सलग ४ षटकार ठोकून कपिलनं इंग्लडच्या तोंडचं पाणी पळवलं होतं

आपल्याला भारतात प्रत्येक घरात क्रिकेटचे डाय हार्ट फॅन पाहायला मिळतील. जरी हा आपला राष्ट्रीय खेळ नसला तरी क्रिकेटसारखी लोकप्रियता इतर कोणत्याच खेळाला नाही. भारतात क्रिकेटचं हेचं फॅड लोकांचा मनात फिट करण्यात भारताचा ऑलराऊंडर कपिल देव याचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं.

कपिलच्या  नेतृत्वाखाली भारताने जिंकलेला १९८३ चा वर्ल्ड कप आजही न विसरण्यासारखा आहे. त्याच्या नावे असलेली रेकॉर्डची लिस्ट सुद्धा भली मोठी आहे. जे क्वचितच कोणी ब्रेक केले असतील. याच यादीतला एक रेकॉर्ड ज्यामुळे इंग्लडला आपल्याच मैदानावर मान खाली घालून उभं राहावं लागलं होत. 

ती मॅच होती ३० जुलै १९९० ची. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर  भारती विरुद्ध इंग्लंड अशी टेस्ट मॅच सुरू होती. कपिल देव या कॅप्टन्सीत हा सगळा सामना खेळला जाणार होता.  त्या सामन्यात, ग्राहम गूचच्या ३३३ धावांच्या दमदार खेळीसोबत इंग्लंडने पहिल्या डावात ४ विकेटवर ६५३ धावांचं मोठं डोंगर उभं केलं होत. तर भारताकडून सुद्धा मोहम्मद अझरुद्दीनने १२१ तर रवी शास्त्रीनं १०० अशी शतकं ठोकली होती. पण बाकीचे बॅट्समन पाहिजे तशी कामगिरी करू शकले नव्हते. 

भारताचा स्कोअर ९ विकेटवर ४३० वर होता आणि फॉलोऑन वाचवण्यासाठी २४ धावांची गरज होती. त्यावेळी कपिल देव आणि स्पिनर बॉलर नरेंद्र हिरवानी मैदानावर होते. आता हिरवानी हा एक उत्कृष्ट बॉलर होता, पण या धावा त्याच्याकडून होतील असं वाटतं नव्हतं. त्यामुळे सगळ्यांच्या आशा कपिल देववर होत्या.  पण  एकाच्या भरवश्यावर एवढ्या धावा करणं अवघड होतं. त्यात सामोरं एडी हेमिंग्ज सारखा बॉलर होता. 

पण कपिल देवनं हे अवघड काम करून दाखवलं आणि त्याने एडी हेमिंग्जच्या एकाच ओव्हरमध्ये सलग चार बोलमध्ये चार सिक्स ठोकले.

कपिल देवाच्या या जबरदस्त खेळीमुळे त्याने भारताला फॉलोऑनपासून वाचवलं. कपिलने हॅमिंग्जचे पहिले दोन बॉल सेफली  खेळल्यानंतर पुढच्या चार बॉलमध्ये सलग सिक्स ठोकले. भारतीयचं नाही तर त्याने लॉर्ड्समध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आपल्या सुपरहिट फलंदाजीचं कौतुक करायला भाग पडलं.

फॉलोऑन वाचवण्यासाठी कपिलची ही कामगिरी भारतासाठी महत्वाची सुद्धा होती कारण फ्रेझरने पुढच्याच बॉलवर  नरेंद्र हिरवानीला आउट केलं आणि ४५४ च्या धावसंख्येवर भारतीय डाव संपवला.

पण कपिल देव मात्र ७५ चेंडूत ८ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७७ धावा करून नाबाद राहिला. या सामन्यात भारताचा इंग्लंडकडून २४७ धावांनी पराभव झाला खरा. आणि मालिका देखील भारताच्या हातातून निसटली.  पण  फॉलोऑन वाचवण्यासाठी कपिल देवने खेळलेली ही खेळी सर्वांच्याच कायम लक्षात राहिली!

महत्वाचं, म्हणजे कपिल देवचा हा जबरदस्त रेकॉर्ड बरीच वर्ष कोणताच खेळाडू ब्रेक करू शकला नव्हता. 

हे ही वाचं  भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.