कंगना राणावतच्या ४ पिढ्यांत कोणीही शेती केलेली नाही

काल पासून शेतकरी आंदोलनावर कलाकारांच्यात पुन्हा एकदा ट्विटर वॉर सुरु झालय. पण यात नेहमीपेक्षा एक छोटासा बदल आहे. ते म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणारे कलाकार सध्या परदेशातील आहेत. यात गायक रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा यांच्यासोबतच अमेरिकेतील पर्यावरणवादी कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग यांचा देखील समावेश आहे.

पण वर आधीच म्हटलं की बदल छोटासा आहे म्हणून. कारण समर्थानात बोलणारे कलाकार नवीन असले तरी त्या कलाकारांना उत्तर देण्यात आणि शेतकऱ्यांच्या विरोधात बोलण्यात एक नाव नेहमीच आहे. ते म्हणजे,

कंगना राणावत.  

मग आता तुम्ही म्हणालं, बोलूदे की. तो तिचा अधिकार आहे. जसं शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार संवैधानिक आहे, तसचं कंगनाला पण तीच मत व्यक्त करण्याचा अधिकार घटनेनचं दिलाय की. 

पण या ट्विट मध्ये ती जेव्हा शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणायला लागली तेव्हा लगेच लोकांनी तिला रिट्विट करत प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुझ्या पिढ्यांमध्ये कधी कोणी शेती केली नाही का?

आता जो प्रश्न लोकांना पडतो त्याच उत्तर देण्यासाठी ‘बोल भिडू’. या तत्वाने जरा माहिती बघायला घेतली आणि खरच तिच्या मागच्या ४ पिढ्यात कोणी शेती केली नसल्याचं कळालं. मग काय तिच्या या पिढ्यांची माहिती तुमच्या समोर आणली आहे.   

जरा तिच्या पूर्वजांपासून सुरुवात करूया.

१. सर्जू सिंग राणावत : 

हे सर्जू सिंग म्हणजे कंगनाचे पणजोबा. ते मूळचे हिमाचल प्रदेशमधीलच. ब्रिटिशांकडे हेड क्लार्क म्हणून नोकरीला होते. पण गांधीजींच्या एका हाकेवर त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. कंगना आजही गांधीजींनी त्यांच्या पंजोबाना लिहिलेली पत्र आपल्याकडे असल्याचं सांगते.

गांधीजींमुळे ते त्यावेळचे काँग्रेसचे मोठे नेते बनले होते. १९५१ साली हिमाचल प्रदेशमधील स्वातंत्र्यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत गोपालपूर मतदारसंघातून ६७ मतांनी निवडून आले होते. त्यानंतर पुढच्याच निवडणुकीत ते दुसऱ्यांदा निवडून आले होते.

२. ब्रम्हचंद राणावत : 

ब्रम्हचंद राणावत म्हणजे कंगनाचे आजोबा. ब्रम्हचंद यांचे वडिल सर्जू सिंग पक्के गांधीवादी आणि राजकारणी माणूस. पण वडिलांसारखा मुलाला राजकारणात इंटरेस्ट नव्हता. त्यांनी ६० च्या दशकात स्पर्धा परीक्षेचा मार्ग धरला. UPSC मध्ये पास होत भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. आपल्या सरकारी नोकरीच्या अखेरच्या टप्प्यात उद्योग विभागातुन वरिष्ठ उपसंचालक म्हणून निवृत्त झाले.

३. अमरदीप राणावत :

हे कंगनाचे वडील. अमरदीप यांनी राजकारण, सरकारी नोकरी यापासून लांब जात बांधकाम व्यवसायात नशीब आजमावले होते. ते बांधकामासोबतच त्याला लागणाऱ्या साहित्याचा देखील पुरवठा करत होते. त्यांना अल्पावधीतच हिमाचल प्रदेश सरकारची सार्वजनिक बांधकाम विभागाची कंत्राट मिळू लागली.

त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलंच नाही. काहीच दिवसात ते हिमाचलमधील एक मोठे उद्योजक म्हणून प्रासिद्ध झाले. पैसा, घर या गोष्टी दिमतीला होत्या. त्यांच्या श्रीमंतीचे किस्से असे कि त्यांनी २००३ ते २००४ या एका वर्षात १६ वर्षीय कंगनाच्या सेवेत ५ आलिशान गाड्या उभ्या केल्या होत्या.

४. रांगोली चंडेल : 

ही कंगना राणावतची मोठी बहीण. ती एक सामाजिक कार्यकर्ता आणि मुलींना ऍसिड अटॅक पीडित मुलींच्या आधारासाठी काम करते. सोबतच महिलांविरोधातील अत्याचारावर देखील ती आवाज उठवत असते. रंगोली सोशल मीडियावरील बॉलिवूडमधील कमेंट्स मुळे पण सातत्याने चर्चेत असते.

२०१९ मध्ये तिने फोर्ब्सचे भारतातील संपादक यांच्याकडे १०० सेलिब्रेटींचे डिटेल्स असल्याचं सांगितलं होतं.

५. अक्षत राणावत :

हा कंगनाचा लहान भाऊ. मीडिया पासून लांब असेलला हि याची पहिली ओळख. आणि दुसरा म्हणजॆ तो कंगणाचा व्यवस्थापक म्हणून काम बघतो. सोबतच कंगणाच्या मणिकर्णिका फिल्म प्रोडक्शनचा लिगल ऍडव्हायजर म्हणून काम बघतो.

आणि अखेरीस आता कंगणा बद्दल काय वेगळं सांगणार? तिच्याबद्दल तीच सतत सांगत असते ‘मी गरीब कुटुंबातून येवून संघर्ष केला आहे’. त्यामुळे या बाबतीत तीच ऐकलेचं बरं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.