कारगिल जवानाची ‘सरफरोश’ बद्दलची आठवण वाचून आमीर खानच्याही डोळ्यात अश्रू तराळलं.

१९९९ सालच्या उन्हाळ्यात सरफरोश रिलीज झाला होता. त्यात आमीर खानने दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढणाऱ्या पोलीसअधिकाऱ्याचा रोल केला होता. मै अपने मुल्क को ही आपना घर समझता हुं असं म्हणणारा आयपीएस राठोडने सिनेमा पाहणाऱ्या प्रत्येकाला देशभक्तीच्या भावनेने भारावून टाकले होते.

असाच एक तरुण भारावलेला तरुण सरफरोश पाहायला गेला. नाव देवेंदरपाल सिंग. तो भारतीय सैन्यदलाच्या डोग्रा रेजिमेंटमध्ये ऑफिसर होता. थिएटर मधून सिनेमा पाहून घरी आला तोवर बातमी समजली, देशाच्या सिमेवर काही तरी गडबड सुरु आहे. ताबोडतोब ड्युटीवर रुजू व्हायचं आहे. तिथ जाईपर्यंत कळाल होतं अतिरेकी बोर्डरपार घुसले आहेत आणि युद्धासं तोंड फुटले आहे.

डी.पी.सिंगची पोस्टिंग काश्मीर खोऱ्यात अखनूर भागात झाली होती. जवळपास दीड महिना भारतीय आर्मीचे जवान आपल्या प्राणांची किमंत मोजून पाक घुसखोरांना हुसकावून लावत होते. 

१५ जुलै १९९९ रोजी अशीच जोरदार लढाई सुरु होती, अखनूर सेक्टर मध्ये दोन्ही साईडवरून आभाळातून पाउस पडावा असा गोळीबार सुरु होता. डी.पी.सिंगची कमांडो टीम तेव्हा पाकिस्तानी पोस्टपासून अगदी १०० मिटरअंतरावर होती. अचानक दूरवरून एक तोफगोळा भारतीय हद्दीत येऊन पडला. डीपीसिंग जिथे पोजिशन घेऊन उभा होता अगदी तिथेच तो बॉम्ब पडला होता.

सगळ्यांना वाटलं संपल!! त्याचे साथीदार धावत त्याच्या जवळ गेले. डीपीसिंगच्या शरीराची चाळणी झाली होती. पण त्याचा श्वास चालू होता. लगेच त्याला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. आर्मी हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर त्याची स्थिती पाहिल्या पाहिल्या डॉक्टरांनी आधीच सांगितले याच्या जगण्याची शक्यता अगदी कमी आहे.

पण डीपी सिंग मध्ये कसली चिकाटी होती काय माहित पण त्याने आश्चर्यकारकरित्या जीवनमरणाची लढाई जिंकली. मात्र यात त्याला एक पाय गमवावा लागला. त्या जागी कृत्रिम पाय बसवण्यात आला. तो हॉस्पिटल मध्ये होता तेव्हाच बातमी आली होती भारतीय आर्मीने विजय मिळवला आहे, कारगिल युद्धसमाप्त झाले आहे.

२००२ साली बरा झाल्यावर आपला कृत्रिम पाय घेऊन तो परत सैन्यात जॉईन झाला. त्याची बदली आर्मी ऑर्डीनन्स कोर्प मध्ये करण्यात आली. पण काही वर्षांनी मेजर या पदावरून त्याने निवृत्ती घेतली. हा काळ त्याच्यासाठी त्रासदायक ठरला. युद्धात जायबंदी झालेला अधिकारी म्हणून कायम लोक त्याला सहनुभूतीने पहायचे. मदत करायचे. डीपी सिंग ला याचा कंटाळा आला होता.

आपल्यातला लढणारा जवान अजूनही संपलेला नाही हे त्याला दाखवून द्यायचं होतं.

त्याला कुठून तरी कळाले की अपंग खेळाडूंच्याही स्पर्धा होतात. मेजर डी पी सिंगनी त्यात सहभागी व्हायचं ठरवलं. त्याला चालता तरी येईल की नाही अशी डॉक्टरांना शंका वाटत होती पण सरावाने त्याने या शंका दूर केल्या.

page 54

मग २००९ सालच्या दिल्ली मरथोन मध्ये पहिल्यांदाच कृत्रिम पाय असलेला हा जवान धावताना दिसला. तो आज फक्त धावतच नाही तर स्काय डायव्हिंग सारख्या धाडसी खेळातही भाग घेतो.

एका अर्थे मेजर मेजर डीपी सिंग आता नवे पंख लावून आभाळात उडत आहेत. आता त्यांना भारताचा पहिला ब्लेड रनर अशी उपाधी मिळाली आहे. देशविदेशातल्या अनेक स्पर्धा त्यानी गाजवल्या. लिम्का बुक रेकॉर्डमध्येही त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते. त्यांच्या या जिद्दीने आयुष्याची लढाई हरलेल्या अनेकांनी जगण्याची प्रेरणा मिळवून दिली.

आज ते आर्मी जवानांच्या निवृत्ती नंतरच्या वन रँक वन पेन्शन अशा योजनासाठी काम करत आहेत. काही दिवसापूर्वी पुलवामा अटक नंतर युद्धखोरीची भाषा सहज वापरणाऱ्या मिडियाची खरडपट्टी काढणारे त्यांचे पत्र बरेच गाजले होते. अपंग होऊन त्याबद्दल रडत बसण्यापेक्षा समाजा काम करत राहणे त्यांननी निवडले आहे.

परवा फिल्मस्टार आमीर खानच्या ट्विटर प्रोफाईलवर सरफरोश सिनेमाला २० वर्ष पूर्ण झाल्या बद्दल अनेकांनी ट्विट केलं होतं. त्यात डीपीसिंगनी ही आपली आठवण आमीरला पाठवली होती. 

 20 वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा आमिर खानचा सरफरोश सिनेमा पाहिला आणि 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा आज तोच सिनेमा पाहिला. पण त्यावेळी हा सिनेमा मी थिएटरमध्ये पाहिला होता आणि आता टीव्हीवर. त्यावेळी माझे दोन्ही पाय होते आणि आता एकच आहे. ऑपरेशन विजय जॉइन करण्याआधी (मे 1999)हा माझा शेवटचा सिनेमा होता.”

हे ट्विट वाचून आमीर प्रचंड भावूक झाला आणि त्यानेदेखील लगेचच मेजर डी.पी.सिंह यांना रिट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

“प्रिय मेजर डी.पी.सिंह, तुमची ही पोस्ट पाहून माझ्या अंगावर शहारे आले, मी प्रचंड भारावून गेलोय. तुमचं शौर्य, हिंमत आणि प्रतिकुल परिस्थितीमध्ये मोठ्या धीराने सामोरे जाण्याच्या वृत्तीला मी मनापासून सलाम करतो”

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.