सायनाइड किलर : पोलीसांच्या मते केम्पम्माने सायनाइड वापरून २० हून अधिक खून केले

ही गोष्ट आहे १९९७-९८ सालची…

जेव्हा नाइंटीज च्या रोमँटिक गाण्यांचा आणि सिनेमांचा काळ संपत चालला होता आणि बॉलिवूडमध्ये आपल नशीब चमकवायला चॉकलेट हिरोंची गर्दी ऑनस्क्रीन लागली होती. त्याचकाळी कर्नाटकच्या कागलीपुरा ह्या छोट्या गावात आपल्या एशो आरामाच्या जिंदगीची वाट पाहत आपला टेलर नवरा व तीन मुलांसोबत रोजच रडगाण घेऊन जगत होती ‘के डी केम्पमम्मा’.

ह्या केम्पमम्माला सुद्धा माहित न्हवत की आपले ऐशो आरामाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ती पुढं गुन्हेगारी जगतावर राज्य करणार आहे ते.

गरीब घरात जन्मलेली केम्पमम्मा तिझ लहानपणापासूनचे स्वप्न होते की माझे पुढचे आयुष्य हे सुखसोयींनी भरलेले असावे. कुठल्याच गोष्टीची कमतरता त्यामध्ये पडली नाही पाहिजे. पण तिच स्वप्न हे स्वप्नच राहिले. वयात येताच घरच्यांनी एका टेलर मास्तर सोबत तिचे लग्न लावुन दिले. जेमतेम पगार असलेला टेलर केम्पमम्माचे स्वप्न पुर्ण करू शकत नव्हता. त्यात त्यांना तीन मुले झाली.

पण केम्पमम्माला तिचे स्वप्न गप्प बसू देत न्हवते. कायतरी केल पाहिजे म्हणुन तिने नवऱ्याला तिच्या ‘चीट फंड’ या नविन बिझिनेस बद्दल कल्पना दिली व त्याला कसातरी त्यासाठी तयार केला व नवऱ्याची जी काही सेव्हींग रक्कम होती ती तिने ह्या बिझिनेससाठी वापरली.

पण तो बिझिनेस काय चालला नाही व बुडीत निघाला. ह्या सर्व प्रकारामुळे त्या नवरा बायको मध्ये वाद झाले व केम्पमम्मा घर सोडून बेंगलोरला निघुन गेली ती कायमचीच.

बेंगलोरला तिने सुरवातीला काही घरात घरकाम केले व नंतर ती एका सोनाराच्या दुकानात कामाला लागली. त्या सोन्याच्या दुकानात काम करता करता तिचा पैश्याबद्दलचा मोह अजुन वाढला. दुकानाच्या मालकाला विश्वासात घेऊन ती त्याच्या घराचे सुद्धा काम करायला लागली. व तिने त्याच्या घरी दागिन्यांची चोरी केली पण ती पकडली गेली आणि तिला ६ महिन्याची जेल झाली.

जेलमधून सुटका होउन बाहेर आल्यानंतर तिच्यावर चोर नावाचा ठपका पडला होता. व तिला आता कुठेच कामधंदा मिळत नव्हता. ती बेघर झाली होती पण पुन्हा आपल्या गावाला जायचा विचार तिच्या कधीच मनात आला नाही. शेवट कुठेच सोय होईना म्हणून ती मंदिरात राहू लागली.

मंदिरात राहत असताना तिचे लक्ष तिथं येणाऱ्या भाविकांवर जाऊ लागले, विशेषतः महिला भाविकांवर जे आपल गाऱ्हाणं घेऊन देवाकडे येत असत. तिने अशा महिलांचा फायदा घ्यायचे ठरवले. केम्पम्मा ही मंदिरात आलेल्या स्त्रियांवर लक्ष ठेवू लागली. ती एका पवित्र आध्यात्मिक स्त्रिच्या भूमिकेत मंदिर परिसरात वावरू लागली, ज्यामुळे तिला इतर श्रद्धाळू स्त्रियांशी मैत्री करणं सोपं जाऊ लागलं.

१९ ऑक्टोंबर १९९९ रोजी ममता राजन नामक एक ३० वर्षीय स्त्री आपल्याला मुलं होत नाहीये म्हणून नेहमीप्रमाणे देवाच्या दारात आली. केम्पम्माने तिला हेरल व तिला सांगितल की तुला मी मुलगा मिळवुन देईल फक्त तुला मी सांगेल ते करावे लागेल. केम्पम्माच्या रुपात देव आला समजुन ममता राजन त्या गोष्टीसाठी तयार झाल्या.

केम्पम्माने सांगितल की,

घरी जा एखाद्या नव्या नवरीसारखा शृंगार करुन घरातील सगळे दागदागिने घालून सर्व रक्कम घेऊन मंदिराच्या एकांत असलेल्या परिसरात ये तिथं मी आपण एक स्पेशल पुजा घालु व तुझी इच्छा पुर्ण होईल.

ठरल्याप्रमाणे सगळ सुरू झाल. पुजा सुरू झाली एका लोट्यात केम्पम्माने ‘पोटेशियम सायनाईड’ टाकले व ममता राजन यांना पवित्र पाणी म्हणून प्यायला दिले व त्यांचा मृत्यु झाला. आणि अश्या तऱ्हेने आपला पहिला खुन करत केम्पम्मा सर्व दागदागिने व मालमत्ता घेऊन फरार झाली.

नंतर केम्पम्माने पुढील २ महिन्यात ह्या सारख्या पद्धतीने अजुन ५ खून केले.

हे सर्व खून लांबलांब अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर आणि मंदिराच्या परिसरातच झाले. पोलिसांच्या भोंगळ कारभारामुळे केम्पम्मा एवढं सगळ करुन सुद्धा स्वतंत्र वावरू लागली. पण २००६ साली केलेल्या एका खुनात केम्पम्माचे धागेदोरे सापडले व नंतर त्या खुनाबद्दल तिला अटक झाली.

जेव्हा अटक झाली तेव्हा तिने आतापर्यंत केलेले सगळे कारस्थाने पोलिसांसमोर सांगितले. पोलिस सगळ आश्चर्यचकित होऊन ऐकत होते. नंतर त्यांनी सगळ्या केस रिओपन केल्या व त्यांना ६ खुनाबद्दल ठोस पुरावे सापडले व त्याआधारे केम्पम्माला फाशीची शिक्षा सुनावली गेली. पण कर्नाटक पोलिसांच्या मते तिने २० पेक्षा अधिक खून केले होते.

जेव्हा पोलिसांनी तिला विचारले की तु मारण्याच्या ऐवजी बेशुद्ध का नाही केलेस त्यांना तर त्यावर ती म्हणाली की, “बेशुद्ध केल असत तर नंतर मी सापडले असते.”

मग ‘पोटेशियम सायनाइड’ च का वापरले अस विचारल असता तेव्हा ती म्हणाली की,

“ज्या सोनाराकडे मी काम करत होते तेव्हा तिथं अस ऐकल की सोन तयार करण्यासाठी काही जालीम झहर वापरतात, त्यापैकी हे एक होते म्हणून हे वापरले.”

ह्या सगळ्या आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी ऐकून बेंगलोर पोलिसांनी तिला ‘सायनाईड मलिका’ असे नाव दिले.

  • भिडू कपिल जाधव

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.