या दिग्गज नेत्यामुळे आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तिरंगा फडकवण्याचा अधिकार मिळाला !

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ही तारीख जवळ आली की शाळेत, सरकारी कार्यालय, पोलीस हेड कॉर्टर, राजभवन, आणि लाल किल्ला अश्या अनेक ठिकाणी स्वातंत्र्य आणि गणतंत्र दिवसाचं ध्वजारोहण केलं जातं.

पण देश आणि राज्य पातळीवर सगळ्यात आधी मान कुणाला असतो, असं विचारलं तर ? आपलं उत्तर असेल की, देशाच्या ध्वजारोहणाचा मान पंतप्रधान यांना असतो तर राज्याचा मुख्यमंत्री महोदयांना. इतर अनेक ठिकाणी तिथल्या पदानुसार ध्वजारोहणाचा मान दिला जातो.

पण हा मान असलेला नियम देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासूनचा आहे का ? तर, नाही. कारण सुरवातीचे नियम फार वेगळे होते.

देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तिरंगा झेंडा फडकावण्याचा मान, कोणत्या मुख्यमंत्र्याला मिळाला ? असा जर प्रश्न कुणी आपल्याला विचारला तर आपल्याला हा प्रश्न खूप साधारण वाटेल. पण यामागे असाधारण असं कारण लपलेलं आहे. ते राजकारणाशी संबंधित आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर जेव्हा १५ ऑगस्ट ( स्वातंत्र्यदिन ) यायचा तेव्हा दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान झेंडा फडकवायचे तर राज्यात राज्यपाल झेंडा फडकावून मानवंदना दयायचे. पण गणतंत्र दिवशी तर यात थोडं उलटं व्हायचं. दिल्लीत राष्ट्रपती झेंडा फडकवायचे तर राज्यात पुन्हा राज्यपालचं झेंडा फडकवायचे.

म्हणजे दिल्ली बदलत होती. पण राज्य मात्र राज्यपालाच्याचं हातात होतं.

इथं मुख्यमंत्र्याला झेंडा फडकवायचा अधिकार नव्हता. १९४७ पासून ते १९७४ पर्यंत सगळं असचं चाललं होतं.

पण राज्याचा पहिला नागरिक म्हणून आपल्यालाही झेंडा फडकावण्याचा अधिकार मिळावा, ही एक मुख्यमंत्री म्हणून पदावर विराजमान असलेल्या प्रत्येकाच्याचं मनी इच्छा असणार. तरीही यावर आवाज मात्र कोणत्याच राज्याचा मुख्यमंत्री उठवत नव्हता.

कारण बहुतांशी राज्यात कॉंग्रेसचचं सरकार होतं. त्यामुळे हाय कमांड ला बोलायाचं धाडस कुणीही करत नव्हतं. स्वातंत्र्यानंतर बघता बघता १५ ते १६ सोळा वर्षं अशीच उलटली.

१९७४ साली फेब्रुवारी महिन्यात एका नेत्याने मात्र शेवटी या विरोधात आवाज उठवलाचं. नियमांमध्ये बदल करण्याची मागणी केली. तो नेता दक्षिण भारताच्या राजकारणातील दिग्गज होता.

त्यावेळी देशात इंदिरा गांधीचं सरकार होतं. तो नेता या विषयी बोलण्यासाठी इंदिरा गांधीना दिल्लीत जाऊन भेटला. त्यानं इंदिरा गांधीना सांगितलं की आपला देश स्वातंत्र्य होऊन पंधरा सोळा वर्षं उलटली आहेत. देशात अनेक बदल घडले आहेत.

आपण देश सांभाळत आहात; पण अजून काही गोष्टींच्या बाबतीत देश खरचं स्वातंत्र्य आहे का ?

त्यावर इंदिरा गांधीने विचारलं की नेमकं कोणत्या ?

तेव्हा त्या नेत्याने सांगितलं की मुख्यमंत्र्यांना त्यांचा मान, अधिकार का मिळत नाही. स्वातंत्र्य दिन आला की दिल्लीत पंतप्रधान लाल किल्ल्यावर झेंडा फडकावतात. पण राज्यात राज्यपाल. पुन्हा गणतंत्र दिवशी सुद्धा राज्यपालचं झेंडा फडकावतात. पण आता इथून पुढे तरी मुख्यमंत्र्यांना झेंडा फडकावण्याचा अधिकार मिळावा, अशी विनंती त्या नेत्याने केली.

दिल्लीत जाऊन इंदिरा गांधीना अधिकार देण्याची विनंती करणाऱ्या नेत्याचं नाव होतं, एम करुणानिधी. जे त्याकाळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते.

शेवटी एका मुख्यमंत्र्यानेचं त्यांची मागणी देशाच्या पंतप्रधानांच्या समोर मांडली.

ही १९७४ च्या काळातली गोष्ट आहे, ज्या वेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी राजामन्नार कमिटीची ची शिफारस करण्यात आली होती. त्याप्रमाणे करुणानिधी यांनी या शिफारशीमार्फत राज्यांना जास्त अधिकार देण्याची मागणी केली होती. त्यामध्येच मुख्यमंत्र्याला ध्वजारोहण करण्याचा अधिकार ही त्यातच होता.

करुणानिधींच्या या मागणीला इंदिरा गांधीनी दोन महिन्यातचं मान्यता दिली. आणि त्याचं वर्षी जुलै मध्ये केंद्र सरकारने त्यासंबंधी एक जीआर काढला. आदेश लागू करण्यात आला.

त्यानंतर लगेच १५ ऑगस्ट १९७४ ला तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या सेंट जॉर्ज किल्ल्यावर राज्यपालांनी नाहीतर मुख्यमंत्री एम करुणानिधी यांनी झेंडा फडकावला.

त्या वर्षी फक्त तामिळनाडूच्याचं मुख्यमंत्र्याने नाहीतर साऱ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्याने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी झेंडा फडकावला. तेव्हा लागू झालेला आदेश आता कायमचाच बनलेला दिसत आहे. याचं सगळं श्रेय जातं एम करुणानिधी या नेत्याला.

एम करुणानिधी निधी या नेत्याचा जन्म ३ जुन १९२४ मध्ये तामिळनाडूच्या थिरुकुवल्ली गावात झाला होता. ६० वर्षांपेक्षा पेक्षा जास्त काळ त्यांनी राजकारणात घातलेला आहे. एवढचं नव्हे तर त्यांना १३ वेळा आमदार होण्याचा मोठा राजकीय अनुभवही होता. जो फार कमी जणांना असतो. सध्या तर १३ वेळा आमदार होणं हे अवघड गणित होऊन बसलेलं आहे.

त्याशिवाय राजकारणात येण्याआधी ते प्रसिद्ध तमिळ चित्रपट लेखक सुद्धा होते. पाच वेळा तामिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेल्या करुणानिधी यांनी ७ ऑगस्ट २०१८ च्या दिवशी शेवटचा श्वास घेतला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.