केजरीवालांच्या आपने धर्मनिरपेक्षता मागे सोडून भाजपसारखीच हिंदुत्वाची वाट धरलेय

”मी एक राजपूत आहे, महाराणा प्रतापचा वंशज आहे. मी माझं डोकं उडवून टाकीन परंतु भ्रष्ट-कारस्थानी लोकांसमोर झुकणार नाही.” 

आम आदमी पक्षाचे जेष्ठ नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचं हे ट्विट आहे. CBI ने सिसोदिया यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर त्यांनी आपण अशा कारवायांना घाबरत नसल्याचं सांगताना त्यांनी अशा आशयाचं ट्विट केलं आहे.

यानंतर सिसोदिया यांच्यावर गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजपूत जातीचं कार्ड बाहेर काढल्याचा आरोप झाला. मात्र त्याचवेळी महाराणा प्रताप, राजपूत असे शब्द वापरून आप CBI ने टाकलेल्या धाडीला केजरीवालांची आम आदमी पार्टी हिंदुत्वाच्या मुद्याने काउंटर करत असल्याचंही बोललं गेलं. 

येऊ घातलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणुका याआधी झालेल्या उत्तरप्रदेश, उत्तराखंडच्या निवडणुकांमधील आपची आश्वासनं आणि प्रचार पाहता आपने स्वीकारलेल्या हिंदुत्वाच्या मुद्याला अजूनच बळ मिळतं. पण याची सुरवात २०१९ च्या निवडणुकांनंतरच झाली होती. 

2014 आणि 2019 दरम्यान, बहुतेक राजकीय पक्ष अजूनही भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करत होते. 

हिंदुत्वाचा मुद्दा जास्त काळ टिकणार नाही अशी त्यांना अशा होती. परंतु 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचंड विजयाने बहुतेक राजकीय पक्षांना खात्री पटली आहे की भारतीय राजकारणात किमान पुढील दशकासाठी तरी हिंदुत्वाच्या मुद्दा सेंटरस्टेजला असणार आहे अशी जवळपास सगळ्याच पक्षांना खात्री पातल्याच दिसतं. त्यामुळं राहुल गांधींच्या देखील मंदिराला भेटी देण्याचं प्रमाण वाढल्याचं दिसतं. मात्र तरीही काँग्रेस हिंदुत्वाचा मुद्दा पूर्णपणे स्वीकारायचा कि सॉफ्ट हिंदुत्व स्वीकारायचं याबाबद्दल अनेकदा संभ्रमावस्थेत असलेली दिसते.

मात्र केजरीवालांच्या पक्षाने मात्र सत्तेत यायचं असेल तर हिंदुत्वाला विरोध करून किंवा बगल देउन चालणार नाही हे बरोबर ओळ्खल्याचं दिसतं. त्यामुळं पक्षाच्या २०१९ नंतरच्या अनेक धोरणात आपल्याला हिंदुत्वाचा वावर सारखा दिसून येतो.

यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे राम मंदिराचा.

“जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा मी माझ्या नानीला विचारले की, तुला खूप आनंद होईल, आता तुझे रामाचे मंदिर बनणार आहे, तेव्हा तिने सांगितले की, मशीद पाडून बांधलेल्या मंदिरात तिचा राम राहू शकत नाही.”

” स्टील ऑथॉरिटीच्या ऑफ इंडियाच्या ऐवजी नेहरू मंदिर बांधत बसले असते तर आज भारताचा एवढा विकास झाला असता का? ”

२०१९ च्या आधीची अरविंद केजरीवाल यांची राम मंदिराबद्दलची ही वक्तव्ये होती. सिसोदिया देखील त्यावेळी राम मंदिरा ऐवजी  विद्यापीठ बांधण्याचा सल्ला देत होते.

मात्र २०१९ नंतर हे बदलण्यास सुरवात झाली.

2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तीन दिवस आधी जेव्हा मोदी सरकारने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी ट्रस्ट स्थापन करण्याची घोषणा केली तेव्हा केजरीवाल यांनी ” नेक काम मी देरी कैसी म्हणत” या निर्णयाचं समर्थन केलं होतं.

भाजपच्या सीतामढी, जनकपूर (नेपाळ), वाराणसी, प्रयाग, चित्रकूट, हंपी, नाशिक आणि दिल्लीहून हिंदू यात्रेकरूंना रामायण एक्स्प्रेसला टक्कर देण्यासाठी आम आदमी पार्टी सरकारने धर्माने खचाखच भरलेली पण धर्मनिरपेक्षतेचा टॅग लागेल अशी मुख्यमंत्री तीर्थ यात्रा नावाची योजना सुरू केली. या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना हिंदू, मुस्लिम आणि शीख यांच्यासाठी महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.

मागच्या दोन दिवाळी केजरीवालांनी सरकारी पैश्यातून एकदम धुमधडाक्यात साजऱ्या केल्या. २०२० मध्ये गुजरातमधील अक्षरधाम मंदिराची प्रतिकृती आणि २०२१ मध्ये अयोध्या मंदिराचा भव्य सेट त्यासाठी दिल्लीत उभा करण्यात आला होता.  त्यास्तही मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी देखील झाली होती.

“दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रभू रामाचे आम्ही एकत्र स्वागत करू – पण आम्ही फटाके फोडणार नाही, प्रदूषण करणार नाही.”

असं केजरीवाल म्हणाले होते. आता त्यांच्या जवळपास सगळ्या धोरणात ‘राम’ दिसत होता. उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपने तिरंगा यात्रा काढली होती. आणि हि यात्राचं डेस्टिनेशन होतं अयोध्या. उत्तराखंडमध्ये ”भोले का फौजी” ला मुख्यमंत्री करू आणि उत्तराखंडला हिंदूंची स्पिरिच्युअल कॅपिटल करू अशी आश्वासनं केजरीवाल यांनी प्रचारादरम्यान दिली होती.गुजरातच्या प्रचाराची सुरवात देखील केजरीवालांनी श्रीकृष्णच्या मंदिराला भेट देउन केली आहे.

आधी उघडपणे हिंदुत्व स्वीकारण्यास मान्य नं करणारे केजरीवाल आता आम आदमी पार्टीने हिंदुत्व स्वीकारल्याचं मान्य करतात. 

मात्र आमचं हिंदुत्व हे देशातील १३० करोड लोकांना एकत्रित आणणार असल्याचं केजरीवाल सांगतात. ”राम राज्य” आणणारं आमचं हिंदुत्व असल्याचं आपतर्फे सांगण्यात येतं.

 

मात्र त्यांच्या या हिंदुत्वावर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले गेले.

हिंदुत्वाचा स्वीकार केल्यानंतर आपने अल्पसंख्यांकांच्या प्रश्नांनावर बोलणं बंद केल्याचा आरोप होत आहे. 

CAA -NRC चं मोठं आंदोलन दिल्लीमध्ये होत होतं मटार त्यामध्ये आपचा रोल जवळपास नसल्यासारखाच होता. त्यानंतर झालेल्या दिल्ली दंग्यातही आपने कोणतीही भूमिका नं घेता शांत राहणंच पसंत केलं होतं.

त्यानंतर देशभर मॉबलिंचिंग, बीफ बॅन यावरून वातवरण तापलं असताना आपने यामध्ये आपला स्टॅन्ड क्लियर केला नाही. जरी आपला कोणती प्रतिक्रिया द्याची असल्यास पक्षाचे मुख्य नेते यावर काही प्रतिक्रिया देत नव्हते त्याऐवजी अमानतुल्लाह खान या त्यांच्या दिल्लीतल्या आमदाराला पुढं केलं जात होतं. आताही बिल्किस बानो प्रकरणाने गुजरातमधील आणि एकंदरीत देशातील वातवरण ढवळून निघालं असताना आपच्या प्रमुख नेत्यांची या मुद्ययावरील चुप्पी बरंच काही सांगून जाते.

आपने हिंदुत्वाचा स्वीकार केल्यानंतरही त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाहीये.  उत्तराखंड, उत्तरप्रदेश या राज्यातील विधानसभा निवडणुकीत आपला भोपळाही फोडता आला नव्हता. तर पंजाबमध्ये जरी विजय मिळाला असला तरी तिथली निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली नव्हती. त्यामुळॆ किमान गुजरातमधल्या विधानसभेच्या निवडणुकीत तर आपला या हिंदुत्वाच्या मुद्याचा फायदा होणार का हे निवडणुका जश्या जवळ येत राहतील तसं कळून येईलच.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.