आर्मीने जीपवर बांधून फिरवलेल्या काश्मिरी युवकाला BIG BOSS ची ऑफर आली होती. 

फारूक अहमद डार. बडगाव जिल्ह्याच्या चिल गावात राहणारा तरुण. या तरुणाला मागच्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात आर्मीच्या काही जवानांनी जिपसमोर बांधून पंचक्रोशीतल्या गावांमध्ये फिरवलं होतं. स्थानिक दगडफेक करणाऱ्या तरुणांपासून निवडणूक अधिकाऱ्यांचा बचाव करण्यासाठी या तरुणाचा उपयोगी मानवी ढाल म्हणून करण्यात आल्याचं स्पष्टीकरण या घटनेनंतर देण्यात आलं होतं. 

या घटनेनंतर मानव अधिकारी संघटनेनं निषेध नोंदवला होता. देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. आत्ता याच तरुणांचा वापर कलर्स वाहिनीने व्यवसायासाठी करण्याचा देखील प्रयत्न केला होता अशी माहिती समोर आली आहे. या तरुणाबरोबर झालेल्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात हा तरुण देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आला होता. त्याच्या याच प्रसिद्धीचा फायदा घेण्याच्या हेतूने कलर्स वाहिनीने आपल्याला हि ऑफर दिल्याचा खुलासा फारूकने केला आहे. 

द हिंदू या वर्तमानपत्राने हा खुलासा केला आहे. त्यांच्या मते आम्ही कलर्स वाहिनीशी संपर्क साधल्यानंतर या वाहिनीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटना फेटाळली देखील नाही किंवा मान्य देखील केली नाही. 

फारूक अहमद याच्या मते मला कलर्स वाहिनीने पन्नास लाख देण्याची अॉफर दिली होती मात्र या काळात मी माझ्यावर झालेल्या अत्याचाराची नुकसान भरपाई मागण्यात व्यस्त होतो. मी दहा लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र शासनाने अशा प्रकारच्या घटनेवर नुकसानभरपाई देण्याची तरतुद नसल्याचं सांगून माझी मागणी फेटाळली होती. 

Leave A Reply

Your email address will not be published.