IT कल्चरच रूपांतर ॲग्रीकल्चरमध्ये केलं. आज त्याने २०० शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकलंय
लॉकडाऊन लागल्यावर एकंदरीत असं गृहीत धरलं गेलं की आता बरीच कामं ठप्प होतील; पण अनेकांनी यावर पर्याय शोधला. शेवटी माणूस हा बदलाचाचं प्रवाह आहे. त्यामुळे हे होणं साहजिकच होतं. ऑनलाईन माध्यमं वापरून लोकं आपापल्या पद्धतीने मिटिंग आणि कामकाज करू लागले.
अश्यात एक गोष्ट खूप नवल वाटणारी घडून गेली. ती म्हणजे की एक व्यक्ती लॉकडाऊन चालू जरी असलं तरी त्याने केलेल्या व्यवसायाच्या फायद्याचं गणित नव्या व्यवसायदाराला सांगत होता. तेही गुगल मीट ऐप च्या माध्यमातून.
आता आपण म्हणाल की एवढं काय ? हे तर कुणीही करतं. पण त्या क्षेत्रात फार कुणी असं करत नाही.
तो व्यक्ती दूसरा तिसरा कुणी नसून एक प्रगतशील शेतकरी आहे.
कोरोनामुळे उद्भवलेल्या भीषण परिस्थितीत सुद्धा शेतकरी मागे न हाटता शेती करायचं मार्गदर्शन करत आहे. शेतकरी सुद्धा काही कमी नाही हे यातून पाहायला मिळतं.
याला आपण एक छान नावही देऊ शकतो की ‘ ऑनलाईन शेतकरी ’…
जसं डॉक्टरला पोराला डॉक्टर करू वाटतं तसं सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक शेतकरी आईबापाला असं वाटतो की आपला पोरगा साहेबाच्या नोकरीला असावा. त्याने शेती करावं असं फार कमी प्रमाणात मोडणाऱ्या शेतकऱ्याना वाटतं. पण आज आपण एक असं उदाहरण पहाणर आहोत की ते स्वतः आयटी इंजिनीअर असूनही सगळं काही सोडून आज प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी आहे.
रासायनिक खतामुळे घरच्या मुलीची, जेव्हा तबियेत बिघडली, तेव्हा त्यांनी नोकरी सोडून पारंपारिक शेणखताचा वापर करून शेती करायचा निर्णय घेतला. कारण त्यांना पिकाला रासायनिक खतापासून मुक्त करायचं होतं.
नांदेड जिल्ह्यातील त्या प्रगतशील शेतकऱ्याचं नाव आहे, ‘ केशव राहेळगावकर ’
केशव यांनी शिक्षण पुर्ण झाल्यावर विप्रो कंपनीत हार्डवेयर डिव्हिजन विभागात काम करायला सुरुवात केली. तिथं ते सोल्युशन्स प्रोव्हायडर म्हणून काम करत होते. १९९८ ते २००० पर्यंतचं त्यांनी तिथं काम केलं. दोन वर्षं काम केल्यानंतर त्यांच्या मनात जरा अनेक खलबत सुरु झाली.
इथं काम करण्यापेक्षा आपण स्वतःच्या व्यवसायात काम केलं तर किती उत्तम होईल ! या विचाराने केशव यांनी स्वतःचा कम्प्युटर हार्डवेअर चा व्यवसाय चालू केला.
या व्यवसायात ते चांगलेच रंगले होते. दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा मालक म्हणून काम करण्यात त्यांना आनंद मिळत होता.
पण २००९ मध्ये एक घटना घडली आणि तिथून पुढ त्यांचा शेती करण्याकडे कल वळला.
घटना अशी होती की त्यांच्या भावाच्या मुलीला सेलीब्रल पाल्सी सारख्या अनेक विकारांनी ग्रासलं. जास्त त्रास व्हायला लागल्यावर त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तेव्हा तिथं डॉक्टर ने सांगितलं की
तिला हा त्रास अन्नामधून झालेला आहे.
म्हणजे रासायनिक खताच्या शेतीवर आधारित जे पिके येतात ते जर आपण दैनंदिन जीवनात वापरले तर त्याचा अश्या आजारासारखा परिणाम होऊ शकतो. त्याचा केशव यांच्या विचारांवर खूप परिणाम झाला. त्यांना असं वाटलं की
‘ कितीतरी लोकं आज अश्याच रासायनिक खताच्या आधारे करण्यात येणाऱ्या शेतीवर अवलंबून आहेत. तर मग त्यांना जर असा होऊ लागलं तर ? नाही त्याच्यापेक्षा आपली स्वतःची शेती शेणखत वापरून करून इतरांना प्रेरणा दिली तर.
अश्या विचारात शेवटी शेणखत वापरून रासायनिक खत मुक्त शेती करायचची केशव यांचं ठरलं.
त्यांनी नांदेड येथील शेतीची मशागत केली आणि पिक घेण्यासाठी तयार केली. त्यांनी शेतीमध्ये फक्त शेणखताचा वापर केला. सुरुवातीला हळद, आदरक, उस, भुईमूग, आणि तूर यांचं शेणखती उत्पन घेतलं. त्यात कमालीचा आर्थिक स्वरूपाचा नफा त्यांना मिळाला. आणि सोबत रासायनिक मुक्त पिके ही मिळाली.
त्याचं सोबत पुढं चालून द्राक्षे, आंबा अश्या फळांचं उत्पादन ही घेणं सुरु केलं. शेणखताचा योग्य वापर करून आपण रासायनिक मुक्त पिके घेऊन शेती करू शकतो हे त्यांनी जेव्हा इतर शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र शेतकरी असं काही ऐकायला तयार नव्हते.
शेतकऱ्यांना शेणखत शेतीकडे वळवायला त्यांना फार कसरत करावी लागली.
सुरुवातीला ५०, १०० आणि पुढं चालून तब्बल ३०० शेतकऱ्यांना आधुनिक जीवनपद्धतीत रासायनिक खताचा अतिरेक वापर करून पिकात होणारी हानी लक्षात आणून देण्यात ते यशस्वी ठरले. आज ते सगळे शेतकरी रासायनिक मुक्त शेती करत आहेत.
पहिल्या वर्षी सगळ्यांना उत्पादन मात्र चांगलं झालं पण त्याची विक्री करायला त्रास होऊ लागला. म्हणूनच त्यांनी मिळून विक्रीच्या गोत्यातून सुटण्यासाठी ‘ अमृत न्याचरल ब्रँड ’ ची स्थापना केली. ज्यामार्फत आता सगळ्या शेतकऱ्यांचा शेतीमाल एकत्रित करून तो विक्रीस नेला जातो.
एवढचं नव्हे तर केशव यांनी एक टेक्निकल टीमही बनवलेली आहे. ज्यामार्फत ते शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात.
सोबत सध्याच्या लॉकडाऊन काळात शेती विशेष गुगल मिट द्वारे मिटिंग घेऊन माहिती पुरवतात. केशव यांचा एकच विचार आहे की रासायनिक मुक्त शेती ही भारत भर पोहचवावा.
म्हणूनच ते आणि त्यांची टीम अनेक कार्यशाळा आयोजित करत असतात. सध्या ते गुगल मिट द्वारे कार्यशाळा घेत आहेत.
नांदेडच्या प्रतिभा निकेतन हायस्कूल मधुन माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिवर्सिटीत आयटी मधून इंजिनीयरिंगची पदवीचं शिक्षण घेणारे प्रसिद्ध शेतकरी केशव हे शिक्षणाला फार महत्व देतात. त्यांच्या मते शिक्षणचं आपलं जीवन प्रगतशील करू शकतं. शिक्षणासोबत मेहनत, आणि नवनवीन गोष्टी करण्याचं धाडस असणारे आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीत.
खरच यशाची व्याख्या म्हणजे काय याचं उत्तर केशव राहेळगावकर यांच्या संघर्षमय जीवनाकडं पाहिलं तर कळतं.
हे हि वाच भिडू.
- एक अमेरिकन ज्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला आणि भारताला सफरचंदाची शेती शिकवली.
- पोरांनी पुतळा उभारून जपल्या आहेत शेतकरी बापाच्या स्मृती.
- IIT चा इंजिनियर नोकरी सोडून शेती करायला लागला; वर्षाला 20 कोटींची उलाढाल करतोय !!
- शेती you tube वर नेली. आज महिना दोन लाख कमावतोय पण कसे ? आम्ही सांगतो की.