कंगनाला आंदोलकांनी घेरलं अन् चक्क तिने शेतकऱ्यांची माफीच मागितली..

वाद आणि कंगना यांचे खूप जवळचे नाते आहे. अनेकदा वादात अडकणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना आता एका संकटात अडकलीच त्यातून ती सुटली….त्याचं झालं असं कि, ती हिमाचलमधून पंजाबमध्ये येत असताना शेतकऱ्यांनी तिच्या कारवर हल्ला केल्याचा आरोप कंगनाने राणावतने नुकताच केला आहे.

पंतप्रधान मोदींनी ३ कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर पंजाब शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन सुरु केले होते. त्याचदरम्यान कंगनाने या आंदोलक शेतकऱ्यांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिने तेंव्हा  शेतकरी आंदोलनाला ‘खलिस्तानी आंदोलन’ म्हटलं होतं…तर शेतकऱ्यांना दहशतवादी बोलली होती.

असं एवढ्या टोकाचं बोलल्यावर शेतकरी आंदोलक कसे गप्प राहतील त्याचाच परिणाम आजच्या घटनेतून दिसून आला. ती पंजाबमध्ये असतांना शेतकरी आंदोलकांनी कंगनाचा ताफा अडवला आणि कंगनाला तिने केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागायला सांगितले…तिने माफी मागे पर्यंत हट्टाला पेटलेल्या शेतकऱ्यांनी कंगनाला पुढे जाऊ दिले नाही…

मिळालेल्या माहितीनुसार, कंगना मनालीहून चंदीगडला जात होती. दरम्यान, रोपर येथील चंदीगड-उना महामार्गावर शेतकऱ्यांनी चक्का जाम करून तिला रोखले. यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त होता. मात्र शेतकऱ्यांनी तिची गाडी पुढे जाऊ दिली नाही. कंगनाच्या गाडीला घेराव घालून आंदोलक शेतकरी तिला माफी मागण्यास सांगत होता.

जोपर्यंत कंगनाने शेतकऱ्यांवर केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तोपर्यंत आपण त्यांना जाऊ देणार नसल्याचे तिने सांगितलंय.

तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर याच बाबतीतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. कंगना रणौतने जमावाने घेरल्याचे व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. 

त्यात तिने असं म्हणलं आहे कि, ‘ ‘मी नुकतेच हिमाचल सोडले आहे, कारण माझी फ्लाइट कॅन्सल झालीये. त्यामुळे मी कारने निघालेय. पण मी पंजाबमध्ये पाऊल ठेवताच लोकांच्या जमावाने माझ्यावर हल्ला केला. हे लोकं स्वतःला शेतकरी म्हणवून घेतात. हे लोक मला अश्लील शिवीगाळ करत आहेत आणि जीवे मारण्याच्या धमक्याही देत ​​आहेत. असा आरोपही तिने या व्हिडिओ मध्ये केला आहे”. 

यानंतर कंगना व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या महिलांशी बोलतांना दिसली. कंगनाने आंदोलना दरम्यान आंदोलनात सहभागी असलेल्या महिलांना १०० रुपयांच्या किरायाने आणलंय असं वादग्रस्त व्यक्तव्य केलेलं. कंगनाच्या या वक्तव्यामुळे महिला संतप्त झाल्या होत्या. पण आजच्या व्हिडिओत ती म्हणतेय की, ‘जे मी वक्तव्य केलेलं ते शाहीनबागमधील्या महिलांसाठी होतं”. 

कंगना रणौतने जमावाने घेरल्याचे व्हिडीओदेखील शेअर केले आहेत. त्यावर तिने नेहेमीप्रमाणेच वक्तव्य सुरु केले कि, ” हि लोकं स्वतःला शेतकरी असल्याचे म्हणवून घेत आहेत. देशात सुरक्षा नसेल आणि अशा पद्धतीच्या घटना घडत असतील, तर हे खूप भयंकर आहे. आणि अशा घटनेच्या वेळेस माझ्यासोबत सुरक्षा यंत्रणा नसेल तर माझे काय होईल. याची मी कल्पना देखील मी करू शकत नाही. इतके पोलीस असतांना देखील मला शेतकऱ्यांनी मला जाऊ दिले नाही.

यावेळेस तिने असेही प्रश्न केलेत कि, माझी गाडी अडवायला काय मी राजकीय नेता आहे का? कि मी कोणती पार्टी चालवते ? असं काहीही नसलं तरी इथं माझ्या नावाने राजकारण केलं जातं.  आणि त्याचमुळे माझी गाडी घेरण्यात आली आहे. अन जर काय इथं पोलिस हजर नसते तर मला या घेरावाने मॉब लीचींग मध्ये मारून टाकलं असतं असंही ती म्हणाली. 

सुरुवातीला कंगना गाडीत बसून जमावाविरुद्ध व्हिडिओ बनवून वक्तव्य करताना दिसली, पण नंतर कंगनाने अखेर हार स्वीकारत शेतकऱ्यांची माफी मागितली.

बराच वेळ शेतकऱ्यांच्या जमावाच्या विरोधाला सामोरं गेल्यानंतर शेवटी कंगनाने शेतकऱ्यांची माफी मागत तिने या आंदोलक शेतकऱ्यांसोबत सेल्फी घेतला, आणि किसान एकटा जिंदाबाद असा नारा दिला आणि मगच तिला शेतकऱ्यांनी तिला जाऊ दिले. तेंव्हाच्या व्हिडिओमध्ये तिने तेथील उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानले आणि  पंजाब पोलीस आणि सीआरपीएफचेही आभार मनात शेवटी तिथून ती निघाली. 

पण आजची हि कृती साधारण नसली तरीही कंगनाने गेल्या वर्षभरात किसान आंदोलनाला आणि आंदोलक शेतकऱ्यांवर केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचा परिणाम आहे असंच म्हणावा लागेल.  

पण कंगना जेंव्हा तिथून सहीसलामत सुटून बाहेर पडली तेंव्हा पुन्हा तिने अशीही पोस्ट शेअर केली कि, जर मी माफी मागितली नसती तर मला तिथून जावू दिलं नसतं म्हणून मी माफी मागितली. 

 

 English summary: Punjab farmer attacked Kangana Ranaut’s car

 

Leave A Reply

Your email address will not be published.