हा असा एकमेव हॅकर होता ज्याला घाबरून अमेरिकन सरकार महिन्याला करोडो रुपये द्यायचं…

कामच असं करा ना कि लोकांनी तुम्हाला घाबरून राहून घरपोच पैशे पाठवले पाहिजे… सेम टू सेम असाच गेम केला होता अमेरिकेच्या एका हॅकरने. हे पण थोडं म्हणून कि काय त्याने सायबर क्षेत्रात अशी दहशत केली होती कि अमेरिकन सरकार त्याला महिन्याला करोडो रुपये देत असे. नक्की काय मॅटर आहे डिटेल मध्ये बघूया.

आज म्हणजे आत्तासुद्धा जरी तुम्ही गुगल वर सर्च मध्ये टाकलं कि जगातला सगळ्यात जबरी हॅकर कोण तर टॉपला नाव असतं केविन मिटनीक.

या नावाबद्दल बऱ्याच जणांना आयडिया असेलच, म्हणजे कॉम्युटर क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नाव माहितीच असेल .

हॅकिंगच्या दुनियेत केविन मिटनीकचा नाद भले भले करत नाही, ब्लॅक हॅट हॅकर नावाने सायबर विश्वात जगातला सगळ्यात शातीर जासूस म्हणून केविन मिटनीक प्रसिद्ध आहे. पण हा भिडू हॅकिंगकडे कसा काय वळला तर ते पण बघू. 

६ ऑगस्ट १९६३ रोजी कॅलिफोर्नियात केवीनचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्याला गेमिंग सेक्शन आणि हॅकिंग बद्दल बरंच कुतूहल होतं. वयाच्या १२ व्या वर्षी त्याने सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून लॉस एंजेलिसच्या बस मधून  फ्रीमध्ये प्रवास करणं सुरु केलं. ८०च्या दशकात केविनने मोठमोठ्या कंपन्यांचा बाजार उठवला. या मोठ्या कंपन्यांचे सिक्रेट प्रोजेक्टसुद्धा त्याने हॅक केले.

एकदम सहजपणे केविनने मोठमोठ्या कंपन्यांचे पासवर्ड हॅक करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ९०च्या दशकामध्ये केविन अमेरिकेतील मोस्ट वॉन्टेड सायबर क्रिमिनल बनला होता. या काळात त्याने नोकिया, आयबीएम, मोटारोला अशा बड्या कंपन्यांचे सर्व्हर हॅक करून या सगळ्या कंपन्या गोत्यात आल्या होत्या. 

आज घडीला अमेरिकेसहित अनेक मोठमोठे देश केवीनला प्रत्येक महिन्याला सायबर हॅकिंगपासून वाचण्यासाठी करोडो रुपये देतात. हे तर काहीच नाही गुगल, याहू, अमेझॉन या मोठ्या कंपन्यासुद्धा सायबर हॅकिंगपासून वाचण्यासाठी केवीनला करोडो रुपये देतात.

केविन मिटनीकने अमेरिकेच्या अमेरिकन डिफेन्स ऑर्गनायझेशन पेंटागॉन pentagoan ची सुद्धा साईट हॅक करून बसला आहे.केवीनला अमेरिकेच्या नॅशनल सेक्युरिटी अलर्ट प्रोग्राममध्ये विनाकारण सहभाग घेणे आणि कॉर्पोरेट सिक्रेट चोरण्याचा आरोपावरून ३ वर्षाची शिक्षा झाली होती. त्यानंतर मात्र सायबर क्राईमच्या कारणास्तव केवीनला अडीच वर्षांसाठी जेलात डांबण्यात आलं होतं.

या व्यतिरिक्त सरकारी कामात हस्तक्षेप या कारणामुळेसुद्धा केवीनला शिक्षा मिळाली होती. एकूण ६ वर्षाची शिक्षा केवीनला मिळाली होती. हा केविन इतका हुशार होता कि एकदा तर जेलमधून तो पळून गेला होता. केवीनच्या आयुष्यावर २०००साली सिनेमा सुद्धा आला होता. TAKEDOWN असं या सिनेमाचं नाव होतं.   

२००० मध्ये केविन मिटनिकने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला. हा त्याचा वैयक्तिक निर्णय जरी असला तरी सायबर क्राईमवाल्या पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. आज घडीला तो एक यशस्वी आयटी कन्सल्टंट आहे. या व्यतिरिक्त तो जबरदस्त लेखक आणि पब्लिक स्पीकर आहे.

जगातल्या टॉप ५०० कंपन्यांसाठी केविन मिटनीक सुरक्षा देण्याचं काम करतो. मोठमोठ्या कंपन्यांना तो सायबर टिप्स देण्याचंही काम करतो.

आज घडीला केविन मिटनीक अमेरिकेत स्वतःची सायबर कंपनी चालवत आहे. अमेरिकन गव्हर्नमेंट केवीनला या कामासाठी दर महिन्याला भरमसाट पैसा देते.

वयाच्या १२ व्या वर्षांपासून हॅकिंगमुळे केविन बस तिकिटांपासून वाचायचा आणि पुढे पुढे तर त्याने केलेले कांड बघून गुगल सुद्धा चक्रावून गेलं होतं. पण नंतर त्याने स्वतःत बदल करून एक मोटिव्हेशनल स्पीकर बनण्याचा निर्णय घेतला. या बदल्यातसुद्धा त्याला अमेरिका पैसा पुरवते. हॅकिंग क्षेत्रातला सगळ्यात मोठा गुन्हेगार म्हणून केविन मिटनीक ओळखला जातो.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.