आप देतय उत्तराखंडच्या तरुणांना ६ महिन्यात रोजगाराची गॅरंटी नाहीतर ५००० रुपये फिक्स !

पुढच्या वर्षी पंजाब, उत्तर प्रदेशाबरोबरचं उत्तराखंड मध्येही विधानसभा निवडणूका  होणार आहे. या आगामी निवडणुकांसाठी सगळ्याचं पक्षांनी आपापली रणनीती आखलीये. याच साखळीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या उत्तराखंड दौऱ्यावर आहेत.

खरं तर, येत्या २०२२ मध्ये पाच  राज्यांच्या विधानसभा निवणूक होणार आहेत. त्यामुळे  फक्त दिल्ली पुरता असणारा आम आदमी पक्ष आता हळू – हळू बाकीच्या राज्यांमध्येही आपले हातपाय पसरवायला लागलायं. पंजाबमध्ये तर पक्षानं आपला जम बसवलायचं. सोबतच, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये त्यांनी आपले पाय रोवायला सुरुवात केलीये. 

यासाठीच अरविंद केजरीवाल स्वतः या राज्यांत जाऊन दौरे करतायेत. आपल्या उत्तराखंड दौऱ्यादरम्यान रविवारी ते हल्द्वानीला पोहचले आणि पुन्हा एकदा मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले. एवढंच नाही  यावेळी आम आदमी पक्षाच्या संयोजकांनी उत्तराखंडसाठी प्रत्येक घरातील एकाला रोजदार देण्याचं आश्वासन दिल आणि तेही ६ महिन्यात. किंवा पाच हजार रुपये देण्याची मोठी घोषणा केली.

केजरीवाल म्हणाले कि,

“सरकार स्थापनेपासून सहा महिन्यांत १ लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. आणि जोपर्यंत रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत दरमहा ५००० रुपये दिले जातील, एवढंच नाही तर उत्तराखंडच्या नागरिकांना  नोकऱ्यांमध्ये ८०% आरक्षण देखील दिले जाईल.

तरुणांना लक्ष्य करत ते म्हणाले, “आजचा तरुण संधीच्या शोधात आहे, जेव्हा त्याला त्याच्या शहरात आणि राज्यात संधी मिळत नाही, तेव्हा तो देशाच्या इतर राज्यांत निघून जातो. जर माझ्या पक्षाने इथे सरकार बनवलं, तर मी प्रत्येक घराला रोजगार देईल. आणि मी हे फक्त बोलत नाही. ‘

माहितीनुसार, आप उत्तराखंडमधील युवकांना रोजगार देणारं जॉब पोर्टल सुरू करणार आहे. तसेच यासाठी एक नवीन रोजगार आणि स्थलांतरण मंत्रालय तयार केले जाईल. यामागचा हेतू तरुणांना स्थलांतरित होण्यापासून रोखणं आणि स्थलांतरित लोकांना परत आणण्यासाठी योजना बनवणं आहे.

आपल्या निवडणूक दौऱ्यात केजरीवाल यांनी माध्यमांशी बोलताना म्हंटल की, ‘उत्तराखंडची स्थापना होऊन २१ वर्षे झालीत, पण पक्षांनी या राज्याच्या विकासासाठी काहीचं केले नाही, पण हा,या पक्षांनी उत्तराखंडची दुर्दशा करण्यात कुठलीचं कसर सोडली नाही. सगळा उत्तराखंड फक्त लुटला. कोणी डोंगरं फोडली, तर कोणी नदी अडवली, तर कोणी जंगलं तोडली.

२१ वर्षांची दुर्दशा २१ महिन्यांत ठीक करायचा प्लॅन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुढे म्हणाले, ‘आम्ही २१ महिन्यांत २१ वर्षांची दुर्दशा दूर करण्याचा प्लॅन आखतोय. शाळा कशा बनवल्या जातील, रस्ते ठीक केले जातील, २४ तास वीज उपलब्ध असेल, शेती कशी वाढेल, महत्वाचं म्हणजे उत्तराखंडची सर्वात मोठी समस्या असणाऱ्या रोजगाराचा प्रश्न सोडवला जाईल.  राज्यातली बेरोजगारी दूर करण्यासाठी एक योजना तयार करण्यात आली आहे”

‘वीज बिलामुळे शेतकरी त्रस्त आहेत .. जुन्या अव्वाच्या सव्वा बिलांमुळे त्यांची डोकेदुखी वाढलीये.. जसे त्यांनी दिल्लीत केले आहे, ते उत्तराखंडमध्येही तेच करतील. शेतकऱ्यांची वीज माफ करणार. लोकांची वीज माफ करेल आणि २४ तास वीज पुरवठा करणार’, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिल.

आम आगामी उत्तराखंड निवडणूक लढवेल आणि विकासाच्या मुद्द्यावर जोर देईल. आणि उत्तराखंडात दिल्ली मॉडेल चालवणार असल्याचं केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. 

स्थिर मुख्यमंत्री देऊ

यावेळी केजरीवालांनी भाजपवरही निशाणा साधला. सीएम केजरीवाल म्हणाले की, ‘जर तुम्ही भाजपाला मतदान केले तर दर महिन्याला एक नवीन मुख्यमंत्री उपलब्ध होईल, पण तुम्ही आम्हाला मतदान केले तर आम्ही पाच वर्षांसाठी एकचं स्थिर मुख्यमंत्री देऊ. आम्हाला मतदान करून उत्तराखंडमध्ये स्थलांतर थांबेल.’

 

हे ही  वाचं भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.