भारतातल्या हिजाबवादाची तुलना अफगाणिस्तानशी करण्याआधी इतर देशांमधील स्थिती बघा

सद्या गरम असलेला चर्चेतला आणि वादातला मुद्दा म्हणजे कर्नाटकात हिजाबचा वाद. संपूर्ण प्रकरण आता सांगायची आवश्यकता नाही ते सर्वानाच माहिती झालेलं आहे.

तरीही थोडक्यात सांगितलेलं बरं म्हणून झालं असं कि, उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हिजाब हा गणवेशाचा भाग नाही आणि त्यामुळे मुलींना हिजाब घालून वर्गात बसू देता येणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर याच मुद्द्यावरून ६ मुली डिसेंबर २०२१ पासून आंदोलन करतायेत त्याचं म्हणणं आहे कि, हिजाब घालणे हे आमच्या धर्म स्वातंत्र्याच्या कक्षेत येते. त्यामुळे आम्हाला हिजाब घालून वर्गात बसण्याची परवानगी मिळावी.

आता मुद्दा असाय कि, दोघेही आपापल्या जागी योग्य वाटतात. मग याच वरून नको तितक्या पद्धतीने ताणलं गेलं आणि याला अर्थातच हिंदू-मुस्लिम संघर्षाचं वळण मिळालं…शेवटी हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात गेलं. या संपूर्ण घटनेत मात्र मुलींच्या शिक्षणाचे नुकसान होत आहे हे कुणालाच कळेना. त्यात…..आणि नेहेमीप्रमाणे ट्रोलर गॅंग आणि ते भडकवलेले डोके म्हणजेच कथित धर्म रक्षक वाट्टेल त्या थराला जाऊन त्या मुलींना टार्गेट करत आहेत.  पाकिस्तानात जा, अफगाणिस्तानात जा, असा सूरही आता समोर येऊ लागला आहे.

हिजाबचा वाद सध्या देशभर चर्चेचा विषय बनला आहे. अनेक राजकीय नेते आणि सेलेब्रेटींनी या प्रकरणावर आपली मते मांडली आहेत. थोडक्यात याच प्रकरणावरून पाकिस्तान, अफगाणिस्तान या शेजारी देशांसोबत भारताची तुलना केली जातेय.

म्हैसूरमध्ये भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नील यांनी तर असं वक्तव्य केलं आहे कि, “आज ते हिजाबची मागणी करत आहेत, उद्या ते शाळेत मशिदीची मागणी करतील. रोज काहींना काही नव्या मागण्या करतील. असल्यांना पाठिंबा देणे हे राष्ट्रविरोधी आहे. हा भारत आहे, आपण भारतीय संस्कृतीचे पालन केले पाहिजे. आम्ही तुम्हाला पाकिस्तान दिला आहे… तुम्हाला तुमचे इस्लामी हक्क हवे असतील तर पाकिस्तानात जा. तुम्हाला इथे राहायचे असेल तर तुम्हाला संविधान, भारतीय संस्कृतीचे पालन करावे लागेल.

त्यांच्यानंतर आता त्यात भर पडली तो कंगना राणौतच्या इंस्टाग्रामवरच्या स्टोरीची…

या स्टोरी मध्ये कंगणा म्हणतेय ,“तुम्हाला ताकद  दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात दाखवा. अफगाणिस्तानात राहून बुरखा घालू नका, फ्री राहायला शिका, स्वतःला कैद करू नका.”

त्यावर शबाना आझमी यांनी कंगनाच्या या स्टोरीचा स्क्रिनशॉट शेअर करत असं लिहिलं आहे, “मी चुकीचे असल्यास मला करेक्ट करा पण अफगाणिस्तान हे एक धर्मशासित राज्य आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार भारत हा देश धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश आहे”. 

आता कंगना आणि हे आमदार साहेब दोघेही विसरत आहेत की भारतात लोकशाही आहे, हा देश संविधानात नमूद केलेल्या नियमांचे पालन करतो. येथे राहणार्‍या प्रत्येक धर्माच्या लोकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मिळावा असं राज्यघटनेत नमूद आहे. प्रत्येक नागरिकाला कायद्याच्या कक्षेत राहून आपल्या धर्माचे पालन करण्यास आणि प्रचार-प्रसार करण्यास तसेच स्वतःच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. 

थोडक्यात अनेकांचं असं म्हणणं आहे कि या वादाचा आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान सोबत तुलना करण्याचा ट्रेंड थांबवा….

भारताची तुलना अफगाणिस्तानशी करण्यापेक्षा….अफगाणिस्तानची, पाकिस्तानची तालिबानसोबत तुलना करा असं देखील सुनावलं जातंय. 

कारण अफगाणिस्तानात सद्या तालिबानी राजवट आहे. तालिबान ही दहशतवादी संघटना आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये, जेव्हा भारत देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करत होता, तेव्हा तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिलांना कोंडून ठेवले होते. त्यांचं शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या आणि स्वातंत्र्य हिरावून घेतलं होतं. आणि जरी कुणी आवाज उठवला तर त्यांना ठार मारलं जात होतं. एका वाक्यात सांगायचं तर अफगाणिस्तानच्या स्त्रियांना आता स्वतःचा जीव वाचवण्यापेक्षा दुसरं कोणतंच उद्दिष्ट नाहीये. आता यात इतर देशांचा संबंध नाही आणि त्यातल्या त्यात भारताचा आणि भारताच्या महिलांचा तर अ ज्जीबातच संबंध नाही. त्यामुळे तिथे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांना येथील परिस्थिशी तुलना करू नये असं म्हणलं जातंय. 

मग तुलना फक्त याच देशाशी का ? इतर देशांशी तुलना का होऊ नये ?

जगात पाकिस्तान, अफगाणिस्तान सोडून इतरहि देश आहेत ज्याच्याशी आपण तुलना करू शकतो. अशा देशांसोबत तुलना करा जे स्त्री-पुरुषांच्या समानतेसाठी ओळखले जातात जे भारतापेक्षा कित्येक काळ पुढे आहेत.

याच एक उदाहरण अगदी तोंडात मारल्यासारखं आहे ते म्हणजे, न्युझीलँडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न या अविवाहित आहेत. ज्या कि एका मुलाची आई आहेत. त्यांना तिथे कोणत्याही ट्रोलिंगला तोंड द्यावं लागत नाही. 

आता भारतालं उदाहरण बघूया? कोणतं ? अगदी अलीकडचं. जेंव्हा नुसरत जहाँने लग्नाबाहेर जाऊन होऊन मुलाला जन्म दिला होता तर अलीकडेच उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या महिला उमेदवार ज्यांचेमधले बिकिनी फोटो आणि डान्स व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. त्यांना ट्रोल करण्यात आले होते. 

आता हे ट्रोलिंग जाऊच द्या…रवांडा, क्युबा, यूएई, कोस्टा रिका, फिनलंड, स्वीडन, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको या देशांच्या संसदेत महिला सदस्यांचं प्रमाण ४५ टक्क्यांच्या वर आहे. आणि भारतातलं संसदेतल प्रमाण बघायचं तर फक्त ११ टक्के इतकं आहे. हे हि जाऊ द्या हो… ३३ टक्के आरक्षणाची मागणी करणारे विधेयक गेल्या २५ वर्षांपासून धूळखात पडलंय. कित्येक चुका काढल्या गेल्या कित्येक दुरुस्त्या झाल्या पण अजूनही हे विधायक मंजूर झालेच नाही. 

आता अत्याचाराचं बोलूयात….जगातल्या एकूण देशांपैकी १५० देश असे आहेत जिथे मॅरिटल रेप गुन्हा आहे पण भारतात ? अजूनही यावर चर्चा आणि वादच चालू आहे. जरी मॅरिटल रेप गुन्हा म्हणून मांजर झालाच तर येथील विवाह संस्था धोक्यात येईल.

सोबतच सामाजिक मुल्यांचं बघुयात, LGBTQ चं. एका अहवालात असं समोर आलं आहे कि, जगातल्या एकूण देशांपैकी २९ देशांमध्ये समलिंगी विवाह कायद्याने मान्य आहे.  आणि भारतात ? कांद्याने मान्यता आहेच. ३७७ कलम हटवले गेले समलैंगिक जोडपे एकत्र राहू शकतात, पण सामाजिक मान्यतेचं काय ?

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.