मोदींनी लढवलेला पहिलाच राजकीय डाव केशूभाईंना मुख्यमंत्री करून गेला.

जानेवारी १९९५. सात लोकांची एक टिम गुजरातमधील गिरनार पर्वतावर गेली होती. यामध्ये केशुभाई पटेल, शंकरसिंग वाघेला, नरेंद्र मोदी, चिमणभाई शुक्ला आणि सूर्यकांत आचार्य. हे सगळे भाजपमधील नव्या दमाचे आणि अनुभवी जुने नेते. तिथे फिरायला किंवा देवर्शनासाठी नाही तर शांत ठिकाणी निवडणुकीच्या तयारीला गेले होते. राज्यात दोन महिन्यांनंतर विधानसभा ब्ल्यु प्रिंट तयार करण्यात येणार होती.

गुजरातमधील राम मंदिर आंदोलनानंतरची पहिली निवडणूक.

पण यात सगळ्यात मोठ प्रस्थ होत शंकरसिंग वाघेला आणि केशुभाई पटेल. कारण अगदी जनसंघापासूनच भाजपच्या गुजरातमधील उभारणीत त्यांचं फार महत्वाचं योगदान राहिलं होतं. मात्र १९९० नंतरच्या निवडणूकीनंतर ‘पटेल’ राजकारणाचा पुन्हा एकदा उदयास होत असल्याचा निष्कर्ष या बैठकीत काढण्यात आला. अशातच चिमणभाई पटेल यांच्या मृत्युमुळे केशुभाई पटेल यांना संधी चालून आली.

गिरणारच्या त्या पर्वतावरुन बांधलेले आडाखे खरे होताना दिसत होते. विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. एकूण १८२ जागांपैकी १२१ जागा भाजपच्या खात्यात आल्या. कॉंग्रेस केवळ ४५ वर आटोपली. मुस्लिमबहुल भागातही कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला.

उपमुख्यमंत्री नरहरी अमीन, मनोहरसिंग जडेजा यांच्यासह राज्य सरकारमधील ३५ पैकी १८ मंत्री पराभूत झाले.

अहमदाबाद, भरुच, मेहसाणा, सूरत, वलसाड, बनसकांठा, राजकोट आणि कच्छ येथे तर कॉंग्रेस खातेही उघडू शकले नाही. १२ मार्च रोजी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांची निवडणूक ही केवळ औपचारिकता होती. पुष्पहारांनी केशुभाई पटेल या विधीमंडळ बैठकीला जाण्यापूर्वी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले

गुजरात ने पिछले पांच साल में भूमाफियाओं, अनैतिक व्यापारियों, सत्ता के दलालों और गुंडों का राज देखा है. हम जनता को हर लिहाज से अच्छी सरकार देने के लिए प्रतिबद्ध हैं. कुछ ही दिनों में सड़क पर चलते लोगों को यह अंतर समझ में आने लगेगा.”

सत्ता मिळताच केशुभाई पटेल यांनी एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे पक्षातील आपल्या संभाव्य विरोधकांची पद्धतशीर सेटिंग लावायला सुरुवात केली. नवीन मंत्रिमंडळात शंकरसिंह वाघेला यांच्या एकाही समर्थक आमदाराला मंत्रिपद दिले नाही.

केशुभाई पटेल यांना मुख्यमंत्रीपदावर बसविण्यापासून वाघेलांची सुट्टी करण्यापर्यंत महत्वाचा वाटा एका तरुण कार्यकर्त्याचा होता. केशूभाई त्याला आपला शिष्य मानायचे.

त्याच नाव नरेंद्र दामोदरदास मोदी.

राम रथ यात्रेपासून चर्चेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी चाणक्यनीती लढवून केशूभाईंना मुख्यमंत्री तर केलं पण त्याचवेळी त्यांच्याही पुढे एक पाऊल टाकणाऱ्या केशुभाई यांनी त्यांचीच रवानगी केंद्रातील संघटनेत करून त्यांचे राज्यातील वाढते महत्व कमी केले.

वाघेला देखील परिघाच्या बाहेर फेकले जाऊ लागले होते. केशुभाईंनी खूप विचार पुर्वक एक एक पाऊल टाकलं होतं. परंतु कधी कधी चांगल्या योजना देखील उलट्या पडतात, इथे ही तसेच झाले.

सप्टेंबर १९९५ मध्ये गुजरात राज्यात परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी केशुभाईंनी अमेरिकेचा दौरा आखला. दौऱ्यावर निघण्यापुर्वी केशुभाईंनी वाघेलांना बोलावून नरेंद्र मोदीं विषयी काही अडचण असल्याचे विचारले.?

यावर वाघेलांनी मला मोदींशी नाही तर तुमच्याशी अडचण आहे” जेव्हा तुम्ही परत याल तेव्हा मुख्यमंत्र्यांची खुर्ची गमावली असेल. असं खुल चॅलेंज दिलं.

झालं इकडे पटेल अमेरिकेत पोहचले तोवर शंकरसिंगानी आपल्या घरी भाजप आमदारांची बैठक बोलावली आणि आपल्या योजनेची कल्पना त्यांनी आमदारांना दिली. ज्यात १२१ पैकी १०५ आमदार हजर होते. वाघेलांनी यांना सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या सुचना दिल्या.

हे ऐकताच अर्ध्यापेक्षा जास्त आमदार आधीच गायब झाले. ५५ आमदार बंडखोरीच्या तयारीत मागे थांबले.

अनेक प्रयत्नांनी यातील ४७ आमदारांना मध्यप्रदेशमधील खजुराहोमध्ये हालवण्यात आलं. तर शंकरसिंग आणि विश्वासातील ७ आमदार या सगळ्या बंडखोरीतुन काही तरी हाताला लागावं यासाठी मागे थांबले. राष्ट्रीय पातळीवर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राजस्थानचे तत्कालिन मुख्यमंत्री भैरवसिंग शेखावत आणि अटलबिहारी वाजपेयी गुजरातमध्ये दाखल झाले.

अटलजींनी वाघेलांची समजूत काढली. केशुभाईंना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आले. त्यांचे समर्थक असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना देखील केंद्राच्या राजकारणात आणले गेले. त्यांना हिमाचल प्रदेश आणि हरियाणाचा प्रभारी पद देण्यात आलं. सुरेश मेहता मुख्यमंत्री झाले.

पण हार मानतील ते केशुभाई कसले. त्यांनी आपला राजकीय प्रवासाची सुरवातच अगदी शुन्यातुनच. यापेक्षा मोठे चढ-उतार पाहिले होते. पुर्ण राज्य जवळपास ३० वेळा फिरुन पालथ घातलं होतं. १९४५ ला संघप्रचारक, १९६० ला जनसंघ असा प्रवास करत ते इथं पर्यंत पोहचले होते. गुजरातमधील भाजप आणि संघाशी संबंधित लोक त्यांना आदराने ‘केशुबापा’ म्हणतं.

सुरेश मेहतांच सरकार अल्पकाळ ठरले, कारण परदेश दौऱ्यावरून परतलेल्या केशुभाई पटेल यांनी आता वाघेला यांच्याविरोधातील कारवाया सुरु केल्या.

वाघेला समर्थकांना केशुभाई समर्थक नेत्यांकडून त्रास देण्यात येऊ लागला. एक-दोन प्रकरणात तर वाघेला समर्थकांना मारहाण देखील करण्यात आली. जून १९९६ मध्ये वाघेला समर्थक काशीराम राणा यांची गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली.

या घडामोडींनी खवळलेल्या वाघेलांनी परत एकदा बंडखोरीचं अस्त्र बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबर १९९६ मध्ये त्यांनी आपल्या ४६ आमदारांसह सुरेश मेहता यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर स्वतः वाघेला कॉंग्रेसच्या ४५ आमदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले. पण वर्षभरातच पाठिंबा काढला न् ते ही सरकार चालवू शकले नाहीत. दिलीप पारेख यांच्याबाबतीतही तोच प्रकार.

अखेरीस १९९८ मध्ये पुन्हा निवडणूका घेण्यात आल्या. ते ही केशुभाईंच्याच नेतृत्वात. यावेळी शंकरसिंह कॉंग्रेसकडून मैदानात होते. पण निवडणुकीत १८२ पैकी ११७ जागा जिंकत भाजपने काँग्रेसला पुन्हा एकदा पराभूत केले. केशुभाई दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.

दिल्लीत बसून नरेंद्रभाई मोदी या गुजरातमधल्या सगळ्या घडामोडीकडे बारकाईने लक्ष ठेवून होते.

पण राज्याच्या राजकारणात अजून बऱ्याच घडामोडी बाकी होत्या. तीन महिन्यातच कांडला बंदरावर आलेल्या भयंकर वादळात १० हजार लोकांचा मृत्यु झाला. पुढच्याच वर्षी १९९९ आणि २००० असा सलग दोन वर्ष सौराष्ट्र आणि कच्छमध्ये अभुतपुर्व दुष्काळ पडला. गावच्या गाव रिकामी झाली. पुश पक्षी अक्षरशः तडफडून मेले. राष्ट्रीय मिडीयाने याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.

२६ जानेवारी २००१. सकाळी ८:४५ ला प्रयलकारी भुकंपाने भुजला गाठले. जवळपास ४ लाख घर जमिनदोस्त झाली. २० हजार पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. १ लाख ६७ हजार लोक जखमी झाले.

एकिकडे या सलग आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे संघटनेतील बंडखोरीने डोक वर काढलं. २००० सालामध्ये साबरमती विधानसभा जागेवर पोटनिवडणुका घेण्यात आल्या. माजी उपमुख्यमंत्री नरहरी अमीन कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. १९९८ मध्ये ते या जागेवरुन निवडणूक हरले. समोर भाजपचे बाबूभाई पटेल होते. यावेळी बाबूभाई निवडणूक हरले. या पलिकडे देखील ही जागा गांधी नगर लोकसभा क्षेत्रात येत होती. आणि इथून लालकृष्ण आडवाणी खासदार होते, जे की देशाचे गृहमंत्री होते. त्या मुळे या पराभवाचा अर्थ मोठा होता.

त्याशिवाय साबरकांठा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पूर्ण जोर देऊनही भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. कथा इथे संपली नाही.

त्यावर्षी झालेल्या पंचायत निवडणुकीतही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. आणि इथूनच केशुभाईंचा दुसरा निरोप समारंभ फिक्स झाला. पण त्यांनी राजीनाम्याला नकार दिला आणि सांगितले राजीनामा मागितला तर मी राजकारणातुन निवृत्त होणार.

असं म्हणतात की सर्व गोष्टी मागची सूत्रं केशूभाईंचे लाडके शिष्य नरेंद्रभाई मोदी हलवत होते.

शेवटी हा दंगा शांत करण्यासाठी मदनलाल खुराणा यांना अहमदाबादला पाठवण्यात आले. केशुभाईंची समजूत काढण्यात आली. खुराणांनी आश्वासन दिले की, नरेंद्र मोदीं त्यांच्या विरोधात काम करणार नाहीत असे आश्वासन देण्यात आले.

अखेरीस दबाव वाढल्यानंतर नाखुशीने केशुभाईंनी राजीनाम्यावर सही केली. आणि नवीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पर्वास सुरुवात झाली.

त्यांनी सांगितले

“सरकारची सगळी कमान केशुभाईंच्याच हातात असेल, ते या रथाचे सारथी असतील, मला त्यांची पुर्ण मदत लागेल”

मात्र त्यानंतर मात्र केशुभाईंना हळू हळू साईडलाईन करायला सुरुवात झाली. हे दुर्लक्ष अगदी पक्ष सोडण्यापर्यंत पोहचले. २००७ पासूनच त्यांनी मोदींना प्रत्यक्ष विरोध करण्यास सुरुवात केली. पटेल समुदायाला मोदींच्या विरोधात मतदान करण्याच आव्हान करु लागले.

अखेरीस २०१२ मध्ये त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत नवीन पक्ष स्थापन केला. ‘गुजरात परिवर्तन पार्टी’.

त्यांच्या पक्षाला अवघ्या दोन जागा मिळाल्या. यातील एक जागा जुनागड होती, जिथे १९९५ नंतर केशुभाईंनी एकदाही निवडणुक हरली नव्हती. पण २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा घरवापसी केली. आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि आपल्या विधानसभा जागेचा राजीनामा दिला.

२०१४ च्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा भरत पटेल या जागेवरुन भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढला पण तो पराभूत झाला. केशुभाई पटेल यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. २००६ मध्ये त्यांची पत्नी लीलाबेन यांचा जिममध्ये लागलेल्या आगीत मृत्यू झाला. सप्टेंबर २०१७ मध्ये, त्याचा ६० वर्षीय मुलगा प्रवीनचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

२०२० साली कोरोनाच्या पहिल्या लाटेत केशुभाई पटेल यांना कोव्हिडची  लागण झाली होती. पण यातुन ते बरे झाले होते. त्यानंतर त्याची तब्येत दिवसेंदिवस नाजूक होत होती. अखेरीस २९ऑक्टोबर २०२० रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.