नेत्यासाठी गुन्हे अंगावर घेताय पण लक्षात ठेवा तुमच्यासाठी कोणी येणार नाही…

राज्यात गेले दोन दिवस चर्चा आहे ती शिवसेना आणि भाजप कार्यकत्यांमध्ये झालेल्या राड्याची. त्यानंतर राज्यभरात सेना व भाजपच्या हजारों कार्यकर्त्यांवर ठिकठिकाणी १३० गुन्हे दाखल झाले आहेत.

 मात्र यानंतर अनेक कार्यकत्यांनी सोशल मीडियावर आपल्यावर अशा आंदोलन, राडा नंतर दाखल झालेल्या गुन्हामुळे कशा समस्या निर्माण झाले याचे अनुभव अनुभव कथन केले आहे. त्यामुळे रागाच्या, भावनेच्या भरात कार्यकत्यांनी सरकारकारी मालमत्तेची तोडफोड करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यावर कुठले गुन्हे दाखल होतात त्याचे काय परिणाम होतात हे लक्षात घ्यावे. 

जन आशीर्वाद यात्रे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी पक्ष कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. यासाठी सर्वात पुढे होते ते दोन्ही पक्षाचे ‘कार्यकर्ते’.

गुन्हे दाखल झाल्यानंतर आपल्या नोकरी, पासपोर्ट वर काय परिणाम होतो. याबद्दल बोल भिडूने घेतला हा आढावा. 

कुठले गुन्हे दाखल होऊ शकतात

आंदोलनात, राड्यात सहभागी होणाऱ्यावर फौजदारी संहिता नुसार गुन्हे दाखल करण्यात येतात. त्यात बेकायदेशीर पद्धतीने एखाद्याचा मालमत्तेत प्रवेश करणे, नुकसान करणे, जाळपोळ करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे, गैरकृत्य करणे अशे गुन्हे दाखल होतात.

१४३ –  बेकायदेशीर जमावाचा घटक असणे. हा दखलपात्र गुन्हा असून यात ६ महिन्याचा कारावास, दंड किंवा दोन्ही होऊ शकतो.

१४४ – कोणत्याही प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होते.  हा सुद्धा दखलपात्र गुन्हा असून २ वर्षाचा कारावास होऊ शकतो. तसेच हा जामीनपात्र आहे.

१४५- बेकायदेशीर जमावाला पांगण्याचा आदेश दिला असल्याचे माहितअसूनही त्यात सामील होणे किंवा थांबून राहणे. तुमच्या विरोधात हा गुन्हा न्यायालयात सिद्ध झाल्यास २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. तसेच त्याबरोबर आर्थिक दंड सुद्धा होऊ शकतो.

१४७ – दंगा करणे या गुन्ह्यातही २ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

१४८- प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे. यात गुन्ह्यात ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

१४९- जर बेकायदेशीर जमावातील कोणत्याही घटक व्यक्तीने अपराध केला तर अशा जमावातील अन्य प्रत्येक घटक व्यक्ती अपराधाबद्दल दोषी धरण्यात येते असल्याची माहिती अॅड तोशिफ शेख यांनी दिली.

४५२- विना परवानगी घरात घुसणे, हमला करणे.

त्याचा परिणाम कशा कशावर होऊ शकतात

गुन्हे दाखल असेल तर नोकरी, पासपोर्ट, व्हिसा मिळविण्यासाठी अडचणी येऊ शकतात. पासपोर्ट मिळविण्यासाठी पोलीस व्हेरिफिकेशन होते. जर गुन्हा दाखल असेल तर तसा अहवाल पोलीस देतात. त्यामुळे पासपोर्ट मिळत नाही.

मग पासपोर्ट मिळविण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागते.विशेष परवानगी घ्यावी लागते. तो ही एक वर्षासाठी मिळतो. जास्त वर्षांसाठी जाता येत नाही चांगल्या नोकरी पासून मुकावे लागते. तसेच न्यायालयातून परवानगी घेऊन पासपोर्ट मिळाला तर त्याला केवळ एक वर्षाचीच मुदत असते. आणि पासपोर्ट नुतनीकरण करतांना सुद्धा अडचण येते.

तसेच पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये तसा रिपोर्ट आला तर व्हिसा सुद्धा नाकारला जाऊ शकतो. 

सरकारी नोकरी बरोबर आता खासगी नोकरीसाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट मागण्यात येते.   केसेस असेल तर पहिले केसाचा निकाल लावा मग नोकरीसाठी या असं सांगितलं जात. केसचा निकाल वर्षानुवर्ष लागत नाही. त्यामुळे नोकरीला मुकावे लागते. साक्षीदार येत नाही. तो पर्यंत नोकरी हातातून गेली असते.

याबाबत बोल भिडूशी बोलतांना अॅड विजयसिंह ठोंबरे म्हणाले,

सध्या माझ्याकडे अशा प्रकारे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झालेले हजार केसेस आहेत. पासपोर्ट मिळविणे, व्हिसा मिळणे अवघड जाते. अनेक महिने न्यायालयाचे खेटे मारून सुद्धा व्हिसा, पासपोर्ट मिळत नाही. त्यामुळे परदेशातील नोकरी आणि शिक्षणाला मुकावे लागते. त्यामुळे कुठल्याही राड्याच्या कार्यक्रमात सहभागी होतांना विचार करावा.

शेवटच म्हणजे नेत्यासाठी गुन्हे अंगावर घेताय पण लक्षात ठेवा तुमच्यासाठी कोणी येणार नाही. यामुळे राड्यात दाखल होण्यापूर्वी  कार्यकत्यांनी विषेश काळजी घ्यायला हवी. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.