नाव बदलून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो का ? केसीआर यांचा प्लॅन काय आहे…

मंगळवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात पाठीमागे तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे कटआऊट त्याच्या समोर भली मोठी लाईन. तेलंगणा राष्ट्रीय समिती (टीआरएस) कार्यकर्ते जमलेल्या लोकांना दारू आणि जिवंत कोंबडी वाटप करत होते. 

टीआरएस पक्षाचे कार्यकर्ते दारू आणि कोंबडी वाटण्याचे कारण म्हणजे चंद्रशेखर राव यांनी पक्षा  संदर्भात केलेली घोषणा. राष्ट्रीय राजकारणात पाय ठेवण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी पक्षाच्या नावात बदल केला आहे. 

राष्ट्रीय राजकारणात उतरण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल समजलं जात

 कधी काळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशंसक म्हणून केसीआर ओळखले जात होते. मात्र केंद्र आणि राज्यातील बिघडत जाणारे संबंध, केसीआर यांची राष्ट्रीय राजकारणातील त्यांची वाढत जाणारी महत्वकांक्षा यामुळे मोदी आणि केसीआर यांच्या अंतर पडत गेल्याचे सांगितल जात.

राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस माग पडत गेल्यानंतर ममता बॅनर्जी, नितीश कुमार,अरविंद केजरीवाल यांनी ती पोकळी भरून काढण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यात अजून एक नावाची भर पडत गेली ते म्हणजे तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव.

३१ ऑगस्ट रोजी नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांची केसीआर यांनी भेट घेतली. आणि त्यानंतर राष्ट्रीय राजकारणातील त्यांची महत्वकांक्षा पुन्हा एकदा समोर आली.

विरोधी पक्षाच्या वतीने मोदी विरोधात कोण हा प्रश्न अनुउत्तरित आहे

जरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला वेळ असला तरीही आता पासून विरोधी पक्षाच्या वतीने तयारीला सुरु झाली आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. त्याला दक्षिण  भारतातून चांगल्या प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितलं जात आहे. काँग्रेसकडून राहुल गांधी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवार राहतील अशी राजकीय विश्वात चर्चा आहे.

तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाला प्रत्येक राज्यात हार स्वीकारावी लागत असल्याने इतर विरोधी पक्ष राहुल गांधी यांच्या नावावर आक्षेप घेत आहेत. त्यानंतर विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून ममता बॅनर्जी, नितीश कुमार यांची चर्चा होती. मात्र यावर एकमत होऊ शकले नाही. अजून एक म्हणजे भाजपाला पर्याय म्हणून आप उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या सगळ्यात आघाडी घेतली आहे ती केसीआर यांनी.

तेलंगणा राष्ट्रीय समितीचे नाव बदलून भारत राष्ट्र समिती ठेवण्यात आले आहे.

केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणात उतरण्याची जय्यत तयारी केल्याचे हे सूतोवाच यांनी पक्षाच्या नावात बदल करून दाखवले आहे. राष्ट्रीय पक्ष करण्याचे दृष्टिकोनातून हे महत्वाचे पाऊल समजले जाते. देशात राजकारण करायचे असेल पक्षाला जास्त काळ प्रादेशीक अस्मिता जोडून चालत नाही. 

बुधवारी टीआरएसचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी नवीन पक्षात टीआरएसचे विलीनीकरण करण्याचा ठराव मंजूर केला. पुढील काही दिवसात हा ठराव निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल. यावेळी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हे सुद्धा उपस्थित होते.

महत्वाचा प्रश्न म्हणजे पक्षाचे नाव बदलून राष्ट्रीय पक्ष होता येते का?

केसीआर यांच्या पक्षाच्या वतीने नाव बद्दले असले तरीही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविणे सोपे नाही. हा निर्णय निवडणुक आयोग घेत. निवडणुक आयोग यासाठी  The Election Symbols (Reservation and Allotment) Order 1968 च्या नियमाप्रमाणे कुणाला काय घोषीत करायचं हे ठरवत असतं. आत्ता मुख्य मुद्दा हा आहे की राष्ट्रीय पक्ष म्हणून असणाऱ्या अटी कोणत्या असतात.    

  • संबधित पक्षाला किमान ४ राज्यांमध्ये ६% पेक्षा अधिक मतदान झाले पाहिजे.
  • संबधित पक्षाला किमान एका राज्यात तरी ४ पेक्षा अधिक लोकसभा जागांवर विजय मिळालाचं पाहिजे.
  • संसदेतील एकूण जागांपैकी किमान दोन म्हणजेच २% जागेवर तरी संबंधित पक्षाचा विजय झाला पाहिजे.
  • संबधित पक्षाला किमान चार राज्यात तरी प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळालेला असला पाहिजे.

या चार अटी पुर्ण होत असतील तर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. 

यामुळे जो पर्यंत केसीआर या अटी पूर्ण करत नाही तो पर्यंत टीआरएस पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळू शकत नाही.

हे ही वाच भिडू  

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.