प्रदूषणासाठी उभारलेल्या स्मॉग टॉवरमुळे दिल्लीत आता राजकारण पेटलंय

देशातले राजकीय पक्ष कधीकधी राजकारण सोडून भलत्याच वाटेवर जातात. मगं मुद्दा कोणताही असो, राजकारणी त्यात उडी घेणारचं. त्यात एखाद्या गोष्टीचं श्रेय घायचंय म्हंटल्यावर यांची भांडण नळावरच्या भांडणांपेक्षा वरची असतात.

असंच काहीसं आताही पहायला मिळतंय, जेव्हा दिल्लीत स्मॉग टॉवर वरून भाजप आणि आपमध्ये चांगलीच झुंपलीये. आप म्हणतंय आम्ही देशातलं पाहिलं स्मॉग टॉवर उभं केलंय,  तर भाजप म्हणतय तुमच्या आधीच आम्ही हे काम करून बसलोय. 

एका टॉवरच्या लॉन्चिंगची ही गोष्ट आता राजकीय मुद्दा बनलाय. मात्र यासाठी आपण काही गोष्टी क्लियर करून घेऊ.

स्मॉग टॉवर नेमकं आहे तरी काय ?

तर हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी स्मॉग टॉवर हा एक उत्तम पर्याय मानला जातोय. जो शक्यतो २० मित्र उंच असतो. हा स्मॉग टॉवर जवळपास १ किलोमीटर परिसरातली दूषित हवा स्वच्छ करतो. म्हणजे प्रदूषित हवा ओढतं  आणि स्वच्छ हवा बाहेर सोडतं.

या स्मॉग टॉवरची टेक्नोलॉजी मूळची अमेरिकेतली पण सध्या भारतात असलेले स्मॉग टॉवर आयआयटीच्या शास्त्रज्ञांच्या मदतीनं तयार करण्यात आलेत.

आता दिल्ली आणि प्रदूषणाचं बॉन्डिंग सगळ्यांनाच माहितेय.  सगळ्यात जास्त प्रदूषण  असणाऱ्यांना ठिकाणांच्या यादीत दिल्लीचं नाव टॉपला येतं. ज्यामुळे दरवर्षीच दिल्लीकरांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न पडतो आणि हिवाळ्यात तर हे लिमीटचं क्रॉस करतं.

हीच बाबा लक्षात घेत दिल्लीत स्मॉग टॉवरचं उभारण्यात आलं. राजधानीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते या स्मॉग टॉवरचे उदघाटन झालं.

यानंतर मुख्यमंत्र्यांपासून ते आपच्या हर एक कार्यकर्त्याने आप सरकारं देशातलं पाहिलं स्मॉग टॉवर उभारल्याचा बोलबाला केला. प्रसार माध्यम, पेपर, सोशल मीडियाचे सगळीकडंच अरविंग केजरीवाल आणि स्मॉग टॉवर झळकायला सुरुवात झाली. 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हंटलं कि, ‘अभिनंदन दिल्ली. प्रदूषणाविरोधातील युद्धात देशातील पहिला स्मॉग टॉवर दिल्लीत सुरू झाला. अमेरिकन तंत्रज्ञानाने बनवलेल्या या स्मॉग टॉवरमुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल.  प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेल्या या प्रकल्पाचे परिणाम अधिक चांगले असतील तर असे आणखी स्मॉग टॉवर संपूर्ण दिल्लीत बसवले जातील.’

 

एवढंच काय, दिल्ली सरकारनं अर्थात आपच्या कार्यकर्त्यांनी अख्ख्या राजधानीभर ‘भारतातील पहिला स्मॉग टॉवर’ उभारल्याचा दावा करणारे होर्डिंग्जही लावले आणि पायलट प्रोजेक्टने आशादायक परिणाम दिल्यास दिल्लीमध्ये असे आणखी टॉवर्स उभारण्याचे वचन दिले.

केजरीवाल सरकारनं उभारलेला हा स्मॉग टॉवर २४ मीटर उंचीचा असून कॅनॉट प्लेसजवळील शिवाजी स्टेडियम मेट्रो स्टेशनच्या मागे बसवण्यात आलायं. या टॉवरमध्ये १ किमी अंतरावरची प्रदूषित हवा शोषून घेण्याची क्षमता असून ४० पंख्यांद्वारे स्वच्छ आणि ताजी हवा सोडू शकतो.  माहितीनुसार हा टॉवर प्रति सेकंद १,००० क्यूबिक मीटर स्वच्छ हवा सोडू शकते.

भाजपनं घेतली उडी 

आता हा स्मॉग टॉवर सुरु केल्याबद्दल भाजपनं दिल्ल्लीवर निशाणा साधलाय. दिल्ली भाजपचे प्रवक्ते प्रवीण शंकर कपूर म्हणाले की, दिल्लीतील प्रदूषणाशी लढण्यासाठी आवश्यक असलेले स्मॉग टॉवर बसवण्याच्या बाबतीत दिल्ली सरकार खूप मागे आहे. दिल्ली सरकार कॅनॉट प्लेसवर दिल्लीचा पहिला स्मॉग टॉवर उभारण्याचा दावा करतंय, पण हा दावा साफ खोटा आहे. खरं तर गेल्या वर्षीचं दिल्लीत तीन स्मॉग टॉवर कार्यरत आहेत.

प्रवीण कुमार यांनी ट्विट करत म्हंटल कि, ‘वाह रे अरविंद केजरीवाल, बंद स्मॉग टॉवरचं उद्घाटन करून वाह वाह मिळवण्याचा प्रयत्न आणि खोटा प्रचार करून करोडो रुपयांचं होर्डिंग अभियान सुरु कुछ तो शर्म करो’. 

दरम्यान, पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यातच आपल्या संस्थेच्या माध्यमातून दिल्लीला आधीच तीन स्मॉग टॉवर्स दिले आहेत. यातला देशातला पहिला टॉवर लजपत नगरच्या मध्यवर्ती बाजारात उभा केलाय. हा २० फूट उंच स्मॉग टॉवरमध्ये २,५०,००० ते ६,००,०००  घनमीटर प्रदूषित हवा स्वच्छ करण्याची क्षमता आहे.

यानंतर दुसरा स्मॉग टॉवर १२ नोव्हेंबरला गांधी नगरमध्ये आणि तिसरा कृष्णा नगरमध्ये २४ नोव्हेंबर २०२० ला उभारलायं.  

दरम्यान, नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित स्टार्टअप असलेल्या नूतन लॅब्सने यावर्षी मार्चमध्ये बेंगळुरूच्या हडसन सर्कलमध्ये असाच स्मॉग टॉवर उभारला होता.

दरम्यान, आता भाजप – आपचा या स्मॉग टॉवरच्या वादात निकाल काहीही लागो. पण दिल्लीकरांचं प्रदूषणाचं टेन्शन थोड्या प्रमाणात का असेना कमी व्हायला मदत होणार एवढं मात्र नक्की!

हे ही वाच भिडू  :

Leave A Reply

Your email address will not be published.