कन्हैया कुमार आणि कट्ट्यावरचे पांडित्य !

अशोक सराफांना ‘तुम्हाला मामा कधी पासून म्हणतात’, अश्या स्वरुपाचे  प्रश्न विचारले तर विचारणाऱ्याची आकलन क्षमता कळून येते. भलेही तर्कनिष्ठ पणे किमान चार वाक्य आपल्याला बोलता येत नसतील, तरी दुसरा काहीतरी विचार करून संगतोय ते ऐकूण घेण्याची तसदी या उगवत्या पत्रकारांनी घ्यायला पाहिजे. त्यासाठी किमान पाहुण्याबद्दलचा अभ्यास आणि त्याच्या कार्यक्षेत्राची खोलात जाऊन माहिती घेतली पाहिजे नाहीतर आपलादेखील “मामा” होतो.  

बोलावलेला पाहुण्यांपैकी कोणी विचारसरणीने, धर्माने आणि मताने जर महाराष्ट्रातील अस्तित्वात असलेल्या पक्षातील किंवा सत्ता पक्षातील नसेल तर त्याचे अस्तित्व अगदी शून्यापासून मोजायचे आणि या वर्गवारीच्या पलीकडील व्यक्ती असेल अगदी चैतन्यमयी वातावरणात उत्साहाने सगळ पार पडायचं. एखाद्या विशिष्ठ घटनेला वारंवारतेचे अवचीत्य आणून ती घटना प्रेक्षकांवर बिंबवण्याचा प्रकार खासकरून आजच्या डिजिटल माध्यमात होताना दिसत आहे. 

एखाद्या घटनेचे साक्षीदार अथवा त्यामध्ये कथिक सहभागी असलेले काही विद्यार्थी अचानक प्रकाश झोतात आले. ज्या घटनेमुळे असे झाले ती घटना सर्वाना माहिती असले तरी परत  सांगतो, हां तर जवाहर लाल नेहरू विश्वविद्यालयात अफजल गुरूच्या फाशीच्या विरोधात आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपाखाली कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांना कथित देशद्रोही, गद्दार, आणि अजून बरच काही ठरवल गेल. या प्रकरणाची सखोल चौकशी विद्यापीठ प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून करण्यात आली. या चौकशीतून समोर आले की या तिघांचा घोषणाबाजीतील सह्भाग तर दूरच राहिला परंतु अशा प्रकारची देशविरोधी घोषणाबाजी विद्यापीठाच्या आवारात झाली नाही. कोर्टाने या विद्यार्थांवरील देशद्रोहाचे आरोप नाकारले. या प्रकरणात डिजिटल माध्यमांनी ज्या प्रकारे इमानी इतबारे काम करत Doctored Video द्वारे आवाज आणि चेहरे बदललेले फुटेज वारंवार दाखवून, त्यावर चर्चा आयोजित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

हि घटना फेब्रुवारी २०१६ मध्ये घडली परंतु आजही हे तिघे सार्वजनिक मंचावर जातात त्यावेळी वरील घटनेचा तपशीलवार उलघडा करतात. कारण, या प्रकरणावर इतके खुलासे झाले असताना देखील कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजक या तिघांकडून तेच कॅसेट परत प्रेक्षकांना ऐकवतात. 

२५ ऑगस्ट २०१८ ला एका मराठी वृत्त वाहिनीवरील एका कार्यक्रमात पूर्व जे.एन.एस.यु. अध्यक्ष डॉ.कन्हैया कुमार याला आमंत्रित केले होते. नेहमीसारखीच शिफ्टवर आलेले अथवा शिफ्ट संपलेलेल्या पत्रकारांना संपादकांनी थांबायला सांगून या कार्यक्रमात बसायला सांगितले होते. त्यामुळेच कदाचित कन्हैया, डावी विचारसरणी आणि जे.एन.यु. बद्दल ओतप्रोत असणारा तिरस्कार आणि पूर्वग्रह अगदी चेहऱ्यावर झळाळत होता.

कार्यक्रमाच्या सुरवातीला कन्हैयाची ओळख म्हणून वरील प्रसंग सांगण्यात आला आणि त्याला अनुसरून त्याच्याकडून संपादकांनी त्याच्याकडून खुलासा मागितला. त्यानेही परत तेच सांगितले. इथे त्याच्याबद्दल जे प्रेक्षकांना माहिती आहे ते न विचारता तो सध्या विविध प्रश्नांकडे कसे पाहतो हे विचाराने संयुक्तिक होत. ज्या प्रकारे ह्या वाहिनीतील पत्रकार त्याला एका पूर्वग्रह मानसिकतेमधून सामोरे जात होते त्यातून त्यांना ना कान्हैयाशी चर्चा करण्याची इच्छा दिसते ना त्याचे म्हणणे एकूण घ्यायचे आहे अस दिसतंय. 

याच पद्धतीचा आवेश आस्सुसुद्दीन ओवेसी या वाहिनीच्या कार्यक्रमात आले होते त्यावेळी देखील पाहायला मिळाला. तर त्या चर्चेत पुढे, आपल्या बौद्धिक कुवतीनुसार प्रश्न विचारल्यानंतर संपादकांनी त्यांच्या वार्ताहर आणि पत्रकारांना प्रश्न विचारण्यास परवानगी दिली. कन्हैयाने सुरवातीला मराठी काळात असल्याचे सांगितल्यामुळे एका पत्रकाराने दांभिक मराठीत प्रश्न विचारला, ज्याची काहीच आवश्यता नव्हती.

इथून खरी चिकित्सेला जागा मिळते. 

म्हणजे कस तर, प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना जास्त वेळ बोलायला दिला पाहिजे आणि त्यांना अपेक्षित आहे त्याच पठडीमध्ये जर बोलावलेल्या पाहुण्याने उत्तर दिले नाही तर मग त्याचे काहीच खरं नाही. चालू असणाऱ्या चर्चेत तू बरोबर का मी, या पद्धतीने बायणरी पद्धतीने पाहण्याची काहीच गरज नाही. किंवा तस करून स्वतःचा अहं संभाळायची पण आवश्यकता नाही. कारण, किमान प्रश्न विचारताना इतकं भान पाहिजे की आपण पीएचडी, ब्यारीष्टर केलेल्या माणसांना प्रश्न विचारतोय आणि त्यामानाने आपला फक्त सकाळ किंवा संध्याकाळचा पत्रकारितेचा डिप्लोमा झाला आहे किंवा लई ला लई डिग्री. 

त्यामुळे आपणच जगद्गुरू असण्याचा विचार करून चढ्या आवाजात बोललो तर आपण जे बोलतो ते खरं होत नाही. एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती आपण लक्षात घेत नाही, वार्ताहर आणि पत्रकार यात मुलभूत फरक करायला हवा किमान डिजिटल माध्यमात तरी. जे घटनेच्या ठिकाणावरून बातमी/वार्तांकन करतात आणि जे ऑफिसात बसून कीबोर्डवर बोट बडवतात यांत फरक आहे. मराठी वृत्त वाहिन्यांवरील पत्रकारांना अलीकडे साक्षात्कार झालाय तो म्हणजे उगाच सोप्पे शब्द अवघड लहेजा मध्ये बोलतात किंवा माहित असलेल्या सर्व संकल्पना एकाच प्रश्नात विचारून आपले पांडित्य दाखवतात. तसाच प्रकार या कार्यक्रमात पत्रकार वजा वार्ताहारांनी प्रश्न विचारल्या नंतर त्यांचे अगम्य ज्ञान आणि अभ्यासाची बैठक दिसून येते.

कन्हैया ज्या प्रकारे उत्तरे देत होता ते पाहता पत्रकारांना प्रश्नच निर्माण होण्याचे थांबले आणि त्याला तुच्छतापूर्वक पूर्वग्रहाने काहीही विचारून शब्दात अडवण्याचा प्रयत्न केला गेला. हाच प्रकार ओवेसी यांच्या बद्दल तो माणूस किती तरी वेळा बोलतोय मला अक्बारुद्दिन बद्दल प्रश्न विचारू नका ते प्रकरण कोर्टात आहे. पण नाही ह्यांच सुरूच. 

या आक्रमक पद्धतीचा अवलंब हे पत्रकार ठाकरे बंधूना प्रश्न विचारताना करणार नाहीत. त्यावेळी एकदम ते बोलतील ते खरे योग्य या प्रकारे ऐकून घेतील. इथे सांगायचं प्रयत्न हा आहे की पत्रकारांनी दुजाभाव न करता आपलं काम केलं पाहिजे तसे प्रश्न विचारले पाहिजेत. ज्या प्रकारे एखाद्या विशिष्ट विचारसरणीतील आणि समजतील लोकांना या माध्यमांना स्वतःची राष्ट्रभक्तीपटवून द्यावी लागते नाहीतर पत्रकार येथेच अडून बसतात सांगा म्हणून. तिथे माध्यमांच्या भूमिकेवर/स्वतंत्रेवर शंका घेता येते. सध्या तरी नवीन पायंडा पाडला जाता आहे, एखाद्याला आपल्या कार्यक्रमात आमंत्रण द्यायचे आणि स्वतः चाबूक घेऊन जाब विचारात प्रश्न करायचे. त्यावर उत्तर देऊ लागला की त्याला परत प्रश्न, आणखी प्रश्न, त्याला बोलूच द्यायचे नाही. 

भारतात व्यक्तीस्वातंत्र्य असल्याने प्रत्येकाने आपली विचारसरणी जोपासण्यात काहीच समस्या नाही, पण पत्रकार म्हणून लोकांच्या समोर बोलताना भान ठेवायला हवे की आपण काही प्रचारक, कार्यकर्ते किंवा कुठल्याही पक्षाचे प्रवक्ता नाही. त्यामुळे चिकित्सकपणे आपण आपले काम केले पाहिजे. तेच रूप वाहिन्यांच्या रात्रीच्या चर्चेतील कार्यक्रमाचे आहे. टी आर पी च्या नादाने किंवा तुम्हाला रेटायच्या अजेंडया साठी आपण काय करत आहोत याची समज हवी. नाहीतर आत्ताच्या पॅकेज्ड पेड न्यूज च्या काळात जी मुल्ये पत्रकरितेतून  पेरली जात आहेत ती पुढे अत्यंत धोकादायक ठरतील.

जाता जाता कन्हैयाला या कार्यक्रमात पत्रकाराकडून कोणते प्रश्न विचारणे अपेक्षित होत याबद्दल बोनस. 

त्याचा पीएचडी चा विषय. 

सध्याच्या काळात ज्या प्रकारे संस्थावर सरकार निर्बंध आणि देखरेख करते त्या संदर्भाने.

समकालीन शिक्षण व्यवस्था, तरुण आणि बेरोजगारी.

आंबेडकरी आणि डाव्या विचारसरणीवर.

डाव्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जात प्रश्नावरील आकलन. 

विद्यार्थी चळवळीची आवश्यकता. यावर  कन्हैया चा जाहीरनामा किंवा तरुण नेतृत्त्व उभे करण्यासाठी असणाऱ्या योजना.

  • राजरत्न कोसंबी.
1 Comment
  1. Ajinkya Pujari says

    Insightful and apt !

Leave A Reply

Your email address will not be published.