यात सांगितलं होतं की वयाच्या 15 व्या वर्षी ती ड्रग्सच्या आहारी गेली होती.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.