शेकडो वर्षांपूर्वी नालंदाच्या खाजा मिठाईचं कौतुक पार चीन पर्यंत पोचलं होतं

खाण्यापिण्याच्या गोष्टी हि त्या त्या शहराची ओळख असते आणि तिथले लोकं अशा खाद्यपदार्थांची जितकी कीर्ती दूरवर पोहचवता येईल तितक्या दूर पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असतात. नालंदापासून ओडिसाचं पुरी हे शहर जवळपास ७५० किलोमीटर दूर आहे. इतक्या दूरवरची हि शहर पण यांच्यातलं हे अंतर कमी करणारा एक दुवा आहे. हा दुवा या दोन शहरांना फक्त इतिहासातच नाही तर वर्तमानातसुद्धा जोडतो. काय आहे या दोन शहरांना जोडणारं स्पेशल कनेक्शन जाणून घेऊया.

नालंदा आणि पुरी या दोन शहरांना जोडणारा तो स्पेशल पदार्थ आहे खाजा मिठाई. दोन्ही शहरातील लोकं हि मोठ्या आवडीने खातात आणि इतर लोकांनाही खाऊ घालतात. पॅटिससारखा दिसणारा हा पदार्थ जो तोंडात ठेवल्याठेवल्या विरघळला जातो. फक्त भारतातच नाही तर विदेशातसुद्धा या खाजाचे जलवे आहेत. भगवान जगन्नाथला या पदार्थाचा नैवद्य दाखवला जातो.

जगन्नाथ देवाला जे ५६ भोग चढवले जातात त्यापैकी एक म्हणजे खाजा मिठाई. खाजा मिठाईचा इतिहास हा खूप जुना आहे. १२ व्या शतकात लिहिल्या गेलेल्या मानसोल्लासामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. खाजाची उत्पत्ती हि अवध शहरात झालेली आहे. ऋग्वेद आणि अर्थशास्त्रामध्ये खाजाला शक्तिवर्धक जेवण म्हणून मान्यता आहे. काही लोकांचं म्हणणं आहे कि मौर्य वंशाच्या काळात सिलाओ नावाच्या एका छोट्या शहरात खाजा पहिल्यांदा बनवण्यात आल्याचा संदर्भ आहे.

हे गाव आता प्राचीन बिहारच्या मिथिला आणि नालंदा शहराच्या मध्यभागी स्थित आहे. म्हणून सिलावचा खाजा म्हणून हि मिठाई बिहारी लोकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. असंही सांगण्यात येतं कि चिनी यात्री Hiuen Tsang जेव्हा नालन्दाला आला होता तेव्हा त्यानेसुद्धा खाजाचा आस्वाद घेतला होता. एव्हढच नाही तर अशी हि मान्यता आहे कि जेव्हा भगवान बुद्ध राजगिरला चालले होते तेव्हा ते सिलाव गावात थांबले होते. तेव्हा गौतम बुद्धांना जेवणात हा खाजा वाढण्यात आला होता. 

बुद्धांनी जेव्हा हा खाजा खाल्ला तेव्हा त्यांना तो खूपच आवडला आणि त्यांनी आपल्या अनुयायांना खाजा आवर्जून खाण्यास सांगितला. पुरातत्ववादी J. D. BUGLER यांच्या मते त्यांनी खाजाचा उल्लेख बिहारमध्येच ऐकला होता जेव्हा १८७२-७३ साली ते नालन्दाला आले होते.

तेव्हा तिथल्या नागरिकांनी त्यांना सांगितलं होतं कि राजा विक्रमादित्य यांच्या शासनापासून इथं खाजा खाल्ला जातो. त्याच्यामुळेच सिलावच्या खाजाला २०१८ साली GI चा टॅग दिला होता.

खाजा वर कुठल्या प्रदेशातली यावर वाद होत असो पण बाकी हि मिठाई सगळ्यांची आवडती मिठाई आहे. या मिठाईला यूपी, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश मधले लोक मोठ्या प्रमाणात खातात. विदेशातसुद्धा याचा सप्लाय केला जातो. त्यामुळं जिथं वेळ मिळेल तिथं आणि दिसेल तिथं खाजा खायला विसरायचं नाय भिडू…..

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.