पाकिस्तानला शिव्या देणारी कंगना आपला सिनेमा तिथून काढत नव्हती…

कॉन्ट्रोव्हर्सि आणि फेम मिळवणे यांचा पॅटर्न बॉलिवूडमध्ये जोरदार चालतो. भारत पाकिस्तान मॅच असो किंवा पाकिस्तानचे कलाकार भारतात काम करणं असो यावर अजूनही वाद सुरूच असतात. एक किस्सा तुम्हाला आठवत असेल की पाकिस्तानमध्ये सनी देओलचे सिनेमे रिलीज केले जात नव्हते आणि खुद्द सनी देओललाच पाकिस्तानमध्ये फिरण्यास बंदी घालण्यात आली होती. पाकिस्तान मध्ये भारताचे सिनेमे चोरून पाहण्याची परंपरा आहे इतकंच नाही तर पाकिस्तानमध्ये इम्रान हाश्मीचे सिनेमे पाहण्यासाठी थेटर फुल्ल व्हायचे.

पण पाकिस्तानचे वाभाडे एकदा बॉलिवुडमध्ये आपला डंका वाजवणाऱ्या कंगना राणावतने काढले होते. कंगना राणावतचा सिनेमा आला होता मणिकर्णिका. सिनेमा बॉक्स ऑफिसवर येण्याअगोदर एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती त्यात कंगना राणावत हजर होती. त्यावेळी कंगणाने चित्रपटाच्या यशाबद्दल, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सद्य स्थितीबद्दल विस्तृतपणे बोललं होतं आणि राजकीय भूमिका न घेतल्याबद्दल अनेक कलाकारांना सुनावलं सुद्धा होतं.

पुलवामा, काश्मीरमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर अनेक बॉलिवुड सेलिब्रिटी आणि निर्मात्यांनी त्यांचे चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामध्ये 40 CRPF जवानांचा मृत्यू झाला. त्यानंतर कंगनाने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला उद्ध्वस्त करण्याची वकिली केली होती.

मणिकर्णिकाच्या बॉक्स ऑफिसवरील यशावेळी, कंगना राणावतने सुचवले होते की भविष्यात भारतीय चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होण्यापासून पूर्णपणे थांबवले जाऊ शकतात. मणिकर्णिका पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होण्याबाबत विचारले असताना, ती म्हणाली होती जेव्हा चित्रपट वितरित केला जातो तेव्हा त्यांच्याकडे डिजिटल कॉपी असते. परंतु तुम्ही भविष्यात रिलीज थांबवू शकता. ते सगळं आपल्या हातात असतं. पण आता ज्या सिनेमाच्या डिजिटल कॉपी तिकडे गेल्या आहेत त्या आणायला भारताची आर्मी पाठवणं म्हणजे जास्तच होईल.

नंतर मात्र कंगणाने पाकिस्तानला चांगलंच फैलावर घेतलं होतं. २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानातील बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मद दहशतवादी तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई हल्ल्यांच्या वेळी कंगणाने पाकिस्तानच्या संदर्भात टीका केली होती. भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेला हा दुसरा सर्जिकल स्ट्राइक होता.

पत्रकार लोकांनी मग तिला विचारलं की हे प्रकरण जर असंच चालू राहीलं तर तू तुझा सिनेमा रिलीज करणार की नाही ? पाकिस्तानच्या भीतीने म्हणा किंवा पाकिस्तानात तुझा सिनेमा लावणार की नाही ? त्यावर कंगणाने सॅवेज रिप्लाय दिला होता की,

असे नाही की पाकिस्तान खूप मोठा प्रदेश आहे. तो जवळजवळ नगण्य आहे. तो इतकाही मोठा देश नाहीए की तिथं मी माझा सिनेमा रिलीज करावा. पाकिस्तानमध्ये भारतीय सिनेमे रिलीज करू नये आणि इत बॉलिवुड सेलिब्रिटी लोकांनी हे ध्यानात घ्यावं की पाकिस्तानात सिनेमे रिलीज करण्यापेक्षा आपल्याला आपल्या देशाचे जवान महत्वाचे….

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.