कॅटरिनाचं विकी बरोबर लग्न झालं तरी ती लगेच भारताची नागरिक बनू शकणार नाही

सद्या बॉलीवूड मध्ये एकच चर्चा चालूये ती म्हणजे विकी कौशल आणि कॅटरीना कैफ च लग्न. या दोघांचंही लग्न येत्या ७-९ डिसेंबर दरम्यान राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे पार पडणार आहे. 

पण राजस्थानमध्ये लग्न करण्याच्या आधी ते मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. मात्र कॅटरीनाला लग्नानंतरही भारतीय नागरिक म्हटले जाणार नाही. यासाठी कॅटरीनाला अधिकृतपणे भारतीय नागरिक होण्यासाठी ७ वर्षे लागतील. 

कॅटरीनाला खरे नाव कॅटरीना टरक्वॉट आहे. कॅटरीनाकडे सध्या परदेशी पासपोर्ट आणि परदेशी नागरिकत्व आहे. 

भारतीय कायद्यानुसार कॅटरीनाला लग्नानंतर भारतीय नागरिक म्हटले जाणार नाही. त्यासाठी तिला भल्या मोठ्या कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागणार आहे.

ब्रिटिश वंशाच्या नागरिकाचा भारतीय वंशाच्या नागरिकाशी विवाह करण्याचे देखील नियम आहेत. याबाबत कायदेतज्ञांचं म्हणन आहे कि, 

थोडक्यात भारतात असे विवाह विशेष विवाह कायदा १९५५ मधील तरतुदींनुसार केले जातात. हा कायदा फक्त विविध धर्म, जाती आणि पंथाच्या लोकांना लागू आहे, त्यामुळे या कायद्यानुसार, भारतीय नागरिकत्वासोबतच, दुसऱ्या देशाचे नागरिकत्व असलेल्या व्यक्तीशी विवाह करण्याचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.

लग्न करणाऱ्या जोडप्यामधला एक जोडीदार कायमस्वरूपी भारतात नागरिक असेल  दुसरा जोडीदार तात्पुरता भारतात राहणारा असेल, तर या विशेष विवाह कायद्यानुसार जोडप्यांना ३० दिवसांची नोटीस देणे बंधनकारक आहे. याच कायद्यांतर्गत परदेशी नागरिक आणि भारतीय नागरिक यांच्या विवाहाचीही नोंदणी करता येत असते.

परदेशी नागरिकाने विवाह नोंदणी अर्ज केल्याच्या नंतर १२ महिने सलग भारतात वास्तव्य केले पाहिजे आणि अर्ज करायच्या आधीची सलग ६ वर्ष भारतात राहिलेली पाहिजे.

अनिवासी भारतीय आणि परदेशी नागरिक असोत, भारतात लग्न करू इच्छिणारे कोणतेही जोडपे असोत या कायद्यानुसार, त्यांना ३० दिवसांची नोटीस देणे गरजेचे असते. याच कायद्यानुसार त्यांचा विवाह नोंदणी अर्ज रजिस्टर होतो. 

भारतीय, अनिवासी भारतीय आणि परदेशी असोत आणि भारतात लग्न करू इच्छिणारे कोणतेही जोडपे धार्मिक समारंभ किंवा नागरी विवाह सोहळा पूर्ण करणे बंधनकारक असेल. व्हिसा आणि इमिग्रेशनसाठी विवाह रजिस्ट्रारने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र देखील आवश्यक असेल.

कुणीही कपल असो, त्यांना भारतात लग्न सोहळा किंव्हा धार्मिक विधी करायचा असो त्यांना अगोदर रजिस्टर/कोर्ट मॅरेज करणे गरजेचे असते त्याचमुळे विकी आणि कॅटरीना आधी मुंबईत कोर्ट मॅरेज करतायेत.

आता मुख्य प्रश्न जो कॅटरीनाच्या नागरिकत्वाबाबतचा !  

जर एखाद्या परदेशी नागरिकाने भारतीय वंशाच्या व्यक्तीशी लग्न केले तर तो भारतीय नागरिक होऊ शकतो का, त्याला कोणत्या कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल?

भारतीय कायद्यानुसार, भारतात लग्न करणे हा नागरिकत्वाचा आधार नाही. भारतीय नागरिकत्व कायदा १९५५ अंतर्गत नोंदणी करून नागरिकत्व मिळू शकते. ज्यासाठी भारतीय नागरिकाशी लग्न करणे आणि नंतर ७ वर्षे भारतात राहणे अनिवार्य आहे. नागरिकत्व नियम १९५५ च्या कलम ५ (1)(c) अंतर्गत, फॉर्म ३ मध्ये भारतीय नागरिकाशी विवाह केलेली व्यक्ती नागरिकत्वासाठी अर्ज करू शकते. याउलट, फक्त यूकेमध्ये लग्न केल्याने तुम्हाला तिथले नागरिकत्व मिळू शकते.

याचा अर्थ कॅटरीना कैफ भारतातील फिल्म इंडस्ट्रीमध्ये जवळपास १७ वर्षांपासून काम करत आहे, परंतु विकी कौशलसोबत लग्न केल्यानंतर तिला भारताची नागरिक होण्यासाठी आणखी ७ वर्षे वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतरच कायदेशीर प्रक्रियेनंतर परदेशी कॅटरीनाला भारतीय वंशाची नागरिक म्हटले जाईल.

पण एक ऑप्शन आहे…. 

हा देखील एक पर्याय आहे, तो म्हणजे  भारताबाहेरून आलेली एखादी व्यक्ती भारताचे नागरिकत्व मिळवू शकते, जर तो/ती गेल्या १४ वर्षांपैकी ११ वर्षे भारतात राहिली असेल आणि अर्ज करण्यापूर्वी एक वर्ष सलग भारतात वास्तव्य करून, अर्ज करून लग्न न करताही भारतीय नागरिक होऊ शकते.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.